महिला दिन विशेष



आज काय तो Ladies बायकांचा दिवस आहे म्हणे. हे कै आपल्याला पटलेल नै. एक तर या Ladies बायकांची Life आपल्याला झेपत नाही. एकदम Complicated. आजच नाही हे काही. आता बघा
देवकीने कृष्णाला जन्म दिला पण मातृ सुख नाही मिळाल,
यशोदेने जन्म नाही दिला पण मातृत्व अनुभवल,
रुक्मिणी पत्नी होती पण प्रेम नाही मिळाल,
राधा पत्नी नव्हती च तरी कृष्णाची लाड़की होती,
द्रौपदी ला एकटीला ५ पती सोबत संसार करावा लागला,
तर बानू आणि म्हाळसा या दोघी एका मल्हारसोबत राहिल्या,
एक कैकेयी जिने मुलासाठी रामाला वनवास दिला,
दूसरी जिजाऊ जिने मुलाच्या हातून स्वराज्य घडवल,
एक म्हातारी मंथराच्या मत्सरामुळे राम ज्या जंगलात गेला,
तिथेच दूसरी म्हातारी शबरी च्या प्रेमामुळे त्याने उष्टि बोरे खाल्ली,
इकडे उर्मिला होती जी १४ वर्षे लक्ष्मणा ला पाहु नाही शकली,
तिकडे गांधारी जिने पती साठी स्वतः डोळे झाकुन घेतले,
एक बलात्कार पीड़ित अरुणा शानबाग २० वर्षे आवाज बन्द करुन जिवंत प्रेत बनून राहिली,
दूसरी मलाला ज़ी अत्याचारा विरुद्ध स्वतः मुलींचा आजचा आवाज बनली,
एक मन्दाकिनी आमटे जिने स्वर्गसुख सोडून समाजसाठी पती सोबत जीवन वाहून घेतल,
दूसरी सुधा मूर्ती जिने स्वताच्या जमापूंजीतुन Infosys ची पायभरणी केली,
ही फूलन देवी जिने कायदा हाती ही घेतला न पायी ही तुडवला,
ती किरण बेदी जिने कायदा सांभाळून इतिहास घडवला,
नूपुर तलवार जीच्यावर सक्ख्या मुलींच्या हत्येचा आरोप पडला,
सिंधुताई सपकाळ जि हजारो परकयांची आई झाली,
एका बाजूला इंदिरा गांधी जिने ब्लू स्टार मधे पंजाबी मुलुखात धाड़सी निर्णय घेतला,
एकीकडे सोनिया गांधी ज्यांची एका अर्थपूर्ण पंजाब्याला ५ वर्ष वापरला म्हणून बदनामी झाली,
तृप्ती देसाई हिने शनि शिंगणापुर साठी हट्ट केला,
तिकडे कल्पना चावला तिने अगदी शनि वेगेर नाही पण छोटासा पृथ्वी भोवती च हवेत जायचा हट्ट सत्यात आणला,
Finally लताजी ज्यांचा आवाज शांत होऊ नये असा वाटतो,
आणि शोभा डे ज्यांचा येऊ नये असा वाटतो.
आहे कीनी complicated. पण यात मुद्दे का point असा आहे की यांनी हे काही Womes Day ला स्त्री शक्ति चा जागर म्हणून केला नाही. तर परिस्थिति नुसार सत्व, रजो, आणि तमो या ३ गुण सोबत 9 रस यानी भरलेल हे Complicated Life या जगल्या त्यांच्या परिने जगत गेल्या. काही विलेन ठरल्या काही विनर यांना काही पडल नाही ८ मार्च च. ही सगळी gang राहिली बाजूला आणि Womens Day che msg Fwd कोण करत आहे माहिती का?
एक पार्टी attend करायची त्याला शेकडो रुपये घालून पार्लर ला जाणार, नेमक काय बदल करुन आले तो शोधवा लागणार. ज्यांच्या कपाटात ठेवायला जागा नाही पण तरीही यांना Party साठी ड्रेस नसणार. त्यातला बरा शोधून गेल्या आणि थोड़ा फार सेम कोणाचा असेल तर तिनि मुद्दाम कस केला याचा हिशेब काढणार. मग जो कोणी अनुपस्थित असेल त्यांची झक्कास गॉसिपिंग करणार. मग अर्धा डज़न सेल्फी. आणि मागे जिच अशक्य वाभाड़ काढायच तिच्या सोबत photo पोस्ट करणार. आणि देवाला न घाबरता My Bestest Friend Forever असल caption देणार. सगळ्यात महत्वाच गाडी चालवताना ब्रेक, इंडिकेटर, हॉर्न या सगळ्या वस्तु लग्नात रुखवतात ठेवायच्या असल्यानी त्या जपून वापरणार.
हे सगळ जरी खर असल तरी एक पॉइंट आहे तो पण लिवतो.
आम्हा जेंट्स लोकांना प्रत्येक वेळी आजी, आई, बहिण, मैत्रीण, बायको, मुलगी, नात. यांच्या पैकी कोणा ना कोणाची कायम सोबत लागते हे नक्की. प्रेमानी चांगल चुंगल खाऊ घालायच्या सवयी, आवाजातली काळजी, लावायची शिस्त, आणि सगळ्यात main व्यापुन टाकलेल जग. यामुळे यांचे मानावे तितके आभार कमीच.
म्हणून सर्वाना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अगदी मनापासून....!!!
तळ टिप:- वर जे काही होता ते खुप दिवस हलक फूलक लिहल नव्हत म्हणून. वाचून हलके घेणें.

©प्रसन्न कुलकर्णी [ PK]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!