राजकारणी- पण राजकारणा पलिकड़चा
आपल्याकड़े माणूस कोणत्याही पातळी चा असो. मग ते पदवीधर, नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, कलाकार, तांत्रिक, संशोधक अगदी मग दाढ़ी करणारा, पंक्चर वाला, भाजीवाला त्याही पुढे जाऊन काही येत असो किंवा नसो पण राजकारण सगळ्यांचा आवडता विषय. जो माणूस घरी जाऊन बायको च्या हातात रिमोट पाहुन बातम्या बघायचा प्लान cancel करतो तो विरोध पक्ष आक्रमक हवा म्हणून अक्कल झाड़तो आणि ज्याच M3 निघायची मारामार ते बजेट मुळे देशावर कर्ज वाढल याच गणित पाजत असतो. अशा या राजकारण प्रेमी देशामधे कित्येक राजकारणी आले, येतील आणि जातील पण आपल्या नेहमीच्या राजकारणासोबत वेगळ्या गुणा मूळ काही लोक छाप पाडुन जातात मग त्या पक्षाची भूमिका पटेल न पटेल पण तो माणूस मन जिंकून जातो. माझ्या यादिमधे रोखठोक बाळासाहेब ठाकरे, वक्ता राज ठाकरे, अफाट जनसम्पर्क विलासराव देशमुख, दूरगामी प्रमोद महाजन, प्रणव मुखर्जी , मुंडे साहेब हे सगळे पक्षाचे आहेत पण यांनी सगळ्यांच प्रेम कमवल. असाच एक माणूस ज्याने राजकारण सुद्धा कविते इतकेच अलंकारिक केल आणि नेतृत्वाचा पाया रचला तो म्हणजे 'अटल बिहारी वाजपेयी'. यांच्या विषयी मी काही