Posts

Showing posts from July, 2018

एके वारी कैक सवारी

       सवारी? शीर्षक जरा वेगळं आहे ना? नुसतं यमक जुळल म्हणून टाकल अस वाटण अगदीच स्वाभाविक आहे पण फक्तं तितकंच नाहीय. कारण आपल्याकडे तीर्थक्षेत्र आणि त्याचे उत्सव खूप आहेत आणि त्याविषयी जगभर आस्तिक आणि नास्तिकाना देखील आकर्षण आहे. कारण ही क्षेत्र ऊर्जेचा स्रोत आहेत किंवा प्रेरणा आहेत. त्यातलीच एक आपली वारी. ही मी लहानपणापासून पाहतोय, ऐकतोय अन् त्याविषयी वाचतोय शिवाय दोन वर्षांपूर्वी एक दिवसासाठी का असेना पण ४ पाऊले अनुभवली ही आहे. पण नुसत्या निरीक्षणाने ही त्याच्या भव्यतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि यात एक नक्की समजू शकत की वारी एक आहे पणं त्यात सवारी कैक आहेत. जशा कि वारकऱ्यांच्या समता व भक्तीची, दिंड्या आणि वारी व्यवस्थापनाची, सेवाभावी लोकांच्या माणुसकीची, असंख्य छोटे व्यापाऱ्यांची, अभ्यासू व जिज्ञासूंची, शेवटी यजमान पंढरपूर आणि चंद्रभागेच्या अगत्याची....!!! एकेका विषयावर पुस्तक लिहीता येईल एखाद्याला इतका याचा अवाका आहे.         पहिली सवारी वारकऱ्यांची भक्ती याला व्यक्त करावे असे शब्द जगात कुठेही सापडणार नाहीत. कर्मयोगाचा पुरस्कार करणारा विठ्ठल आणि कसला ही त्रास झाला तरी दर्शनाची