Posts

Showing posts from May, 2018

युद्ध अटळ आहे 2019

      आधीच disclaimer देतो की ही पोस्ट काही राजकीय नाही. तितकी माझी पात्रता ही नक्कीच नाही आणि मी आधीच ठरवलं होत की राजकारण म्हणजे कानाला खड़ा . पण एक सामान्य मतदार जो राजकारण करत नाही पण जे काही चालू आहे त्यावरून स्वतःच एक मत बनवतो किंवा स्वतःला काही प्रश्न पडतात तितकच या पोस्ट चा अर्थ.         कर्नाटक निवडणुक. नावाप्रमाणे अनेक नाटक करुन ते वादळ शमल ते येदियुरप्पा च सरकार शमवून च. त्यावर असंख्य प्रतिक्रिया पाहिल्या. घोडेबाजारीला आळा बसला, लोकशाहीचा विजय, सत्तेचा माज उतरला वगेरे वगेरे. अर्थात हे खरच आहे की सत्तेचा माज हा कुठेही नकोच मग पक्ष कोणता ही असो. आणि एकाच पक्षाला मक्तेदारी देणे म्हणजे मनमानी कारभाराला मूकसंमती देण्यासारखं आहे. आणि घोडेबाजार म्हणालं तर हो गोवा मधे राजकारण करून ज्या पद्धतीने सत्ता स्थापन केली गेली त्याला घोडेबाजार म्हणणे चूक वाटणार नाही. आणि अप्पा यानी सरकार सोडल पण शक्य तितके हातपाय मारून पण २२ वर्षापूर्वी अटलजींनी सरकार सोडल फक्त एक मत कमी पडलं म्हणून ते ही नैतिकतेने त्यांची बरोबरी अप्पा सोबत तर होऊच शकत नाही. क्षेत्र कोणताही असो गर्वहरण हवच, ज्याचे पाय जमिनीप