Posts

Showing posts from June, 2023

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

Image
        कोणती गोष्ट तुम्हाला कोणत्या विचार चक्रात घेऊन जाईल काही सांगता येत नाही. १४ तारखेला दुपारी व्हाट्स अँप ग्रुप ला आईने टाकलेला फोटो आला आणि खाली मेसेज होता, "आम्ही दिवेघाट पार केला. थोडा थकवा जाणवतोय पण बाकी सगळ ठीक".  त्या क्षणापर्यंत कितीतरी मिश्र विचार डोक्यात घोळत होते. त्यात तुम्ही पहिला आणि महत्वाचा टप्पा पूर्ण केला याचा आनंद होता, पुढचा प्रवास कसा होईल याची काळजी होती. पण का माहित नाही तो अत्यंत भव्य, देखणा पांडुरंग पाहिला आणि निश्चिन्त झालो.         लगेच मला भूतकाळातील दोन गोष्टींची आठवण झाली. सन २००१-०२ मी तिसरीत होतो. गुरुवार होता हे नक्की कारण युनिफॉर्म ला सुट्टी होती. अण्णा ( म्हणजे माझे आजोबा) मला सोडायला शाळेत येत होते. तेव्हा रिक्षा गाडी हे लाड नव्हते, चालतं आजोबांचं बोट पकडून शाळेत जायचं हा रोजचा शिरस्ता होता. वाटेत बाबांचे कोणीतरी मित्र भेटले आणि चला सोडतो दोघांना म्हणाले. मी दोघांच्या मधे बसलो होतो. अजून थोडा रस्ता सरलां न सरला तेव्हा आजूबाजूचे लोक ओरडायला लागले. मला कळत नव्हत काय चाललय पण त्या काकांना कळलं असावं. त्यांनी गाडी पटकन थांबवली. मी मागे वळ