Posts

Showing posts from May, 2017

लातूर सत्ता पलट

While Going to Latur after Latur Municipal Elections 24 April 2017 हाताच्या छत्राखालच लातूर सोडल होतं, कमळातल आता लातूर पाहायचय, खरच बदलली लोकांची मत की, नाव फक्त सत्ताधारिंची हेच बघायचय..! इतक्या वर्षांच्या कांग्रेस ला खरच, लातूर नगरी असेल का कंटाळली, की भाजपा ला आणून उगवत्या सूर्याला नमस्काराची रीत तेवढी पाळली...! नळ, गटर, रस्ते, सिटी बस चा विचार सोडा, तहान भागवताना टैंकर्स नीच दमवल आम्हाला, हे तर हवच पण साहेबांच्या औद्योगिकरणाची गति कमी झालीय हे कळलय का कोणाला? मागितली तशी एक संधि दिली गेलीय, त्याचं सोन तेवढ करुन टाका, फार काही मागायच नाही पण, भारताच्या नकाशावर लातुरचा मान फक्त राखा...! प्रवासी ©प्रसन्न कुलकर्णी [ PK]

आजीचा राम...!! राम नवमी

 Ram Navmi 4 April 2017 कधीतरी तरी सकाळी झोपेतुन उठत असतो, डोळे अर्धवट उघडलेले असतात. आणि लटपट लटपट करत आजी चालत यायची. "अग काय आहे हे आज्जी? नकोय मला." "गप रे. अंगारा आहे रामाचा. रात्री ४ वेळा दचकुन उठलास. TV पाहता नको तितका, एवढा एवढा अंधार दिसला की लगे घाबरून पण जाता." "अग पण आता स्वप्नं ना कस कळेल, अंगारा लावलेला. आणि समजा समजलच तरी काय करणार हा अंगारा." "नसेल काही करत तरी लाव म्हणल की लावायच, उगाच प्रश्न विचारु नये. आमचा समाधान म्हणून तरी." किती वेळा सांगितल रोज उठून रामरक्षा म्हणावी. रामरक्षे मधे एक एक श्लोकात एकेका अवयव भोवती कवच निर्माण होता." हे असा Scene आमच्या कड़े कित्येक वेळा झालेला आहे. अत्यंत देव भाबड़ा असलेली आजी लोकांची जमात देव आणि फूल पाहिले की भयंकर खुश होतात. गेल्या विस वर्षात आठवत तस असा एकही दिवस नसेल गेला जिथे राम आणि श्रीक़ृष्णा ला फूल वाहिल गेला नसेल. ती रोज सकाळी अंघोळ झाली की १२ वा , १५ वा अध्याय आणि रामरक्षे च्या रूपानी 10 मिनीट द्वापार युगात आणि १० मिनीट त्रेता युगात फिरून यायची. याला गुडघे दुखी

#Highway_moments 1

 1 -26. Mar 2016 वार- शुक्रवार स्थळ- खड़की सिग्नल रोजच्या प्रमाणे सकाळी ९-९.३० वाजता जात होतो. खड़की च्या तिथे सिग्नल लागला गाड़ी थांबवली. माझ्या बाजूला थोड़ मागे एक रिक्षा होती. त्या रिक्षावाल्या काकानी माझ्या मागच्या Bike वाल्याला विचारल ते कानावर पडल "दगडुुशेठ मंदिरला कस जायचा ?" मग त्या Bike वाल्या मित्राने हेडफोन्स काढून मोठ्या कष्टाने पत्ता सांगितला. ते काका पुनः म्हणाले- "किती वेळ लागेल ?" तो Bike वाला पुनः म्हणाला ही ट्राफिक ची वेळ आहे. आणखी २० मिनीट लागतील. खर तर मनात वाटत होता रिक्षावाल्याला दगडुुशेठ माहीत नसेल तर हा धंदा करावा कशाला?. पुनः त्यानी त्या Bike वाल्या ला हाक मारली पण आता दादानी बहुतेक हेडफोन्स लाऊन Music चालु केला होता, त्यांनी मला विचारल इथ ज्यूस किंवा नारळ पाणी कुठे मिळेल. आम्ही मुंबई वरुन आलोय आणि या पोराला हवय. मी वाकुन पाहिल खरच MH ०३ होता. मागे कुटुंब होता. मध्यभागी १२-१५ वर्षाचा मुलगा. जो ग्लानि आल्या सारखा वाटत होता. हाताला सलाइन काढल्या वर असत त्या पट्या. बाजूला आई आणि त्याचा कदाचित भाऊ असावा. माहीत नव्हतं

महिला दिन विशेष

आज काय तो Ladies बायकांचा दिवस आहे म्हणे. हे कै आपल्याला पटलेल नै. एक तर या Ladies बायकांची Life आपल्याला झेपत नाही. एकदम Complicated. आजच नाही हे काही. आता बघा देवकीने कृष्णाला जन्म दिला पण मातृ सुख नाही मिळाल, यशोदेने जन्म नाही दिला पण मातृत्व अनुभवल, रुक्मिणी पत्नी होती पण प्रेम नाही मिळाल, राधा पत्नी नव्हती च तरी कृष्णाची लाड़की होती, द्रौपदी ला एकटीला ५ पती सोबत संसार करावा लागला, तर बानू आणि म्हाळसा या दोघी एका मल्हारसोबत राहिल्या, एक कैकेयी जिने मुलासाठी रामाला वनवास दिला, दूसरी जिजाऊ जिने मुलाच्या हातून स्वराज्य घडवल, एक म्हातारी मंथराच्या मत्सरामुळे राम ज्या जंगलात गेला, तिथेच दूसरी म्हातारी शबरी च्या प्रेमामुळे त्याने उष्टि बोरे खाल्ली, इकडे उर्मिला होती जी १४ वर्षे लक्ष्मणा ला पाहु नाही शकली, तिकडे गांधारी जिने पती साठी स्वतः डोळे झाकुन घेतले, एक बलात्कार पीड़ित अरुणा शानबाग २० वर्षे आवाज बन्द करुन जिवंत प्रेत बनून राहिली, दूसरी मलाला ज़ी अत्याचारा विरुद्ध स्वतः मुलींचा आजचा आवाज बनली, एक मन्दाकिनी आमटे जिने स्वर्गसुख सोडून समाजसाठी पती सोबत जीवन व

महानगर पालिका प्रचार यात्रा

आला रे आला XYZ पक्षाचा वाघ आला.....!! एकच वादा आमचे ABC दादा....!! आवाज कुणाचा PQR ताईंचा....!! गपा रे लेकानो.....किती आवाज करता....!!! महानगर पालिकेची निवडणूक ही. नावाप्रमाणे न.ग.र. म्हणजे नळ गटार आणि रस्ता याच साध सोप राजकारण. यासाठी कोणाचा उथळ वादा, खोटा आवाज आणि निधड्या छातीचा वाघ हवाय कशाला रे बेम्बट्या....साध माणूस असेल आणि ५ वर्षात २५ वेळा तोंड दाखवणारा तरी चालेल गो आम्हाला....!! दान तर खुप प्रकारचे असतात- दिलेल धनदान कोणाच्या खिशात जात कोणाला माहित. पिंड दान जात असेल पितरां पर्यन्त पण असतो का सर्वांचा विश्वास त्यावर. पूण्य वगैरे असेल पडत पदरात पण होतय की नाई चीज त्याच येत का पाहता आपल्याला....!!!! तेव्हा पासून ३ च दान देण्यावर थोड़ा तरी विश्वास आहे... अन्नदान- अपल्यासमोर समाधनानी पोट भरत कोणाच तरी. रक्तदान- एकाच वेळी वाचवतो आपण निदान ४ प्राण शेवट साला मतदान- याला लोका हक्क काय म्हणत मला नाई कळत. जो करतो त्यासाठी हक्क, जो टाळतो त्यासाठी कर्तव्य आहे हे शिपुर्ड्या...!! आता ओरडू नका रे....वाघवरची कमळा बाई पहावी की हाती घड्याळ घ्याव बघू आम्ही. नाहीच प

दांडेली माझ्या शब्दात

Image
उठी उठी गोपाला ही भूपाळी आणि रुणानुबंधाच्या गाठी सारख्या मधाळ सुरानि कुमार गंधर्वन्च्या आवाजात 12 तारखेची सकाळ झाली होती. बस मधल्या एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्क्याहुन कमी म्हणजे फार तर अर्धा डझन लोकांना fresh करण्यात गंधर्वना यश आल होत. बाकी ६६ टक्के जनता ही विश्वामित्रसारखी साखर झोपेत ध्यानस्थ होती यांना जाग करायची जबाबदारी ड्राइवर केबिन मधल्या dj नी हेलेन आणि मलाइका वर टाकली आणि त्यांनी ही महबूबा आणि चल छैय्या छैय्या या भावगीतानी व्यवस्थित पूर्ण केली. आता संपूर्ण पब्लिक टकाटक fresh झाला होत. अंदाज आला की दांडेली आता आवाक्यात आल आहे. त्याच चल छैय्या छैय्या मधल्या - "जिनके सर हो इश्क़ की छाँव पाँव के नीचे जन्नत होगी" चा प्रत्यय येणार होता लवकरच. मी फार काही प्रवास केलाय असा नाही पण आतापर्यंत वेळणेश्वर, कोकण, श्री शैल्यच्या जंगला मधला महादेवचा मंदीर, गोवा , आणि अगदी पुण्या जवळचा तामहणी घाट यानी थोड़ा फार तरी जन्नत चा अनुभव दिलाच आहे. त्यामुळे दांडेली वर तो विश्वास होताच. दोन्ही बाजूनी दाट झाड़ी आणि मधे मक्ख़न के माफिक रस्ता बॉस. अशा रस्त्यातून सुसाट बस घाल

हलका फुलका रविवार

Image
हलक फूलक लिहायचा प्रयत्न......!!! तसा कुठल्याही प्रकारचा दिनक्रम निश्चित नसताना ही ७ वाजता मी रविवारी डोळे उघडले ही तर खर सूर्य देवाच नशीब च म्हणायला हव, पण पाणी भरण्यासाठी ६ वाजता झालेली 10 मिनीटाची झोपमोड मी आणखी 2 तास झोपून थोड़ी फार पूर्ण करायचा प्रयन्तं केला. शेवटी जनाची नाही मनाची म्हणून तरी आम्ही 10 वाजता साक्षात या वसुंधरेवर चरण उभे करायचे कष्ट घेतले....पाहतो तर अस्मादिकाची बहिण calculator वर खुटुर खुटुर करत Sem च्या शेवटच्या पेपर ची तयारी करत होती. तेव्हा या चहा च्या आहारी जिवाला चहासोबत दोघांच्या न्याहारी ची ही जबाबदारी आपल्यावर आहे अस नैतिक बंधन समजल. दोन्ही एकत्र बनवून तो विषय मोकळा ही करून टाकला. श्री व सौ तीर्थरूपाना घरी फ़ोन करुन हालहवाल दिले. आता खरा प्रश्न होता या रविवारी करायचा काय. सर्वात महत्वाचा म्हणजे आज माझी मानलेली प्रेयसी कु चंचला , ती हो honda ची लेक. तिला कागदो पत्री सगळे activa म्हणतात पण आम्ही आपला मराठी बाणा म्हणून तिला चंचला च म्हणतो. तर ही आमची चंचला गेले 8 दिवस रुसुन होती पार्लर ला जाण्यासाठी, आपला रूटिन मेंटेनेंस. तसा गेल्या महिन्यात

डेक्कन कार्नर ची गर्दी आणि बस

संध्याकाळी 6.45 च्या आसपास , डेक्कन कार्नर सारख्या भयंकर गर्दीच्या stop वर, एक काठीने कानोसा घेत काळ्या चष्म्याची महिला PMT मधे चढते, गर्दी मधे ऊभी राहते, कोणीही फारशी मदत न करता चाहुली वरुन तिला कळत 2 सीट पुढची जागा रिकामी झाली आहे, ती बरोबर तिथे बसते. पुनः कोणालाही न विचारता तिला कळत की आपला स्टॉप आला आहे ती उतरायला निघते. तिला उतरून जाण्यासाठी जागा करुन द्या हे ड्राइवर नी बाकीच्याना हाका मारुन सांगाव लागत. आणि आपण वेडे म्हणतो 50 डोळस लोकांमधे एक अंध होती. खर तर 4-5 खऱ्या डोळस, बाकीच्या पूर्ण अंधामधे एक शारीरिक अंध होती ©प्रसन्न कुलकर्णी [Pk]

गीता जयंती आणि नाताळ

Image
जसा Dec चालू झाला तसे ख्रिसमस चे msgs येत आहेत आणि मी पाहिलेली लहान मूल जी आत्ता convent किंवा ICSE मधे शिकत आहेत ती आता पासून celebration ची तयारी करत jingle bell jingle bell गुण गुणत आहेत ,फार तर 3-4 ठिकाणी गीता जयंती विषयी काहीतरी वाचल. नाही माझ काही म्हणण नाही तो सर्व धर्म समभाव का काय तो ठीक आहे पण वाइट तेव्हा वाटत जेव्हा नास्तिक किंवा 90's chya नंतरच तरुण रक्त (मी ही 90's नंतर चा आहे हा) आपल्याच गोष्टीविषयी वाद घालतो त्याचे पुरावे मागतो आणि शेवटी तुम्ही फार देव देव करता , या जग बघा कुठे आहे तुम्ही रामायण महाभारतात अङ्कुन पड़ता u are so outdated वेगेर बोलून 25 तारीख आली की मेरी ख्रिसमस म्हणत त्या झगमगित झाड़ा भोवती नाचायच का तर तो दाढी वाला येतो . आणखी काही वर्षानी गीता जयंती असेल मुलगा विचारेल Mummy What is mean by Jayanti...? आई पूर्ण ऐकून न घेता सांगेल it means bday...!! चिरंजीव पुनः Granny said today is Geeta Jayanti it means Geeta Didi who comes for cooking daily, is her bday today...? ☺ ही कल्पना सुद्धा करवत नाही. त्यापेक्षा आमची 21 शतक चालू व्ह

Uri हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइक

पचवूनी झाले वार हजारो…! परी वार 'उरी'( # Uri ) चा सहन न झाला…!! ध्यास आम्हा जरी मांगल्याचा…! वसा न आमुचा षंढपणाचा…!! तळपला सिंह तो सिमेवरचा…! प्रश्न आला जेव्हा स्वाभिमानाचा…!! Prasanna Kullarni

लक्ष्मी रोड आणि बाप्पाच्या गप्पा

"काय रे राजा...?? थकला का रे तू खूप..??" १० दिवसांची वर्दळ पाहून आरामाला लागलेला लक्ष्मी रोड या गूढ आवाजाने दचकला. कोणाचा आवाज आहे याचा अंदाज घेऊ लागला. "अरे पाहतोय काय तुलाच बोलत आहे मी, तुझी चौकशी करायला आलो आहे मी." "अरे हो पण आपण आहात कोण..??" "मी तोच ज्या साठी सगळा अट्टहास चालू होता १० दिवस...!!!" "बाप्पा चक्क तुम्ही...? आत्ता आराम करायचा सोडून इकडे कुठे...??" "कालची गर्दी पाहून वाटल,आपला तसा कधीचा सहवास,पण आपण कधी बोललोच नाही....बोलाव जरा तुझ्याशी..!! इतके वर्ष तू मला, माझ्या भक्ताना, आमचा झगमगाट, सगळा आवाज, यातल्या हौषा नवशा गवशा ना प्रेमाने हक्काने किवा कधी नाइलाजाने सांभाळत आला आहेस. तुझी विचारपूस तर करायलाच हवी. दमतोस का रे यात तू...?" "अहो बाप्पा सवय झालिय मला याची. आणि तुमच्या निमित्ताने हजारो लोकांचे पाय पुण्याला लागतात, त्याचा थोडा भार घेण्यात काय आहे. आणि आला आहात च खरा तर तुम्हाला धन्यवाद द्यायला हवेत." "धन्यवाद रे कशाचे..?" "अहो तुमच्या मुळे तर मला वेगळ वै

Friendship डे आणि शाळा

Friendship Day 2016 "ओ काका, हे Friendship Band कसे दिले?" "हे ५ला..हे १०चे,आणि हे १५चे..." "हे साधे ७-८ दया...आणि हे भारीवाले ३-४ दया...." "बस्स होतिल ना रे रव्या एव्ढे?" या अश्या संवादांनी शाळेतला फ्रेंडशिप डे सुरू व्हायचा...जस ५-६वी पासून कळत होत, तस ऑगस्ट चा पहिला रविवार हा इंग्रजाळलेला झाला होता तो या फ्रेंडशिप डे ने... प्रत्येकाची बेस्ट फ्रेंडची व्याख्या वेगळी....कोणासाठी रोज आपली न चुकता जागा पकडणरा, रोज सोबत येणारा जाणारा,टिफिन शेअर करणारा, सोबत ट्युशन बुडवणारा, कुणाशी भांडायला सपोर्ट करणारा.....आणि बराच काही....!!!! जशी Friend ची तसच या Band चा ही प्रत्येकाचा हिशेब वेगळा…ज्याच्या हातात जास्त त्याच Friend Circle दणदणीत…जवळच्या मित्रांना Uniqe Design चे Bands …तोंड ओळखीचा मित्र असेल तर त्याने बांधल तरच मी बांधणार असा व्यवहार, शाळेत जिच्याशी चोरून नजरा नजर व्हायची तिला Approach करायला खुश्कीचा मार्ग म्हणजे Friendship Bands, त्यातून जिच्यासाठी घेतल तिला द्यायची हिम्मतच न होणारे आणि चुकून तिकडुन मिळाल तर

छोटे वारकरी- शुक्रवार पेठ

Image
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल....!!!! जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल....!!!! रोज सकाळी आवरून बाहेर जाताना जिथून जोर जोरात रडून रडून कांगावा करण्याचे आवाज येतात तिथे अस काहीतरी ऐकून मी दचाकलोच, ती जागा म्हणजे माझया रूम समोर असलेली प्री नर्सरि शाळा. जाण्याची वेळ. कुतूहल म्हणून वाकून पाहील तेव्हा समजल रोज ज्याना समजून सांगून कधी मारुन कधी काय काय कथा सांगून शाळेत बसून घ्याव लागत तेच मस्त मजा घेत टाळ वाजवत आणि जय मस्त बोबड्या आवाजात जय हरी विठ्ठल करत आपली दिंडी रंगवत होती बाजूच्या मंदिर पर्य़ंत. त्यातील ही छोटी डोक्यावर तुलस घेऊन आणि यांची दिंडी ची छोटी झलक.....!!!!

कुलुप म्हणतय...!!

Image
After long time Something of my own....!!! On one of FB group saw this pic....Just few lines recalled..... If this Lock speaks out what it will say....!!!! जे जे अमुल्य सारे, रक्षुन ठेवतो मी……!! तावुनी सुलाखूनी गंजणे, आयुष्य भोगतो मी……!! किमया कशी ही जाहली, हसलो मी क्षणैक ओठी…!! नाजूक पिलु वसुंधरेचे, जन्मले या लोह-पोटी…!! इच्छा मनी अशी कि, कोणी सुजाण यावा…!! वाढवावे तयाने याला, अन् याचा वटवृक्ष तो घडावा…¡¡ -Prasanna.....!!

ऐ जिंदगी

हिंदी माझा प्रदेश नाही पण बसल्या बसल्या सूचलं ४ ओळी...!! ऐ जिंदगी, जरा सुन भी ले, आज कुछ थोड़ी बात कर ले, मैं बैठ जाता हूँ घुटने पे, तू सारा गुस्सा निकाल ले..!! अब तक तो शतरंज ही चालू था, आज तो कुछ सौदा ही बना दे, १०० चीजे मैं मेहनत से दे दूंगा तुझे, बस १० ही तू मुझे खैरात मे दे दे...!! माना के इस सौदे में नुकसान है मेरा, पर अब भागम भाग से थकना नही है, चाहे चलता रहूं एक एक कदम से, बस पलभर भी एक जगह रुकना नही है..!! बड़ी फरमाईशें कड़ी मझींले की बात छोड़, छोटी ख्वाइशें और मन्नतो तक तो जाने दे, मैं तो जी लूंगा तुझे इंसान की तरह, पर कुछ खास लोगो के लिये जन्नत तो सजाने दे..!! समझ गया हूं मैं के तू बड़ी जालिम चीज है, लेकिन तू भी समझ ले,मैं भी अब तक हरा नही, आदत हो गयी है इम्तिहानों के लिएे भी गाने की, अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नही..!! ©प्रसन्न कुलकर्णी [PK]