Posts

Showing posts from 2021

सावली माडगूळकरांची...!!

      मोठी माणसं सांगत असतात आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर त्याविषयी बोलू नये....आणि लिहू तर अजिबातच नये. पण मोह अनावर झाला आणि तो का झाला हे खाली कळेल च...अर्थात लहान तोंडी फारच मोठा घास म्हणावा लागेल याला..      आपण मोठे होतो आणि होताना आजबाजूच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला old fashioned वाटायला लागतात, आणि आपण नवीन गोष्टी मधे धुंद होतो. त्या बऱ्याच गोष्टी मधे संगीत हे पहिल्या तीनात येत असाव. त्यात आपल्याला भावगीत भक्तीगीत वगैरे अस नुसत ऐकलं तरी हे काय बोरींग किंवा म्हाताऱ्यांसारख देवाची गाणी लावलीयत अस होत जे वयानुसार साहजिक आहे. माझ्या ही शाळा कॉलेज पासून आणि मोबाईल हातात आल्यापासून त्यात मराठी हिंदी देशी विदेशी गाण्याच्या कित्येक playlist फोन मधे बनवलेल्या होत्या. त्यात आता सोने पे सुहागा म्हणता येईल अशी आपल्याकडे एक अफाट गोष्ट आहे ती म्हणजे वेग वेगळे बँड्स जुन्या गाण्यांना नवीन वर्जन मधे म्हणतात काही रिमेक तर काही फक्त नवीन गायक तर काही फक्त नवीन म्युसिक लाऊन वगैरे. यांच्या कल्पना भन्नाट असल्या तरी ही लोकं काही गाण्याचं अगदीच वाभाड काढतात तर काही अगदीच लाजवाब बनतात. झालं अस की का

डोपामाईनचे चाळे अन पैशांचे खेळ

        डोपामाईन नावाचं द्रव्य मानवी शरीरात असत म्हणे जे आपल्या सुख, आनंद, कौतुक किंवा एखादी यशप्राप्ती याच्याशी निगडित असत. अर्थात हा शब्द माझ्या अशात ऐकण्यात आला  आहे आणि त्याबद्दल मला फार माहिती आहे अस नाही पण मला जे शब्दात मांडायचय त्या साठी याची मदत घेतोय. तर परत मुद्द्यावर आता जे डोपामाईन आपल्या थेट कौतुकाशी जोडलेलं आहे तेच आपल्याला attention seeker बनायला लावत. मग ते चांगलं दिसणं असेल, लिखाण, संगीत, कविता, भाषण, फोटोग्राफी, चित्रकला, खेळ आणि जे जे वेगळेपण जपता येईल असं आहे ते सर्व काही माणूस आपल्या आनंदासाठी करत असेल च पण त्याच कोणी कौतुक केलं कि ते डोपामाईन छेडलं जात आणि हुरळून जाणे किंवा तेच छंद वारंवार जपायला प्रेरणा वगरे मिळणे असे प्रकार होतात. आता सोशल मिडियाने म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ते टिक टॉक  वेग्रे यांनी तर माकडाच्या हाती कोलीतच दिलंय. मुळात हे सगळे प्लॅटफॉर्म च Human Behaviour ला मोहात पाडून त्यांना नादाला कसं लावता येईल या technology वरच तयार झालेले आहेत. नुसतं डोपामाईन नाही तर आणखी जे काही ज्ञात-अज्ञात मायाजाल आहेत ते सगळे सुरेख गुंफलेले आहेत. म्हणून