Posts

Showing posts from May, 2023

मेरा आवाज ही मेरी पेहचान है..!!

Image
       अशनिर ग्रोवर ने एका मुलाखतीत म्हणलेल होत, भारतीय माणूस आणि भारतीय मार्केट हे जगात वेगळं आहे बाकी जगाचे नियम इथे लागू होत नाहीत. अर्थात तो ग्राहकां बद्दल हे सांगत होता, पण हे अगदी विक्रेत्यांना सुद्धा लागू आहे.  म्हणजे तुम्ही त्यांना जगात भारी अशी काहीतरी अशी काहीतरी टेक्नॉलॉजी द्या पण ते त्यात सुद्धा काहीतरी जूगाड करून त्याला आपल्याला गरजे नुसार आणि सवयीनुसार Indian Touch देतील. UPI ला ते आवाजाचं मशीन लावणे हा त्याचाच भाग होता. अगदी निरक्षर आणि अजिबात Tech Savy नसलेल्यांना ते इतकं मोठं वरदान मिळालं की बस. म्हणजे असं काहीतरी छोटस पण नवीन साधन तयार करावं ही, कल्पना अमलात आणावी अशी उत्पादकांना गरज वाटावी हे आपल्या छोट्या विक्रेंत्याच यश आहे. अशीच आणखी २ अगदी छोटी आणि किरकोळ उदाहरण पाहिली, आणि मला आपल्या जुगाड संस्कृतीच कौतुक वाटत. जे सगळ्यांनी पाहिलेले असतील पण मी कदाचित मी अलीकडच्या काळात मन लाऊन पाहिले म्हणून नीट लक्षात आलं. केस १:-  पूर्वी आणि आजही हायवे वरती अशी फळं किवा किरकोळ काहीतरी विकणारे लोक असतात. त्यात द्राक्षांचे घड किंवा द्रोणामध्ये जांभूळ, करवंद, सफरचंद अशा फळापासून