Posts

Showing posts from 2019

इथे ओशाळला दुःशासन..!!

 दिवसापासून ३-४ वेळेला पोस्ट लिहायला सुरु केली पण एखाद्या नाजूक गोष्टीवर २ ओळी जरी लिहीत असलो तरी खरंच आपली तितकी समज आहे का असं वाटून पुढे काही सुचेनासं झालं. थोडक्यात पु लंच्या भाषेत आपण कोण आहोंत ? आपला शैक्षणिक दर्जा काय ? असा विचार स्वतःच्याच मनात येत राहिला. पण शेवटी समज, दर्जा असो नसो; इतके दिवस डोक्यात घोळतंय ते उतरवावं असं वाटलं. ते म्हणजे त्या Dr वरचा 'दुसरा' बलात्कार. दुसरा ? कळलं नाही ना ? कारण बलात्काराच्या बातम्या तशा रोजच वाचून 'सवय' झाली असली ( इथे सवय शब्द दुर्दैवी, किळसवाणा वाटत असला तरी आहे ते आहे ) तरी त्यात सुद्धा एक मैलाचा दगड ठरेल कि काय अशी ही घटना. अरुणा शानबाग आणि निर्भया मध्ये आणखी एक भर पडली ज्याचा कधीही उल्लेख आला तर अंगावर काटा येईल. आधी बलात्कार, मग जिवंत जाळणे, मग एन्काऊंटर अशा या घटनेत ३-४ भयंकर घटना घडल्या. पण त्याच वेळेला बाहेरच्या म्हणजे आपल्या जगात त्याहून भयंकर गोष्ट घडली ती म्हणजे ८ मिलियन म्हणजे जवळपास ८० लाख वेळेला Dr च नाव Porn Site वर शोधलं गेलं आणि ते Trending होत. हाच तो दुसरा बलात्कार..कदाचित सामूहिक.

Playlist थोडी Shuffle हवीच..!!

“काय दादया, खूप दिवस पेन हातात घेतलं नाही वाटत. पेनातली शाई संपली की उत्साह ओसरला?” एका काकांचा हा प्रश्न ऐकून जरा बर वाटलं. कारण आपण असं  ४-६ महिन्याला काहीतरी पोस्ट टाकणार तर कोणी असं विचारेल असं वाटलं हि नव्हतं.        " नाही ओ काका, थोडं परीक्षा पोटापाण्याच्या नादात हे जरा मागे पडत. आणि असं हि आजकाल फेसबुक उघडायची इच्छा होत नाहीय. विधानसभा, प्रचार हेच चालूय सगळं मग आपण काही टाकलं तरी लोकांचा सध्या मूड वेगळा आहे म्हणून मागेच पडलं."       " ठीके. तुमच्या परीक्षा वगरे काही म्हणणं नाही. पण लोकांचा मूड अंदाज घेत बसलास तर तुझा हि लिहायचा मूड निघून जाईल आणि सवय सुद्धा.  तर समर्थ म्हणतात तस 'दिसामाजी काहीतरी लिहावे आणि प्रसंगी अखंडित वाचीत जावे.' कळलं का लेका" हे संभाषण साधारण काही आठवडे पूर्वीच पण परिस्थती अजून तीच. आता तर राजकीय पोस्ट्स ना अक्षरशः ऊत आलाय.  पण ठरवलं होत जोपर्यंत हलकं फुलकं सापडत नाही तोवर कीबोर्ड ला बोट लावायचं नाही. ती संधी लवकरच मिळाली ही. एका छोट्याशा गप्पांच्या प्रसंगाने डोक्यात एक विचाराची पुडी  सोडली.         तर झालं असं कि

काही क्षण भाळण्याचे इतर मात्र सांभाळण्याचे

     गेले कित्येक महिने चाललेल्या लोकशाहीच्या उत्कंठावर्धक सोहळ्याचा आज खऱ्या अर्थाने समारोप झाला. आता सरकार स्थापना वगैरे औपचारिकता होत राहील. आपल्या इतिहासात एका पक्षाला इतकं विक्रमी बहुमत फार कमी वेळा पाहायला मिळालं. काँगेसेतर तर प्रथमच असावं. याचा आनंद म्हणणार नाही पण अनुभव आपल्या बॅच नी अनुभवला ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.       मी आधी ही ज्या काही २-४ राजकारण विषयक पोस्ट केलेल्या त्यात म्हणल्या प्रमाणे मी काही राजकीय पोस्ट लिहिण्या इतका मुरलेला अभ्यासक नाही. पण काही गोष्टीचा आपण आपल्या जमेल तसा अन्वयार्थ काढतो तितकच. ही निवडणूक जवळपास इतर मुद्दे बाजूला काढून फक्त मोदी हवे की नको इतक्याच गोष्टी भोवती फिरत होती हे सरळ आहे. आता त्यात इतकं राक्षसी बहुमत मिळाल्यावर त्यांच्या समर्थक उर्फ भक्त उर्फ तुम्ही द्याल ते नाव, हे सगळे अधिक उत्साहात असणार यात वाद नाही. यात मी ही आलोच. पण इतका विक्रमी विजय झाला याचा अर्थ मोदी जिंकले असा काढणे म्हणजे आततायी प्रतिक्रिया म्हणावी लागेल. कारण केलेल्या कामाची जाण ठेऊन आणि उद्याची आशा ठेवून जरी मोदींना निवडून द्यायचं काम जनेतेनी केलं असेल तरी त्य