इथे ओशाळला दुःशासन..!!

 दिवसापासून ३-४ वेळेला पोस्ट लिहायला सुरु केली पण एखाद्या नाजूक गोष्टीवर २ ओळी जरी लिहीत असलो तरी खरंच आपली तितकी समज आहे का असं वाटून पुढे काही सुचेनासं झालं. थोडक्यात पु लंच्या भाषेत आपण कोण आहोंत ? आपला शैक्षणिक दर्जा काय ? असा विचार स्वतःच्याच मनात येत राहिला. पण शेवटी समज, दर्जा असो नसो; इतके दिवस डोक्यात घोळतंय ते उतरवावं असं वाटलं. ते म्हणजे त्या Dr वरचा 'दुसरा' बलात्कार.
दुसरा ? कळलं नाही ना ? कारण बलात्काराच्या बातम्या तशा रोजच वाचून 'सवय' झाली असली ( इथे सवय शब्द दुर्दैवी, किळसवाणा वाटत असला तरी आहे ते आहे ) तरी त्यात सुद्धा एक मैलाचा दगड ठरेल कि काय अशी ही घटना. अरुणा शानबाग आणि निर्भया मध्ये आणखी एक भर पडली ज्याचा कधीही उल्लेख आला तर अंगावर काटा येईल. आधी बलात्कार, मग जिवंत जाळणे, मग एन्काऊंटर अशा या घटनेत ३-४ भयंकर घटना घडल्या. पण त्याच वेळेला बाहेरच्या म्हणजे आपल्या जगात त्याहून भयंकर गोष्ट घडली ती म्हणजे ८ मिलियन म्हणजे जवळपास ८० लाख वेळेला Dr च नाव Porn Site वर शोधलं गेलं आणि ते Trending होत. हाच तो दुसरा बलात्कार..कदाचित सामूहिक.
हि बातमी वाचली तेव्हा खरं खरं डोकं बधिर झालं. आणि ते ४ ज्यांनी ती कृती केली कारण त्यांनी गुन्हा केला तेव्हा ते नशेत असतील, एकट्या मुलीला बघून त्यांची 'ईच्छा' आणि हिम्मत दोन्ही प्रबळ झाली असेल. लगोलग त्याचा निकाल हि झाला . त्या चौघांनी किमान त्या जागी प्रत्यक्ष गुन्हा केला, त्यांचे किमान चेहरे तिला दिसले. त्याचा गुन्हा सिद्ध होऊ शकतो शिक्षा करता आली. पण या ८० लाखांचं काय ? हे तर पूर्ण शुद्धीत होते. यांची हि ईच्छा असच काहीस करायची होती कदाचित संधी मिळाली तर. यांनी तर अगदी आहे त्या जागेवरून, आपला चेहरा न कळू देता पण तीला trend करून दुसऱ्यांदा बलात्कार केला. ते हि ती मेलेली असताना . मग जास्त विकृत कोण ? ते चार कि हे ८० लाख ?. आणि परत कायद्यात असा गुन्हा हि नसेल कारण गुन्हा केला तर शिक्षा. गुन्ह्याची मजा घेणे याला शिक्षा नसावी. मुळात तशा site वर हे असे खरे विडिओ असतील असं वाटत नाही. पण याना तिच्यां नावाने शोधायचं कारण काय असेल हा प्रश्न अजून हि सतावतोय. कि कधी आपल्याला अशी संधी मिळाली तर मदत होईल म्हणून कि ती Dr किती असहाय होती, किती मदत मागितली, विव्हळली याचा असुरी आनंद ? कारण काहीही असो. ८० लाखामधले ९९% लोकांना Benefit of Doubt म्हणून माफ करू. Trend का येतोय याच्या उत्सुकतेपोटी होती असं म्हणू . पण तो Trend व्हायला कारणीभूत वरचे १ % लोक म्हणजे ८० हजार, पुढे काही महिन्यात छेडा छेडीच्या घटना घडतील ते हेच असतील असं म्हणायला हरकत नाही. थोडी भीड चेपली कि यातलेच ८ हजार खरा खुरा बलात्कार हि करतील. म्हणजे पुढच्या २ वर्षाचा कोटा भरला. दुर्दैव हेच कि आपलयाला हे सगळं कळू शकत पण आपण रोखू शकत नाही. कारण काय बघावं आणि काय बघू नये हे समजणार वय यायच्या आत फुकट नेट आणि फोन मिळत. त्यावर काय करायचं हा ज्याचा त्याचा चॉईस आहे . फक्त ज्यांना तो शहाणपणा वेळीच आला ते लोक बलात्कार ऐकून किंवा बघून 'Excite' नक्कीच होणार नाहीत.
रामायण महाभारत खरं घडलं किंवा नाही यावर कित्येकांचा दुमत असलं तरी आपल्याकडे प्रत्येक वेळी त्यांचे दाखले दिले जातात. आणि मला हि ते आवडत कारण या दोन गोष्टी मध्ये सगळ्या गोष्टी आहेत ज्या आजहि बऱ्याच गोष्टीशी साधर्म्य ठेवतात. ज्यावेळी हि घटना घडली तेव्हा अनेक पोस्ट वाचल्या आपला इतिहास महिलेसाठी युद्ध करायचा आहे मग समोर रावण असो कि दुःशासन वगरे. रावण तर सोडाच, पण दुःशासन सुद्धा ओशाळला असणार आज. तो हि म्हणाला असता कि हो जसा तुमचा श्रीकृष्ण अमर आहे, शरीराने अश्वत्थामा अमर आहे, तसा बऱ्याच पुरुषामध्ये ववृत्तीने मी सुद्धा अमर आहेच कारण स्त्री ला बघून तोल सुटणारे आणि शिक्षेस पात्र कलियुगामध्ये हि असतील च. गुन्हा हा गुन्हाच तो उघड केला काय किंवा लपून केला काय पण मी केला तो उघड पणे आणि त्याची उघड शिक्षा मला मिळाली हि. तुम्ही म्हणता तस तुमचा श्रीकृष्ण यदा यदा हि धर्मस्य आणि परित्राणाय साधूनाम म्हणत येईल हि पण तो मारू शकेल माझ्यासारख्या दुःशासनाला. आणि योगायोगाने ज्याप्रमाणे दुर्योधनाने द्रौपदी समोर स्वतःची मांडणी उघडी केली आणि भीमाने शपथ घेऊन त्याचा वाढ मांडीवर प्रहार करूनच केला तो हि युद्धाचा नियम मोडून. त्याचमाणे बलात्कार्यांना त्याच जागी नेऊन पोलिसांनी सुद्धा घटने नंतर का होईना पण भीमाची भूमिका केली. नियम थोडे मोडून च. ( तेच खरे गुन्हेगार असं मानून) न्याय तर केला. पण जे अदृश्य दुर्योधन आणि दुःशासन आहेत त्यांच्या पुढे श्रीकृष्ण सुद्धा हतबल च झालेला असणार यात मला तरी शंका नाही. आणि परत एकदा रण सोडून खऱ्या अर्थाने रनछोडदास बनणार.

शेवट करताना एक आठवण झाली. मागच्या वर्षी पराधीन आहे जगती हे त्रिकालाबाधित सत्य सांगणाऱ्या गण्यावरून मी काही लिहिलं होत. ते आज हि लागू होत. माडगूळकर म्हणाले "मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा" होऊन होऊन काय वाईट होईल तर मरण येईल. पण ते इतकं भीषण येईल, पूर्ण शरीर, इज्जत याचा लचके तोडून याचा कोण तर्क करेल...

"कामातूराणाम न भयं न लज्जा ..!!" हेच खर..!!

©प्रसन्न कुलकर्णी [PK ]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!