Posts

Showing posts from November, 2017

दशक्रिया (अंध) श्रद्धेची आणि (अंध) विश्वासाची

  आपली एक साधारण गोष्ट आहे भारतीय लोकांची. आपल्याकडे मूल जन्म घेत. त्याला काही दिवस लोकांना दाखवल जात नाही. नजर लागेल म्हणून किंवा आणखी काही असेल तर. ५ व्या दिवशी सटुआई येऊन आपल्या कपाळावर आपला नशीब लिहून जाते. मग त्याची कुंडली बनते जन्मानुसार त्यांची रास गोत्र नक्षत्र चरण सगळ ठरत. त्याची पत्रिका बनवून घेतली जाते. मूल मोठ होत जात. हिन्दू असेल तर मुंज , मुस्लिम असेल तर सुंता होते. पुन्हा तो शिकला मोठा झाला घर बांधतो त्यात आपण च पाहतो kitchen कुठे असाव, कुठे मास्टर बेड असावा वेगेर. मग लग्न होत. कोणाचा मंगळ शनि राहु आहे कुठल्या स्थानी काय आहे हे शोधल जात मग दिवस शोधला जातो. लग्न देवा ब्राह्मणा साक्षी नेच होत असा नाही पळून जाऊन होते, घरगुती हार घालून होत, रजिस्टर ही होते, धर्म बदलला तर कबुल है आणि I Do म्हणत ही लग्न होत. नाहीच तर लिव इन राहता येत. सम्पूर्ण जगाला प्रजनन अर्थात रिप्रोडक्शन सिस्टम माहीत आहे पण आपल्याला मुलगा हवा असतो किंवा सासुला पाळणा हवा असतो मग नवस बोलले जातात अंगारे धुपारे होतात आणि त्यामुळेच मूल देखील होतात म्हणे. हे झाल life cycle च. या सोबत माहीत ही गणपती होता कि ficti