Posts

Showing posts from March, 2023

६८ वर्षांची जादूची पेटी...!!

Image
       शाळेत असताना निबंध असायचे ना, सूर्य उगवलाच नाही तर?, प्राणी बोलू लागले तर?, तुम्ही पंतप्रधान झालात तर ? किंवा तुम्हाला भूतकाळात किंवा भविष्यात जायची संधी मिळाली तर ? तेव्हा सुद्धा हे कल्पना रंजन करून मजा यायची अगदी अशात सुद्धा सिनेमामध्ये सुद्धा भूतकाळात किंवा भविष्यात जाता येतील असे सिनेमे पाहिले की आपल्याला अशी संधी मिळाली तर काय असे विचार येत असतात मग तेव्हा ही अनेक प्रसंग आठवतात की हे आपल्याला पाहायला मिळाल तर किती मजा येईल. त्यात छत्रपतींचे किस्से आहेत, पेशव्यांचे आहेत, स्वातंत्र्याचे आहेत, माझ्या शहराचे आहेत, माझ्या कुटुंबातील जुन्या वारसांचे अनेक किस्से आहेत. पण ते काही क्षणापूरते, घटने पूरते किंवा वैयक्तिक स्वार्थाचे आहेत. पण मला जर आज कोणी विचारलं तर खरंच अस काही शक्य झालं विज्ञानाने किंवा जादूने तर मी म्हणेन. मला खुप महापुरुष आणि त्याच्या यशोगाथा आवडतात पण त्या मी रोजच ऐकतो देखील. आणि असही ते सगळं पाहण्यात माझं सम्पूर्ण आयुष्य थिट पडेल. त्याऐवजी मी म्हणेन-         मला अक्ख एक वर्ष द्या १ एप्रिल १९५५ ते २० एप्रिल १९५६. अक्ख वर्ष मला अदृश्य स्वरूपात जगायला मि