Posts

Showing posts from January, 2018

सौंदर्य- नजरे पलिकड़चा

     खुप दिवसांपासून एक प्रसंग लिहायचा होता. मी बऱ्याचदा कर्वेे रोड-FC रोड- शिवाजी नगर मार्गे जातो. त्यात ही काही वेळा PMT ने पण जातो. एकदा असच बस नी जात असताना एक मुलगी बस मधे चढली. ११ वी-१२ वी असावी फार फार तर. खुप मोठ्यानी बोलत होती. कुठे उतरायच, कोणता स्टॉप येणार वगेरे. मागे वळून पाहिला तर ती अंध होती. हातात काठी नसती तर अंध आहे हे समजायला वेळ लागेल इतका सहज वावर होता. भरगच्च गर्दी मधे आपला रस्ता काढत कुठे तरी ज्ञानेश्वर पादुका चौकामधे उतरली असावी. नंतर त्याच आठवड्यात मी गाडीवर जात असताना सिग्नल ला होतो तेव्हा ती मैत्रिणींसोबत रिक्षात बसत होती. पण आता अवतार जरा वेगळा होता. Traditional Day वेगेर कॉलेज मधे असावा. व्यवस्थित functional पंजाबी ड्रेस, त्यानुसार थोड़ा फार make up, लक्षात येतील असे दागिने . पु ल च्या भाषेत सुंदर खाशी सुबक ठेंगणि वेगेर. कदाचित हे सगळ बस मधे carry होणार नाही म्हणून मैत्रिणींसोबत जात असावी. ती निघून गेली आणि सिग्नल सुटला मी ही पुढे आलो होतो.      ‎पण तोवर असच डोक्यात चक्र सुरु झाला. सौदर्य कोणाला नाही आवडत. आणि आपल सौंदर्य लोकांना दाखवायच्या आधी प्रत्येक जण