Posts

Showing posts from 2020

डोह - BFF नावाचा

मला कविता वाचायला आवडतात. हा म्हणजे इतका हाडाचा कविता प्रेमी मी नाही की कवितांच्या कार्यक्रमाला नियमित जाइन किंवा कविताच पुस्तक आणून वाचेन. पण चर्चेत असणारे कवी, त्यांच्या गाजलेल्या कविता, youtube वरती सापडणाऱ्या मी ऐकत असतो. त्यात स्पृहा जोशी, गुरू ठाकूर, संदीप खरे, जितेंद्र जोशी, सौमित्र, संकर्षण कऱ्हाडे अशी स्क्रिन वर येणारी जास्त ऐकण्यात येतात. त्यात आणखी एक भर पडली ती म्हणजे वैभव जोशीं. प्रचंड ऐकतोय यांच्या कविता. आणि त्याची सुरुवात झाली डोह या कवितेपासून. कवींची काय गम्मत असते नाही, एक गोष्ट १०० ते १००० शब्दात सांगता येत नाही पण अगदी ५-७ ओळींमध्ये ते त्याहून जास्त आणि स्पष्ट बोलून जातात. ही कविता Platonic RelationShip वरती आहे. आता हा शब्दच आधी ऐकण्यात आला नव्हता. search केलं तेव्हा वाटलं की अनेक जण अनेक अर्थ काढू शकतात याचे. पण ते शोधायच्या आधी जो अर्थ पटकन डोक्यात येतो आणि मी कायम त्या अर्थाने कविता ऐकतो, ते म्हणजे आपल्या भाषेत BFF. आपल्यासोबत १०० फोटो टाकतात , hangout ला असतात तसे नाही. फक्त एक किंवा दोन जे मुलांसाठी मैत्रीणीपेक्षा जास्त पण Gf पेक्षा कमी असतात. किंवा

अस्वस्थता-बदलापुर्वीची

खूप दिवस फेसबुक आणि ब्लॉग पासून लांब होतो. लिहावं नाही लिहावं असं झालेलं पण वेळ ही मिळाला आणि virtual Distance स्वस्थ बसू देईना. आज ४५ दिवस होतील अक्खा देश Lockdown स्थितीत आहे, जसे जसे दिवस पुढे जातायत तसा सगळ्यांना कंटाळा यायचा पण कंटाळा यायला सुरु झालाय आता. फक्त कंटाळा नाही तर व्यक्त किंवा अव्यक्त अस्वस्थता आहे. हा म्हणजे सुरुवातीला असेल त्यांना वर्क फ्रॉम होम, सोशल मीडिया, रामायण महाभारत, वेब सिरीस, पुस्तक, पहिल्यांदाच स्वतःसाठी आणि कुटुंबाला देता आलेला वेळ सकारात्मक बाबी आहेतच. त्यासोबत आणखी एक गोष्ट सगळ्यांकडे कॉमन सुरु आहे, ती म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ बातम्या पाहणे त्यात रोज वाढणारे रुग्ण आणि मृत्यचे आकडे, देशविदेशातल्या सरकार आणि प्रशासन यांची जान आणि जहां सांभाळायची कसरत. हे चित्र जितकं आजची स्थिती पाहून सुन्न करणार आहे तितकंच उद्याची कल्पना करून अस्वस्थ करणार आहे. किती हि टाळली तरी न टळणारी अस्वस्थता. थोडक्यात संदीप खरेंची मराठी कवाली सारखी गत अक्ख्या जगाची झालीय- अगतिक झालो निष्प्रभ झालो, तरीही केला तुझाच धावा, रोखठोक मज आज बोलू दे माणुसकीने ऐका देवा, जाब तु