Posts

Showing posts from November, 2019

Playlist थोडी Shuffle हवीच..!!

“काय दादया, खूप दिवस पेन हातात घेतलं नाही वाटत. पेनातली शाई संपली की उत्साह ओसरला?” एका काकांचा हा प्रश्न ऐकून जरा बर वाटलं. कारण आपण असं  ४-६ महिन्याला काहीतरी पोस्ट टाकणार तर कोणी असं विचारेल असं वाटलं हि नव्हतं.        " नाही ओ काका, थोडं परीक्षा पोटापाण्याच्या नादात हे जरा मागे पडत. आणि असं हि आजकाल फेसबुक उघडायची इच्छा होत नाहीय. विधानसभा, प्रचार हेच चालूय सगळं मग आपण काही टाकलं तरी लोकांचा सध्या मूड वेगळा आहे म्हणून मागेच पडलं."       " ठीके. तुमच्या परीक्षा वगरे काही म्हणणं नाही. पण लोकांचा मूड अंदाज घेत बसलास तर तुझा हि लिहायचा मूड निघून जाईल आणि सवय सुद्धा.  तर समर्थ म्हणतात तस 'दिसामाजी काहीतरी लिहावे आणि प्रसंगी अखंडित वाचीत जावे.' कळलं का लेका" हे संभाषण साधारण काही आठवडे पूर्वीच पण परिस्थती अजून तीच. आता तर राजकीय पोस्ट्स ना अक्षरशः ऊत आलाय.  पण ठरवलं होत जोपर्यंत हलकं फुलकं सापडत नाही तोवर कीबोर्ड ला बोट लावायचं नाही. ती संधी लवकरच मिळाली ही. एका छोट्याशा गप्पांच्या प्रसंगाने डोक्यात एक विचाराची पुडी  सोडली.         तर झालं असं कि