Posts

Showing posts from 2023

मुलाखत....!!

Image
       सध्या trending असलेली उद्धव ठाकरे आणि संजय राऊत किंवा आधीच्या अक्षय कुमार- नरेंद्र मोदी किंवा राज ठाकरे- शरद पवार अशा मुलाखती मुळात मुलाखती नसतात च आणि त्या देणाऱ्यांना ती देण्यात काहीही विशेष साध्य ही करायचं नसत. एकतर तर कोणत्यातरी गोष्टीवरून लक्ष हटवणे, आपण आहोत याची लोकांना आठवण करून देणे किंवा त्यांना एखाद मत किंवा टिप्पणी करायची असते त्यासाठी त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नसतो तो उपलब्ध करून घेणे यापेक्षा त्यात काही वेगळा उद्देश असेल अस वाटत देखील नाही. पण मुलाखतीच महत्व केवळ तितकंच असू शकत नाही तर एका पट्टीच्या ऐकणाऱ्यासाठी गप्पागोष्टी पलीकडे ती बरच काही देऊन जाते.        कुणी मला odd man out किंवा outdated म्हणलं तरी हरकत नाही, पण मला अशा मुआलखती ऐकण्याची आवड अनेक वर्ष आहे अगदी आजही. मी स्वतः क्रिकेट खूप कमी पाहतो पण विक्रम साठे ची 'What the duck' मुलाखतींचे बरेचसे एपिसोड मी पाहिले आहेत किंवा गौरव कपूर चे Breakfast with Champions चे जवळपास सगळे भाग मी पाहिलेले आहेत, कपिल शर्मा मी पाहतो ते फक्त मधल्या गप्पा ऐकण्यासाठी बाकी पांचटपणा वगळून, आप की अदालत मधे माझ्या आवड

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

Image
        कोणती गोष्ट तुम्हाला कोणत्या विचार चक्रात घेऊन जाईल काही सांगता येत नाही. १४ तारखेला दुपारी व्हाट्स अँप ग्रुप ला आईने टाकलेला फोटो आला आणि खाली मेसेज होता, "आम्ही दिवेघाट पार केला. थोडा थकवा जाणवतोय पण बाकी सगळ ठीक".  त्या क्षणापर्यंत कितीतरी मिश्र विचार डोक्यात घोळत होते. त्यात तुम्ही पहिला आणि महत्वाचा टप्पा पूर्ण केला याचा आनंद होता, पुढचा प्रवास कसा होईल याची काळजी होती. पण का माहित नाही तो अत्यंत भव्य, देखणा पांडुरंग पाहिला आणि निश्चिन्त झालो.         लगेच मला भूतकाळातील दोन गोष्टींची आठवण झाली. सन २००१-०२ मी तिसरीत होतो. गुरुवार होता हे नक्की कारण युनिफॉर्म ला सुट्टी होती. अण्णा ( म्हणजे माझे आजोबा) मला सोडायला शाळेत येत होते. तेव्हा रिक्षा गाडी हे लाड नव्हते, चालतं आजोबांचं बोट पकडून शाळेत जायचं हा रोजचा शिरस्ता होता. वाटेत बाबांचे कोणीतरी मित्र भेटले आणि चला सोडतो दोघांना म्हणाले. मी दोघांच्या मधे बसलो होतो. अजून थोडा रस्ता सरलां न सरला तेव्हा आजूबाजूचे लोक ओरडायला लागले. मला कळत नव्हत काय चाललय पण त्या काकांना कळलं असावं. त्यांनी गाडी पटकन थांबवली. मी मागे वळ

मेरा आवाज ही मेरी पेहचान है..!!

Image
       अशनिर ग्रोवर ने एका मुलाखतीत म्हणलेल होत, भारतीय माणूस आणि भारतीय मार्केट हे जगात वेगळं आहे बाकी जगाचे नियम इथे लागू होत नाहीत. अर्थात तो ग्राहकां बद्दल हे सांगत होता, पण हे अगदी विक्रेत्यांना सुद्धा लागू आहे.  म्हणजे तुम्ही त्यांना जगात भारी अशी काहीतरी अशी काहीतरी टेक्नॉलॉजी द्या पण ते त्यात सुद्धा काहीतरी जूगाड करून त्याला आपल्याला गरजे नुसार आणि सवयीनुसार Indian Touch देतील. UPI ला ते आवाजाचं मशीन लावणे हा त्याचाच भाग होता. अगदी निरक्षर आणि अजिबात Tech Savy नसलेल्यांना ते इतकं मोठं वरदान मिळालं की बस. म्हणजे असं काहीतरी छोटस पण नवीन साधन तयार करावं ही, कल्पना अमलात आणावी अशी उत्पादकांना गरज वाटावी हे आपल्या छोट्या विक्रेंत्याच यश आहे. अशीच आणखी २ अगदी छोटी आणि किरकोळ उदाहरण पाहिली, आणि मला आपल्या जुगाड संस्कृतीच कौतुक वाटत. जे सगळ्यांनी पाहिलेले असतील पण मी कदाचित मी अलीकडच्या काळात मन लाऊन पाहिले म्हणून नीट लक्षात आलं. केस १:-  पूर्वी आणि आजही हायवे वरती अशी फळं किवा किरकोळ काहीतरी विकणारे लोक असतात. त्यात द्राक्षांचे घड किंवा द्रोणामध्ये जांभूळ, करवंद, सफरचंद अशा फळापासून

६८ वर्षांची जादूची पेटी...!!

Image
       शाळेत असताना निबंध असायचे ना, सूर्य उगवलाच नाही तर?, प्राणी बोलू लागले तर?, तुम्ही पंतप्रधान झालात तर ? किंवा तुम्हाला भूतकाळात किंवा भविष्यात जायची संधी मिळाली तर ? तेव्हा सुद्धा हे कल्पना रंजन करून मजा यायची अगदी अशात सुद्धा सिनेमामध्ये सुद्धा भूतकाळात किंवा भविष्यात जाता येतील असे सिनेमे पाहिले की आपल्याला अशी संधी मिळाली तर काय असे विचार येत असतात मग तेव्हा ही अनेक प्रसंग आठवतात की हे आपल्याला पाहायला मिळाल तर किती मजा येईल. त्यात छत्रपतींचे किस्से आहेत, पेशव्यांचे आहेत, स्वातंत्र्याचे आहेत, माझ्या शहराचे आहेत, माझ्या कुटुंबातील जुन्या वारसांचे अनेक किस्से आहेत. पण ते काही क्षणापूरते, घटने पूरते किंवा वैयक्तिक स्वार्थाचे आहेत. पण मला जर आज कोणी विचारलं तर खरंच अस काही शक्य झालं विज्ञानाने किंवा जादूने तर मी म्हणेन. मला खुप महापुरुष आणि त्याच्या यशोगाथा आवडतात पण त्या मी रोजच ऐकतो देखील. आणि असही ते सगळं पाहण्यात माझं सम्पूर्ण आयुष्य थिट पडेल. त्याऐवजी मी म्हणेन-         मला अक्ख एक वर्ष द्या १ एप्रिल १९५५ ते २० एप्रिल १९५६. अक्ख वर्ष मला अदृश्य स्वरूपात जगायला मि