Posts

Showing posts from June, 2018

थोडा है बस थोडे की जरुरत है....!!!

         कालपासून ST महामंडळाचा पुन्हा एकदा वेतन वाढी साठी संप सुरू झाला. २०१७ च्या दिवाळी मधे या संपामुळे संपकरी, सरकार, पोलीस यंत्रणा आणि मुख्य म्हणजे `सामान्य नागरिक` सगळेच अक्षरशः वैतागून गेले होते. एक महत्वाची विनंती अशी की `सामान्य नागरिक` हा शब्द ते काय बोल्ड, इटालिक आणि अंडर लाईन का काय असत ना तस करून लक्षात ठेवां बर का...!! कारण कस आहे नेहमी आपण सामान्य नागरिक हा शब्द साधारण आर्थिक निकषांवर मध्यमवर्गीय आणि त्या खालचे असे घेतो पण इथे आर्थिक पेक्षा भौगोलिक निकष अभिप्रेत आहेत. म्हणजे महाराष्टातील जिल्हे, तालुके आणि त्यानंतर काही मोठी गाव सोडून इतर ठिकाणी राहणारी सगळी मंडळी म्हणजे सामान्य नागरिक. ज्यांच्या कडे स्वतःचे ४ चाकी वाहन नाही ते सगळे. आता लोक म्हणतील काय इतकं चिरफाड `सामान्य`तेची त्याच कारण एक पुण्याचे सद्गृहस्थ , ज्यांच्या मते ते महाराष्ट्र, भारत फिरले आहेत आणि दुनियादारी ची बरी जाणं आहे त्यांना.       झालं असं की मागच्या  दिवाळीत आमची भेट झाली होती तेव्हा हा संपाचा विषय निघाला त्यात त्यांची पहिली २-४ वाक्य अशी होती की - "राजकारण करतात साले...यांच्या कामगार संघट