Posts

Showing posts from February, 2018

धुरांच्या रेषा हवेत सोडी...!!!

     १२५ कोटिच मनुष्यबळ आपल. आता याला बळ म्हणाव की नाही हा विनोदाचा किंवा वादाचा मुद्दा होऊ शकतो. आता इतका जनसमुदाय म्हणल की इकड तिकड़ फिरण आलच. मग आम्हाला बस, विमान, रेल्वे, कार,ट्राम, वडाप, बाइक, रिक्षा, टैक्सी, बैलगाड़ी, ऊंट, याक, घोड़ा, टांगा, सायकल तर कधी पायी. अस कुवत, आवड, भूगोल आणि उपलब्धता यानुसार निवड करावी लागते. पण या सगळ्यात रेल्वे. भाई बंदी मे कुछ बात है. सोई सुविधेबबदल लोकांच्या बोम्बा असतील पण तरी लै जनता अजुन हिच्या भरोशावर आणि प्रेमात आहे हे नक्की.      ‎पण इथे  नॉन एसी प्रवास करणारा माणूस हा सोशल लाइफ मधे रस घेणारा, शांत पणे लोकांना पाहणारा, Silent observer च असावा अस माझ ठाम मत आहे. त्याच्याइतक एन्जॉय कुणीही करणार नाही. आपण अजुन बसलो न बसलो पाणी चहा कॉफ़ी, सैंडविच, इडली, चिप्स, कंगवे, पीना, हेडफोन, इयरिंग, बोडिस्प्रे अस अक्ख डीमार्ट समोर आल का काय वाटत? आणि त्याचं मार्केटिंग तर मार्केटिंग च्या पोराला लाजवेल एखाद वेळी. समोर दोन अवकाळी पोर आपल्या आईच्या नाकात दम करत असतात. पलीकडचे काका रेल्वेच्या तालावर होय होय नाही नाही करत असतात तर बाजुला बसलेल कपल सदृश्य जोड़ी कूच कूच

दिल्या घेतल्या वचनाची...!!!

     एक जोडप पाहिलय, सहवासाचे ५०-५५ वर्ष पुर्ण केलेल. तारुण्यात घऱट्यच्या काड्या जमवत उन्हात रापलेल. तर पोरांच्या सावलीत उतावयात हसत खेळत पहुडलेल. चिंता वाटावी म्हणाव अस कुठेही काही नव्हतं.   पण आज सकाळी एक भानगड़ झाली. त्यांच्या हाती लागल एक पार्सल, उघडून ठेवलेल. लाल काळ्या कागदानी बांधलेल आणि चॉकलेट न रिबिन्स नी सजवलेल. शिष्टाचाराचे नियम गुंडाळले आणि त्यांनी त्यात डोकावून पाहिल. पार्सल होत नातीच, लवकरच बदलणाऱ्या मधल्या नावाकडून आलेल. तिन पण न संकोचता आणि खुशित दाखवला ड्रेस, फ़ोटो कोलाज च ग्रीटिंग, सोबत पार्सल मधे टिकेल असा artificial गुलाब असावा. हे सम्पतय न सम्पतय तोच नातू ही आला थोड्याश्या घाईत. आज ऑफिस मधे पार्टी आहे. ड्रेस कोड असा आहे. आपल्याला सालसा करायच्या आहे. Etc etc etc. त्यांनी वाचल होत सकाळीच पेपर मधे आज valetine day आहे. पण त्याचा अवाका इतका मोठा आहे हे तिसऱ्या पिढिकडून कळल होत.      आता मात्र ते खुप नाराज झाले.  गूढ़ विचारात जाऊन आले. आजी च्या बाजूला ते शांत पणे जाऊन बसले. शब्द जोड़ले २ मिनिट आणि मग बोलते झाले. "५०-५५ वर्ष झाली नाही ना लग्नाला आपल्या..?"