Posts

Showing posts from April, 2024

निवडणूक आणी त्यातले हजारो न्यूटन ~

Image
       निवडणुकीमध्ये आपण प्रोसेस च्या या बाजूला असतो. म्हणजे आधी काही दिवस मतदार यादीत नाव आहे का ते पाहणे आणि निवडणुकीच्या दिवशी जाऊन मतदान करून येणे. पण जेव्हा जेव्हा त्या प्रोसेस च्या पलीकडची बाजू म्हणजे मतदान केंद्र, तिथले अधिकारी असा विषय निघतो तेव्हा तेव्हा मला राजकुमार राव चा न्यूटन सिनेमा आठवतो. त्यात माझे बाबा सरकारी नोकरीत असल्याने लोकसभेपासून ग्रामपंचायत पर्यंत आजूबाजूला कोणतीही निवडणूक आली की त्यांना ड्युटी नक्की लागायची च. त्यामुळे त्या न्यूटन या व्यक्तिमत्त्वाबद्दल प्रेम, आदर आणि सहानुभूती वाटायला लागली.       एक शहरातला उच्च शिक्षित तरुण सरकारी नोकरी मधे येतो, त्याला मतदार, त्यांचे अधिकार, लोकशाही याबद्दल नितांत आदर असतो आणि ते आपल एक कर्तव्य आहे हे जाणून आपल काम पूर्ण करण्यासाठी आग्रही असतो. त्याची निवडणूक ड्युटी लागते एका आदिवासी भागात. जिथे मतदान सोडा, हक्क, कर्तव्य देखील सोडा, रोजच्या जगण्यात संघर्ष असतो. आज काम केलं नाही तर रात्रीची भाकरी मिळेल की नाही याची शाश्वती नसते. लुटालूट, गोळीबार, आदिवासी, नक्षल कोणी कधी दत्त म्हणून समोर उभा राहील याचा नेम नसतो.