Posts

Showing posts from January, 2024

रामाच्या निमित्ताने काहीस

Image
         ब्लॉग सुरु करायच्या आधी लहान सहान लेख मी फेसबुक वर लिहायचो. त्यात सर्वात चांगला प्रतिसाद मिळालेला आणि मला स्वतःला खूप आवडलेल्या निवडक लेखापैकी एक म्हणजे "आजीचा राम". आत्ता ही राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा, परवाच झालेली गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी यामुळे परत एकदा लहानपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या.            दरवर्षी राम नवमी ला उस्मानाबादच्या राम मंदिरात आजोबांचं कीर्तन असायचं. कित्येकदा शाळेला सुट्टी असेल तर मी त्यांच्या सोबत गेल्याच मला आठवतं. तेव्हा मला त्यातल काही कळायचं किंवा आवडायचं का हा प्रश्नच नव्हता. आम्ही भावंडं त्यांच्या सोबत जायचो ते खूप वेळा त्यांची काठी म्हणून किंवा कमी ऐकू येणाऱ्या कानाच यंत्र म्हणून. गीतरामायणचं काय तर, भावगीत भक्तीगीत देखील फारसे मला माहित ही नव्हते आणि कळत तर मुळीच नव्हते. पण त्या रामजन्मवेळेच्या काही मिनिट आधी किंवा नंतर, संगीत शिक्षण नसलेल्या पण गाऊन गाऊन ऐकायला गोड वाटेल इतक्या सुरेल आणि माईक नसला तरी किमान १०० -२०० माणसाला ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात ऐकू आलेला-      " चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी…..      गंधयुक्त