Posts

Showing posts from September, 2017

Engineers Day- एक धर्म

Image
Engineers Day- आपला देशाला वेगवेगळ्या जातीं, उपजाती, त्यांच्या परंपरा, संप्रदाय यांचा सहवास कायम लाभलेला आहे. काही पुराण काळा पासून चालत आलेले आहेत तर काही कालानुरूप तयार झाले आहेत. अशीच एक जात म्हणा किंवा समाज किंवा Direct धर्म बिर्म Engineers नावानी भारतात खुप जागा व्यापुन बसला आहे. अगदी लोकसंख्येच प्रमाण वगैरे काढ़लच तर पहिल्या पाचात बसतो की काय अस वाटत. आज त्यांचा दिवस आहे म्हणे विश्वेश्वरैया नामक Engineer च्या जन्मदिवसा निमित्त तो साजरा होतो. अर्थातच बाकी समाजा प्रमाणेच २-४ लोक सोडली तर आपल्या धर्मगुरू च नेमक कार्य सांगू शकेल असे मला कोणी भेटले नाही. असो, मुद्दा काय आहे की आज यांचा दिवस आहे. तसा अत्यंत बंडखोर, शौकीन आणि तितकाच तंत्रज्ञानप्रिय मित्र प्रेमी समाज आहे. बाकी समाजाप्रमाणे यांच्याही चालिरीति, आणि रिवाज आहेत. यांची सकाळ ही कॉलेज च्या एक तास आधी होते मग वेळ काहीही असो आणि रात्र १-२ च्या पुढे कधी ही. कायम समुहासोबत राहायची आवड़ असणाऱ्या यानी एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ जास्त लोकप्रिय केल मग कधी sem मधे किंवा अटेंडेंस वर का असेना. समानतेवर पण यांचा भयंकर विश