Engineers Day- एक धर्म

Engineers Day-

आपला देशाला वेगवेगळ्या जातीं, उपजाती, त्यांच्या परंपरा, संप्रदाय यांचा सहवास कायम लाभलेला आहे. काही पुराण काळा पासून चालत आलेले आहेत तर काही कालानुरूप तयार झाले आहेत. अशीच एक जात म्हणा किंवा समाज किंवा Direct धर्म बिर्म Engineers नावानी भारतात खुप जागा व्यापुन बसला आहे. अगदी लोकसंख्येच प्रमाण वगैरे काढ़लच तर पहिल्या पाचात बसतो की काय अस वाटत. आज त्यांचा दिवस आहे म्हणे विश्वेश्वरैया नामक Engineer च्या जन्मदिवसा निमित्त तो साजरा होतो. अर्थातच बाकी समाजा प्रमाणेच २-४ लोक सोडली तर आपल्या धर्मगुरू च नेमक कार्य सांगू शकेल असे मला कोणी भेटले नाही.
असो, मुद्दा काय आहे की आज यांचा दिवस आहे. तसा अत्यंत बंडखोर, शौकीन आणि तितकाच तंत्रज्ञानप्रिय मित्र प्रेमी समाज आहे. बाकी समाजाप्रमाणे यांच्याही चालिरीति, आणि रिवाज आहेत. यांची सकाळ ही कॉलेज च्या एक तास आधी होते मग वेळ काहीही असो आणि रात्र १-२ च्या पुढे कधी ही. कायम समुहासोबत राहायची आवड़ असणाऱ्या यानी एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ जास्त लोकप्रिय केल मग कधी sem मधे किंवा अटेंडेंस वर का असेना. समानतेवर पण यांचा भयंकर विश्वास आहे म्हणून हे Assignment, Practicals सुद्धा समान दिसावे म्हणून एकाच सगळे Follow करतात, पण हे क्रूर जग त्याला कॉपी म्हणत. हा पण ग्रुप प्रिय असल तरी यांच्यात गटबाजी मात्र फार होते मग त्यात राडे असो किंवा HOD किंवा Faculty समोर Credit, अगदीच एखाद्या मस्तानी साठी रांझा आणि मजनू चा सुद्धा पंगा शक्य.
हा झाला विनोदाचा भाग, पण आपला देश अविकसित पासून विकसनशील झाला यात यांचा वाटा सर्वात जास्त आहे. स्वतःच्याच क्षेत्रात अस नाही जिथे आवड़ असेल तिथे धड़पडून यांनी काम केली. विजय केळकर, नारायण मूर्ति सारख्या Engineer नी भारत स्वबळावर चमकवला तर जिथे चालत माणूस जाताना हवा जाते तिथे कोंकण रेल्वे चालवली याचे दाखले अजुन दिले जातात. तर रघुनाथ माशेलकर सारख्या engineer नी हळद नावाची गोष्टीच्या petant साठी अमेरिकेशी भांडण केल. आज इस्त्रो च्या शरपेचात वेगवेगळे मानाचे तुरे खोवले जात आहेत त्यातही यांचा वाटा सिंहासारखा आहे हेच खर. खर की खोट माहीत नाही पण बिल गेट्स म्हनाले होते म्हणे की Indian लोकांना मी घेतल नाही तर तिथे दूसरी माइक्रोसॉफ्ट तयार होऊ शकते. दुर्दैव इतकच की आज खुप Engineers ज्यांना उद्योजक व्हायच आहे. पण इथला जात पात आणि राजकारण त्याना टिकू देत नाही मोजके लोक मात करू शकले. आणि अत्यंत स्पर्धेमूळ बेरोजगार सुद्धा जास्त आहेत यातून कस बाहेर पडणार देव जाणे.
आता खुप लोकांना वाटेल की हा Commerce चा, याला का पुळका आला Engineers चा. पण मुद्दा असा आहे की माझ्या मित्र, कुटुंब जिकड़े तिकडे या समाजाचे लोक भरलेत, मग पानी मे रहना तो मछलियों का दिल तो सम्भालना पड़ेंगा ना रे बाबा.

बाकी तुम्हाला अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नाही देणार कारण तो काही सण नाही पण तुम्ही उत्तम अभियन्ते व्हा ही सदिच्छा

©प्रसन्न कुलकर्णी [PK]



Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!