Posts

Showing posts from 2022

बस रेटिंग्स मे याद रखना...!!

Image
       काल रात्री उशिरा झोमॅटो वर काही ऑर्डर केलेलं, तो डिलिव्हरी बॉय 15 च मिनिटात घेऊन आला. जाताना रेटिंग्स द्या हा सर अस म्हणून गेला. तसा हा कंटाळवाणा प्रकार मला फारसा आवडत नाही किंवा त्याबाबतीत मी थोडासा आळशी आहे की कोण त्या अँप किंवा साईट वरती जाऊन रेट वगरे करेल. पण तेव्हा तो अगदी मिस्टर पूर्णब्रह्म बनून माझ्या कडे आला होता आणि अगदी एक ही कॉल न करता बरोबर पत्त्यावर आला होता म्हणून समाधानी होतो ते वेगळं च..!! सढळ हातांनी सगळीकडे ५ पैकी ५ सगळ्या निकषांवर मी वाटून टाकले आणि बाहेर पडतो तितक्यात अजून एक नोटिफिकेशन आलं. How was your dinner ? Please rate restaurant म्हणून. त्याला म्हणलं तुझं आणि वेगळं असतंय का? म्हणलं घे..तू भी क्या रखेगा..!! पण इकडे विचार चक्र सुरू झालं होतं.        अशात रेटिंग्स या गोष्टीशी किती वेळा संबंध आलाय हे आठवत होतो. गूगल मॅप वाले जागे साठी, प्ले स्टोरवाले अँप साठी, हॉटेल वाले,लॉज वाले, ओला कॅब वाले, झूम कॉल वाले, duo वाले वगरे वगरे वगरे..!! इतकंच काय ऑफिस मध्ये ही बोनस साठी..!! निश्चित च रेटिंग्स ही एक चांगली पद्धत आहे आपला उत्पादन किंवा सेवा यांची अनेक निकषांव

'मूक' बैठक आणि माझी 'बधीर' झालेली भाषा..!!

Image
            सकाळपासून मराठी गौरव दिनाच्या पोस्ट, कविता, दिसत होत्या. खूप दिवसात काही लिहिलं नाही अशी खंत ही होतीच पण सुचत ही नव्हतं काही आणि ठरवलं असत तर तरी तेच घीस पीठ लिखाण झालं असत, एक तर मराठी भाषेचा गोडवा किंवा आपण मराठी असून मराठी का बोलत नाही यावर उपरोध जो दरवर्षी फक्त आज वाचण्यात येतो. जाऊ दे म्हणत आपला दिनक्रम केला आणि संध्याकाळी नेहमीच्या खानावळीत जेवायला गेलो, तिथे जेमतेम ८-९ लोक बसतील इतकी जागा असते. आम्ही जाऊन बसलो तिथे आधीच ४-५ मुलं होती. जेवण यायला वेळ होता म्हणून सगळेच जरा टाईमपास करत बसले होते. त्या काकांनी येऊन काय हवं नको विचारलं आम्हाला आणि त्या 4-5 मुलांना खुणेने विचारलं. ते सगळे मूक बधीर होते किंवा ऐकू येत असावं काही जणांना.            हळू हळू त्या पोरांच्या खुणेने च गप्पा सुरू होत्या. कोणी मॅच पाहून दुसर्यांना रन सांगत होता, त्यांनी खुणेनेच त्या काकांना काय हवं ते सांगितलं. त्यांचे हातवारे पूर्ण पणे कळत ही नव्हते इतके फास्ट होते, तरी मला काय कळतंय हे मी प्रयत्न करत होतो. जसा जसा वेळ चालला होता मला त्यांचा हेवा ही वाटायला लागला, अपराधी पणा ही यायला लागला कारण नसत