Posts

Showing posts from May, 2019

काही क्षण भाळण्याचे इतर मात्र सांभाळण्याचे

     गेले कित्येक महिने चाललेल्या लोकशाहीच्या उत्कंठावर्धक सोहळ्याचा आज खऱ्या अर्थाने समारोप झाला. आता सरकार स्थापना वगैरे औपचारिकता होत राहील. आपल्या इतिहासात एका पक्षाला इतकं विक्रमी बहुमत फार कमी वेळा पाहायला मिळालं. काँगेसेतर तर प्रथमच असावं. याचा आनंद म्हणणार नाही पण अनुभव आपल्या बॅच नी अनुभवला ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.       मी आधी ही ज्या काही २-४ राजकारण विषयक पोस्ट केलेल्या त्यात म्हणल्या प्रमाणे मी काही राजकीय पोस्ट लिहिण्या इतका मुरलेला अभ्यासक नाही. पण काही गोष्टीचा आपण आपल्या जमेल तसा अन्वयार्थ काढतो तितकच. ही निवडणूक जवळपास इतर मुद्दे बाजूला काढून फक्त मोदी हवे की नको इतक्याच गोष्टी भोवती फिरत होती हे सरळ आहे. आता त्यात इतकं राक्षसी बहुमत मिळाल्यावर त्यांच्या समर्थक उर्फ भक्त उर्फ तुम्ही द्याल ते नाव, हे सगळे अधिक उत्साहात असणार यात वाद नाही. यात मी ही आलोच. पण इतका विक्रमी विजय झाला याचा अर्थ मोदी जिंकले असा काढणे म्हणजे आततायी प्रतिक्रिया म्हणावी लागेल. कारण केलेल्या कामाची जाण ठेऊन आणि उद्याची आशा ठेवून जरी मोदींना निवडून द्यायचं काम जनेतेनी केलं असेल तरी त्य