काही क्षण भाळण्याचे इतर मात्र सांभाळण्याचे

     गेले कित्येक महिने चाललेल्या लोकशाहीच्या उत्कंठावर्धक सोहळ्याचा आज खऱ्या अर्थाने समारोप झाला. आता सरकार स्थापना वगैरे औपचारिकता होत राहील. आपल्या इतिहासात एका पक्षाला इतकं विक्रमी बहुमत फार कमी वेळा पाहायला मिळालं. काँगेसेतर तर प्रथमच असावं. याचा आनंद म्हणणार नाही पण अनुभव आपल्या बॅच नी अनुभवला ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.
      मी आधी ही ज्या काही २-४ राजकारण विषयक पोस्ट केलेल्या त्यात म्हणल्या प्रमाणे मी काही राजकीय पोस्ट लिहिण्या इतका मुरलेला अभ्यासक नाही. पण काही गोष्टीचा आपण आपल्या जमेल तसा अन्वयार्थ काढतो तितकच. ही निवडणूक जवळपास इतर मुद्दे बाजूला काढून फक्त मोदी हवे की नको इतक्याच गोष्टी भोवती फिरत होती हे सरळ आहे. आता त्यात इतकं राक्षसी बहुमत मिळाल्यावर त्यांच्या समर्थक उर्फ भक्त उर्फ तुम्ही द्याल ते नाव, हे सगळे अधिक उत्साहात असणार यात वाद नाही. यात मी ही आलोच. पण इतका विक्रमी विजय झाला याचा अर्थ मोदी जिंकले असा काढणे म्हणजे आततायी प्रतिक्रिया म्हणावी लागेल. कारण केलेल्या कामाची जाण ठेऊन आणि उद्याची आशा ठेवून जरी मोदींना निवडून द्यायचं काम जनेतेनी केलं असेल तरी त्यांच्या वर टीका झाल्या त्यात १००% चूक होत आणि जनता सगळ विसरली अस म्हणून आपण आपल्याच लोकशाही चां अपमान करू कदाचित. त्या टीका ही मोठ्या मनानी प्रत्येक मोदी समर्थक हा खाजगीत नक्की मान्य करेल. पैकी मला लक्षात आलेल्या काही ज्या कदाचित महागात पडू शकला असत्या पण ते झाल नाही त्या अशा -
      मित्र पक्षांची फरफट जितकी मोदी शहा जोडीने केली तितकी कुणी केली नसेल. अर्थात मित्र पक्षा सोबत फार राहून निर्णयाची धडाडी ठेवता येत नाही हे जरी खर असल तरी थोड गोड बोलून किमान जुनी कृतज्ञता म्हणून तरी बरी वागणूक अपेक्षित होती, गांधी नेहरू च्या चुका नावाचे गढे मुर्दे किती प्रमाणात उक्रत बसावे याला ही थोड बंधन ठेवायला हवे होते, हिंदुत्व आधी ही होत पुढे ही राहणार आणि त्याला मतदार साद ही घालणार च पण केवळ कट्टर हिंदुत्व या एकमेव गोष्टीवर लोकांचा फोकस आणून आपण निवडून येऊ शकत नाही तस असत तर अडवाणी केव्हाच पंतप्रधान झाले असते, मोदी प्रसिद्धी आणि मार्केटिंग प्रेमी आहेत असा एक आरोप आहे आता हा गुण म्हणावा की दोष ज्याचं त्याचं मत, भाजपा ला लोकांना निवडून दिला फक्त ४-५ लोकांच्या कामाच्या जोरावर ते म्हणजे मोदी, पर्रीकर, गडकरी, सुषमा जी, प्रभू आणि राज्यातले फडणवीस योगी सारखे काही लोक. परंतु उरलेल्या खासदारापैकी बरेच से अतिशय वाचाळ आहे हे नक्की. माणसांनी एकवेळ २ काम कमी केली तरी चालेल पण नको तिथं नाही ते बोलून आपली व परिणामी आपण पक्षाची प्रतिमा खालावतोय हे इतक्या जाणत्या लोकांना कळू नये?.  गोहत्या, गोमांस, गोमूत्र अस गो गो करत राहील तर जनता पण u go म्हणायला मागे पुढे बघणार नाही, साध्वी ना उमेदवारी द्यावी की न द्यावी हा एक खरच मोठा प्रश्न चिन्ह होत बर दिली तर दिली आणि मला ही वाटतं की त्यांच्यावर झालेला अन्याय खरा आहे मात्र जेव्हा तुम्ही उमेदवार म्हणून उभे असता तेव्हा एखाद्या पोलिस कमिश्नर जो भले तुमच्या सोबत तो चूक वागला असेल पण तोच २६/११ मधे शहीद झाला आहे आणि लोक भावनिक पणे त्याला जोडले गेले आहेत त्याला नख मारून तुम्ही आपली प्रतिमा ओरखडली होती हे नक्की, परत नथुराम च एक वाक्य त्यांनी सोडल होत आणि भाजपा नी त्याची माफी मागायला लावली हा एक मोठा हिट विकेट झाली असती. तो देशभक्त होता हे मानणारा जो वर्ग आहे तो गांधीच्या कार्याला पण नाकारत नाही आणि हत्या याच समर्थन करत नाही पण त्यांना वेळीच आवर घालणं आवश्यक होते तेव्हा हत्या हा मार्ग त्यांनी निवडला इतकंच. पुलवामा चां हल्ला दुर्दैवी च होता आणि असा कोणता ही हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर द्यायची ताकद मोदी सरकार मधे आहे हे विरोधक ही मान्य करतील च पण त्याच्या नावावर मत मागणं हे कितपत बरोबर आहे हा ही एक वादाचा मुद्दा आहे. २०१४ पासून प्रखर राष्ट्रवाद पुढे आला हे जरी खरं असेल आणि काँग्रेसी बरेच नेते इतक्या कट्टर देश प्रेमा पासून लांब आहेत हे जरी असेल तरी त्यांना मत देणारा हा तर भारतीय होता त्याला थोडी हे कळत होत आणि काँग्रेस ला मत म्हणजे राष्ट्रद्रोह अस म्हणून आपण त्या पक्षांचं राहू दे.. पण नकळत पणे आपल्या लोकांच्या राष्ट्र प्रेमावर शंका घेत होतो.
      या गोष्टी मला स्वतः ला तरी जाणवल्या आणि खटकल्या पण या इतक्या ही मोठ्या नाहीत की यामुळे त्यांना सरकार स्थापने पासून लांब ठेवावं लागेल आणि जनतेनी सुद्धा हे मान्य करून बहुमताच दान सढळ हातांनी पदरी टाकलाय. आता या गोष्टी तशाच चालू राहिल्या आणि वाचाळ लोकांना आवर नाही घातला तर आपण विरोधकांना स्वतःच बळ देण्यासारखं आहे.

सत्ता पालट हा नक्की असतो, दर ५-१०-१५ का होईना पण सत्ता बदल नक्की आहे आणि तो मोठ्या मना नी पाय जमिनीवर ठेऊन जिभेला आवर महत्वाचा.

हे २ दिवस फक्त भाळण्याचे बाकी सगळे सांभाळण्याचे आहेत

©प्रसन्न कुलकर्णी [PK]

Comments

surbhi khandade said…
मला आवडलं... खुप मस्त आहे लेख...

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!