Posts

Showing posts from 2017

राजकारणी- पण राजकारणा पलिकड़चा

       आपल्याकड़े माणूस कोणत्याही पातळी चा असो. मग ते पदवीधर, नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, कलाकार, तांत्रिक, संशोधक अगदी मग दाढ़ी करणारा, पंक्चर वाला, भाजीवाला त्याही पुढे जाऊन काही येत असो किंवा नसो पण राजकारण सगळ्यांचा आवडता विषय. जो माणूस घरी जाऊन बायको च्या हातात रिमोट पाहुन बातम्या बघायचा प्लान cancel करतो तो विरोध पक्ष आक्रमक हवा म्हणून अक्कल झाड़तो आणि ज्याच M3 निघायची मारामार ते बजेट मुळे देशावर कर्ज वाढल याच गणित पाजत असतो.         अशा या राजकारण प्रेमी देशामधे कित्येक राजकारणी आले, येतील आणि जातील पण आपल्या नेहमीच्या राजकारणासोबत वेगळ्या गुणा मूळ काही लोक छाप पाडुन जातात मग त्या पक्षाची भूमिका पटेल न पटेल पण तो माणूस मन जिंकून जातो. माझ्या यादिमधे रोखठोक बाळासाहेब ठाकरे, वक्ता राज ठाकरे, अफाट जनसम्पर्क विलासराव देशमुख, दूरगामी प्रमोद महाजन, प्रणव मुखर्जी , मुंडे साहेब हे सगळे पक्षाचे आहेत पण यांनी सगळ्यांच प्रेम कमवल. असाच एक माणूस ज्याने राजकारण सुद्धा कविते इतकेच अलंकारिक केल आणि नेतृत्वाचा पाया रचला तो म्हणजे 'अटल बिहारी वाजपेयी'.         ‎यांच्या विषयी मी काही

Change is Permanent 2017

Change is Permanent-Timeline Reviews            काही वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्या कड़े एक Key Chain होत, हुक असलेले. आणि एक पेन होत खटका दाबायच. दोन्ही गोष्टी फार यूनिक आणि महाग होत्या का तर अजिबात नाही. किम्मत दोन्हीची प्रत्येकी २०-२५ फक्त. पण कित्येक वर्ष त्या माझ्या कड़े होत्या. ते हुक च Key Chain पँट च्या लूप ला लावायच आणि पेन खिशाला. आणि आजुबाजुच्या लोकांना इतकी सवय झाली होती ते पाहुन. मग ते हरवायच ही नाही. मी कुठे इकडे तिकडे जरी ठेवल तरी ते माझ आहे म्हणून लोक मला आणून द्यायचे. तेव्हा माझी बहिण मला म्हणाली होती.          ‎ " तू इतका बोर आहेस माहिती का? पेन आणि Key Chain जपायची गोष्ट आहे का? नवीन नवीन ट्राय कराव. तुला जुन्या गोष्टी वापरायला काय आवडत?" "अस काही नाही. बदलेन कि कंटाळा आला की. पण आता उलट होत. १-२ महीने पुढे गेल आणि की स्वतःला च वाटत अरे अजुन आहे हे. बघू किती जात." मला वाटलच तिला हे बोर वाटेल पण नंतर ती जे बोलली ते मला विचार करायला लाऊन गेल. ती म्हणे- "Actullay मला आवडलय हे. मला पण माझी एखादी अशी वस्तु personalise करायचीय. त्या वस्तु साध्या

दशक्रिया (अंध) श्रद्धेची आणि (अंध) विश्वासाची

  आपली एक साधारण गोष्ट आहे भारतीय लोकांची. आपल्याकडे मूल जन्म घेत. त्याला काही दिवस लोकांना दाखवल जात नाही. नजर लागेल म्हणून किंवा आणखी काही असेल तर. ५ व्या दिवशी सटुआई येऊन आपल्या कपाळावर आपला नशीब लिहून जाते. मग त्याची कुंडली बनते जन्मानुसार त्यांची रास गोत्र नक्षत्र चरण सगळ ठरत. त्याची पत्रिका बनवून घेतली जाते. मूल मोठ होत जात. हिन्दू असेल तर मुंज , मुस्लिम असेल तर सुंता होते. पुन्हा तो शिकला मोठा झाला घर बांधतो त्यात आपण च पाहतो kitchen कुठे असाव, कुठे मास्टर बेड असावा वेगेर. मग लग्न होत. कोणाचा मंगळ शनि राहु आहे कुठल्या स्थानी काय आहे हे शोधल जात मग दिवस शोधला जातो. लग्न देवा ब्राह्मणा साक्षी नेच होत असा नाही पळून जाऊन होते, घरगुती हार घालून होत, रजिस्टर ही होते, धर्म बदलला तर कबुल है आणि I Do म्हणत ही लग्न होत. नाहीच तर लिव इन राहता येत. सम्पूर्ण जगाला प्रजनन अर्थात रिप्रोडक्शन सिस्टम माहीत आहे पण आपल्याला मुलगा हवा असतो किंवा सासुला पाळणा हवा असतो मग नवस बोलले जातात अंगारे धुपारे होतात आणि त्यामुळेच मूल देखील होतात म्हणे. हे झाल life cycle च. या सोबत माहीत ही गणपती होता कि ficti

Engineers Day- एक धर्म

Image
Engineers Day- आपला देशाला वेगवेगळ्या जातीं, उपजाती, त्यांच्या परंपरा, संप्रदाय यांचा सहवास कायम लाभलेला आहे. काही पुराण काळा पासून चालत आलेले आहेत तर काही कालानुरूप तयार झाले आहेत. अशीच एक जात म्हणा किंवा समाज किंवा Direct धर्म बिर्म Engineers नावानी भारतात खुप जागा व्यापुन बसला आहे. अगदी लोकसंख्येच प्रमाण वगैरे काढ़लच तर पहिल्या पाचात बसतो की काय अस वाटत. आज त्यांचा दिवस आहे म्हणे विश्वेश्वरैया नामक Engineer च्या जन्मदिवसा निमित्त तो साजरा होतो. अर्थातच बाकी समाजा प्रमाणेच २-४ लोक सोडली तर आपल्या धर्मगुरू च नेमक कार्य सांगू शकेल असे मला कोणी भेटले नाही. असो, मुद्दा काय आहे की आज यांचा दिवस आहे. तसा अत्यंत बंडखोर, शौकीन आणि तितकाच तंत्रज्ञानप्रिय मित्र प्रेमी समाज आहे. बाकी समाजाप्रमाणे यांच्याही चालिरीति, आणि रिवाज आहेत. यांची सकाळ ही कॉलेज च्या एक तास आधी होते मग वेळ काहीही असो आणि रात्र १-२ च्या पुढे कधी ही. कायम समुहासोबत राहायची आवड़ असणाऱ्या यानी एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ जास्त लोकप्रिय केल मग कधी sem मधे किंवा अटेंडेंस वर का असेना. समानतेवर पण यांचा भयंकर विश

Kool सत्यवान आणि हटके सावित्री....!!

सकाळी सकाळी न्यूज़ पेपर आणि Mobile वर updates पाहत असताना चहा नाश्ता समोर आला....आणि एकदम तो बिचकला- तो:- आईच्या गावात....!!!! अग काय आहे हे? पंजाबी ची मारामार तुझी न हे काय? आज काही प्रोग्राम आहे का?  मला कोणी काही सांगत का नाही? एक चिमटा काढ़ पटकन.... (त्याला आवड़णारी आईची काठा पदराची इरकल साड़ी, नव्या लक्ख बांगडया, आजिची नथ जी आई कायम घालायची, सुवासिक गजरा, नवीन Brand चा परफ्यूम आणि हलकसा केलेला Touch up अस आरसपानी रूप बघून याला कळत नव्हतं....तितक्याच प्रेमानी एक चिमटा त्याला काढला गेला) तो:- अरररर अग हळू बावळट...!! ती:- तूच म्हणालास आता हळू का? आणि आज काहीही प्रोग्राम नाहिय. वट सावित्री पौर्णिमा आहे. So मी आई सोबत पुजेला जात आहे...!! तो:- ऐ हा... तू जा..पूजा कर...नो प्रॉब्लम. पण plz तू असा नको म्हणू की ते ७ जन्म बिन्म तू मला मागणार आहेस. इतका नाही झेलणार काय मी? एकच पीस नको मला तितके जन्म. 😛 ती:- plz ७ जन्म तू मिळाला तरी नकोयस मला. मला पण variety पाहिजे यार. आधीच खुप लोकांना Sacrifice करुन हो बोलले तुला. सारख तेच नाही करणार मी. Cool बंदा हरीश, Businessman दीप, physic oriented र

लातूर सत्ता पलट

While Going to Latur after Latur Municipal Elections 24 April 2017 हाताच्या छत्राखालच लातूर सोडल होतं, कमळातल आता लातूर पाहायचय, खरच बदलली लोकांची मत की, नाव फक्त सत्ताधारिंची हेच बघायचय..! इतक्या वर्षांच्या कांग्रेस ला खरच, लातूर नगरी असेल का कंटाळली, की भाजपा ला आणून उगवत्या सूर्याला नमस्काराची रीत तेवढी पाळली...! नळ, गटर, रस्ते, सिटी बस चा विचार सोडा, तहान भागवताना टैंकर्स नीच दमवल आम्हाला, हे तर हवच पण साहेबांच्या औद्योगिकरणाची गति कमी झालीय हे कळलय का कोणाला? मागितली तशी एक संधि दिली गेलीय, त्याचं सोन तेवढ करुन टाका, फार काही मागायच नाही पण, भारताच्या नकाशावर लातुरचा मान फक्त राखा...! प्रवासी ©प्रसन्न कुलकर्णी [ PK]

आजीचा राम...!! राम नवमी

 Ram Navmi 4 April 2017 कधीतरी तरी सकाळी झोपेतुन उठत असतो, डोळे अर्धवट उघडलेले असतात. आणि लटपट लटपट करत आजी चालत यायची. "अग काय आहे हे आज्जी? नकोय मला." "गप रे. अंगारा आहे रामाचा. रात्री ४ वेळा दचकुन उठलास. TV पाहता नको तितका, एवढा एवढा अंधार दिसला की लगे घाबरून पण जाता." "अग पण आता स्वप्नं ना कस कळेल, अंगारा लावलेला. आणि समजा समजलच तरी काय करणार हा अंगारा." "नसेल काही करत तरी लाव म्हणल की लावायच, उगाच प्रश्न विचारु नये. आमचा समाधान म्हणून तरी." किती वेळा सांगितल रोज उठून रामरक्षा म्हणावी. रामरक्षे मधे एक एक श्लोकात एकेका अवयव भोवती कवच निर्माण होता." हे असा Scene आमच्या कड़े कित्येक वेळा झालेला आहे. अत्यंत देव भाबड़ा असलेली आजी लोकांची जमात देव आणि फूल पाहिले की भयंकर खुश होतात. गेल्या विस वर्षात आठवत तस असा एकही दिवस नसेल गेला जिथे राम आणि श्रीक़ृष्णा ला फूल वाहिल गेला नसेल. ती रोज सकाळी अंघोळ झाली की १२ वा , १५ वा अध्याय आणि रामरक्षे च्या रूपानी 10 मिनीट द्वापार युगात आणि १० मिनीट त्रेता युगात फिरून यायची. याला गुडघे दुखी

#Highway_moments 1

 1 -26. Mar 2016 वार- शुक्रवार स्थळ- खड़की सिग्नल रोजच्या प्रमाणे सकाळी ९-९.३० वाजता जात होतो. खड़की च्या तिथे सिग्नल लागला गाड़ी थांबवली. माझ्या बाजूला थोड़ मागे एक रिक्षा होती. त्या रिक्षावाल्या काकानी माझ्या मागच्या Bike वाल्याला विचारल ते कानावर पडल "दगडुुशेठ मंदिरला कस जायचा ?" मग त्या Bike वाल्या मित्राने हेडफोन्स काढून मोठ्या कष्टाने पत्ता सांगितला. ते काका पुनः म्हणाले- "किती वेळ लागेल ?" तो Bike वाला पुनः म्हणाला ही ट्राफिक ची वेळ आहे. आणखी २० मिनीट लागतील. खर तर मनात वाटत होता रिक्षावाल्याला दगडुुशेठ माहीत नसेल तर हा धंदा करावा कशाला?. पुनः त्यानी त्या Bike वाल्या ला हाक मारली पण आता दादानी बहुतेक हेडफोन्स लाऊन Music चालु केला होता, त्यांनी मला विचारल इथ ज्यूस किंवा नारळ पाणी कुठे मिळेल. आम्ही मुंबई वरुन आलोय आणि या पोराला हवय. मी वाकुन पाहिल खरच MH ०३ होता. मागे कुटुंब होता. मध्यभागी १२-१५ वर्षाचा मुलगा. जो ग्लानि आल्या सारखा वाटत होता. हाताला सलाइन काढल्या वर असत त्या पट्या. बाजूला आई आणि त्याचा कदाचित भाऊ असावा. माहीत नव्हतं

महिला दिन विशेष

आज काय तो Ladies बायकांचा दिवस आहे म्हणे. हे कै आपल्याला पटलेल नै. एक तर या Ladies बायकांची Life आपल्याला झेपत नाही. एकदम Complicated. आजच नाही हे काही. आता बघा देवकीने कृष्णाला जन्म दिला पण मातृ सुख नाही मिळाल, यशोदेने जन्म नाही दिला पण मातृत्व अनुभवल, रुक्मिणी पत्नी होती पण प्रेम नाही मिळाल, राधा पत्नी नव्हती च तरी कृष्णाची लाड़की होती, द्रौपदी ला एकटीला ५ पती सोबत संसार करावा लागला, तर बानू आणि म्हाळसा या दोघी एका मल्हारसोबत राहिल्या, एक कैकेयी जिने मुलासाठी रामाला वनवास दिला, दूसरी जिजाऊ जिने मुलाच्या हातून स्वराज्य घडवल, एक म्हातारी मंथराच्या मत्सरामुळे राम ज्या जंगलात गेला, तिथेच दूसरी म्हातारी शबरी च्या प्रेमामुळे त्याने उष्टि बोरे खाल्ली, इकडे उर्मिला होती जी १४ वर्षे लक्ष्मणा ला पाहु नाही शकली, तिकडे गांधारी जिने पती साठी स्वतः डोळे झाकुन घेतले, एक बलात्कार पीड़ित अरुणा शानबाग २० वर्षे आवाज बन्द करुन जिवंत प्रेत बनून राहिली, दूसरी मलाला ज़ी अत्याचारा विरुद्ध स्वतः मुलींचा आजचा आवाज बनली, एक मन्दाकिनी आमटे जिने स्वर्गसुख सोडून समाजसाठी पती सोबत जीवन व

महानगर पालिका प्रचार यात्रा

आला रे आला XYZ पक्षाचा वाघ आला.....!! एकच वादा आमचे ABC दादा....!! आवाज कुणाचा PQR ताईंचा....!! गपा रे लेकानो.....किती आवाज करता....!!! महानगर पालिकेची निवडणूक ही. नावाप्रमाणे न.ग.र. म्हणजे नळ गटार आणि रस्ता याच साध सोप राजकारण. यासाठी कोणाचा उथळ वादा, खोटा आवाज आणि निधड्या छातीचा वाघ हवाय कशाला रे बेम्बट्या....साध माणूस असेल आणि ५ वर्षात २५ वेळा तोंड दाखवणारा तरी चालेल गो आम्हाला....!! दान तर खुप प्रकारचे असतात- दिलेल धनदान कोणाच्या खिशात जात कोणाला माहित. पिंड दान जात असेल पितरां पर्यन्त पण असतो का सर्वांचा विश्वास त्यावर. पूण्य वगैरे असेल पडत पदरात पण होतय की नाई चीज त्याच येत का पाहता आपल्याला....!!!! तेव्हा पासून ३ च दान देण्यावर थोड़ा तरी विश्वास आहे... अन्नदान- अपल्यासमोर समाधनानी पोट भरत कोणाच तरी. रक्तदान- एकाच वेळी वाचवतो आपण निदान ४ प्राण शेवट साला मतदान- याला लोका हक्क काय म्हणत मला नाई कळत. जो करतो त्यासाठी हक्क, जो टाळतो त्यासाठी कर्तव्य आहे हे शिपुर्ड्या...!! आता ओरडू नका रे....वाघवरची कमळा बाई पहावी की हाती घड्याळ घ्याव बघू आम्ही. नाहीच प

दांडेली माझ्या शब्दात

Image
उठी उठी गोपाला ही भूपाळी आणि रुणानुबंधाच्या गाठी सारख्या मधाळ सुरानि कुमार गंधर्वन्च्या आवाजात 12 तारखेची सकाळ झाली होती. बस मधल्या एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्क्याहुन कमी म्हणजे फार तर अर्धा डझन लोकांना fresh करण्यात गंधर्वना यश आल होत. बाकी ६६ टक्के जनता ही विश्वामित्रसारखी साखर झोपेत ध्यानस्थ होती यांना जाग करायची जबाबदारी ड्राइवर केबिन मधल्या dj नी हेलेन आणि मलाइका वर टाकली आणि त्यांनी ही महबूबा आणि चल छैय्या छैय्या या भावगीतानी व्यवस्थित पूर्ण केली. आता संपूर्ण पब्लिक टकाटक fresh झाला होत. अंदाज आला की दांडेली आता आवाक्यात आल आहे. त्याच चल छैय्या छैय्या मधल्या - "जिनके सर हो इश्क़ की छाँव पाँव के नीचे जन्नत होगी" चा प्रत्यय येणार होता लवकरच. मी फार काही प्रवास केलाय असा नाही पण आतापर्यंत वेळणेश्वर, कोकण, श्री शैल्यच्या जंगला मधला महादेवचा मंदीर, गोवा , आणि अगदी पुण्या जवळचा तामहणी घाट यानी थोड़ा फार तरी जन्नत चा अनुभव दिलाच आहे. त्यामुळे दांडेली वर तो विश्वास होताच. दोन्ही बाजूनी दाट झाड़ी आणि मधे मक्ख़न के माफिक रस्ता बॉस. अशा रस्त्यातून सुसाट बस घाल

हलका फुलका रविवार

Image
हलक फूलक लिहायचा प्रयत्न......!!! तसा कुठल्याही प्रकारचा दिनक्रम निश्चित नसताना ही ७ वाजता मी रविवारी डोळे उघडले ही तर खर सूर्य देवाच नशीब च म्हणायला हव, पण पाणी भरण्यासाठी ६ वाजता झालेली 10 मिनीटाची झोपमोड मी आणखी 2 तास झोपून थोड़ी फार पूर्ण करायचा प्रयन्तं केला. शेवटी जनाची नाही मनाची म्हणून तरी आम्ही 10 वाजता साक्षात या वसुंधरेवर चरण उभे करायचे कष्ट घेतले....पाहतो तर अस्मादिकाची बहिण calculator वर खुटुर खुटुर करत Sem च्या शेवटच्या पेपर ची तयारी करत होती. तेव्हा या चहा च्या आहारी जिवाला चहासोबत दोघांच्या न्याहारी ची ही जबाबदारी आपल्यावर आहे अस नैतिक बंधन समजल. दोन्ही एकत्र बनवून तो विषय मोकळा ही करून टाकला. श्री व सौ तीर्थरूपाना घरी फ़ोन करुन हालहवाल दिले. आता खरा प्रश्न होता या रविवारी करायचा काय. सर्वात महत्वाचा म्हणजे आज माझी मानलेली प्रेयसी कु चंचला , ती हो honda ची लेक. तिला कागदो पत्री सगळे activa म्हणतात पण आम्ही आपला मराठी बाणा म्हणून तिला चंचला च म्हणतो. तर ही आमची चंचला गेले 8 दिवस रुसुन होती पार्लर ला जाण्यासाठी, आपला रूटिन मेंटेनेंस. तसा गेल्या महिन्यात

डेक्कन कार्नर ची गर्दी आणि बस

संध्याकाळी 6.45 च्या आसपास , डेक्कन कार्नर सारख्या भयंकर गर्दीच्या stop वर, एक काठीने कानोसा घेत काळ्या चष्म्याची महिला PMT मधे चढते, गर्दी मधे ऊभी राहते, कोणीही फारशी मदत न करता चाहुली वरुन तिला कळत 2 सीट पुढची जागा रिकामी झाली आहे, ती बरोबर तिथे बसते. पुनः कोणालाही न विचारता तिला कळत की आपला स्टॉप आला आहे ती उतरायला निघते. तिला उतरून जाण्यासाठी जागा करुन द्या हे ड्राइवर नी बाकीच्याना हाका मारुन सांगाव लागत. आणि आपण वेडे म्हणतो 50 डोळस लोकांमधे एक अंध होती. खर तर 4-5 खऱ्या डोळस, बाकीच्या पूर्ण अंधामधे एक शारीरिक अंध होती ©प्रसन्न कुलकर्णी [Pk]

गीता जयंती आणि नाताळ

Image
जसा Dec चालू झाला तसे ख्रिसमस चे msgs येत आहेत आणि मी पाहिलेली लहान मूल जी आत्ता convent किंवा ICSE मधे शिकत आहेत ती आता पासून celebration ची तयारी करत jingle bell jingle bell गुण गुणत आहेत ,फार तर 3-4 ठिकाणी गीता जयंती विषयी काहीतरी वाचल. नाही माझ काही म्हणण नाही तो सर्व धर्म समभाव का काय तो ठीक आहे पण वाइट तेव्हा वाटत जेव्हा नास्तिक किंवा 90's chya नंतरच तरुण रक्त (मी ही 90's नंतर चा आहे हा) आपल्याच गोष्टीविषयी वाद घालतो त्याचे पुरावे मागतो आणि शेवटी तुम्ही फार देव देव करता , या जग बघा कुठे आहे तुम्ही रामायण महाभारतात अङ्कुन पड़ता u are so outdated वेगेर बोलून 25 तारीख आली की मेरी ख्रिसमस म्हणत त्या झगमगित झाड़ा भोवती नाचायच का तर तो दाढी वाला येतो . आणखी काही वर्षानी गीता जयंती असेल मुलगा विचारेल Mummy What is mean by Jayanti...? आई पूर्ण ऐकून न घेता सांगेल it means bday...!! चिरंजीव पुनः Granny said today is Geeta Jayanti it means Geeta Didi who comes for cooking daily, is her bday today...? ☺ ही कल्पना सुद्धा करवत नाही. त्यापेक्षा आमची 21 शतक चालू व्ह