आजीचा राम...!! राम नवमी

 Ram Navmi 4 April 2017

कधीतरी तरी सकाळी झोपेतुन उठत असतो, डोळे अर्धवट उघडलेले असतात. आणि लटपट लटपट करत आजी चालत यायची.
"अग काय आहे हे आज्जी? नकोय मला."
"गप रे. अंगारा आहे रामाचा. रात्री ४ वेळा दचकुन उठलास. TV पाहता नको तितका, एवढा एवढा अंधार दिसला की लगे घाबरून पण जाता."
"अग पण आता स्वप्नं ना कस कळेल, अंगारा लावलेला. आणि समजा समजलच तरी काय करणार हा अंगारा."
"नसेल काही करत तरी लाव म्हणल की लावायच, उगाच प्रश्न विचारु नये. आमचा समाधान म्हणून तरी."
किती वेळा सांगितल रोज उठून रामरक्षा म्हणावी. रामरक्षे मधे एक एक श्लोकात एकेका अवयव भोवती कवच निर्माण होता."
हे असा Scene आमच्या कड़े कित्येक वेळा झालेला आहे.
अत्यंत देव भाबड़ा असलेली आजी लोकांची जमात देव आणि फूल पाहिले की भयंकर खुश होतात. गेल्या विस वर्षात आठवत तस असा एकही दिवस नसेल गेला जिथे राम आणि श्रीक़ृष्णा ला फूल वाहिल गेला नसेल. ती रोज सकाळी अंघोळ झाली की १२ वा , १५ वा अध्याय आणि रामरक्षे च्या रूपानी 10 मिनीट द्वापार युगात आणि १० मिनीट त्रेता युगात फिरून यायची. याला गुडघे दुखी आडवी नाही यायची हे नशीब.
Computer म्हणजे वेळ वाया घालायची गोष्ट असा समज असलेली तिला जेव्हा गीत रामयणाची सर्व गाणी ऐकवली तेव्हा याचा सदुपयोग होतो हे तिला समजल. आणि दिवस भर स्वयें श्री गुण गुणत तिनि कौतुक केलेला आठवत.
लहान असताना आपल्याला फार प्रश्न विचारायची सवय असते. असा काही विचारल की तीच उत्तर खुप तर्क शुद्घ.
"राम म्हणजे कवच हे कुठेही आपल्या सोबत असत. कोणाला राम राम म्हणतो आपण तिथे राम येतो आणि गेल्यावर श्री राम जय राम जय जय राम जपला जातो. म्हणजे कोणी आला तरी राम आणि गेला तरी.मला विश्वास आहे मला माझा राम असाच घेऊन जाणार. कशाला हवय तो दवाखाना , त्या गोळ्या. आम्ही पिकल पान आणि तोंडी रामनाम असच बसल्या बसल्या गळून पडणार."
बहुधा तो राम ही तिच्या ऐकण्या बाहेर नव्हता. अगदी तसाच घेऊन गेला. क्षणाची उसन्त न देता.
या रामरक्षे चा काय ते कौतुक. कधी रागावल नाही तिने की रामरक्षा म्हणाली पाहिजे. पण आधी तिचा Toning मुळे त्यातल्या शब्द रचने मुळे ते आवड़ायला लागायच.
माता रामो मत्पिता रामचंन्द्र: ।
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र: ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु ।
नान्यं जाने नैव जाने न जाने
हे वाक्य ऐकल की कविता म्हणत आहोत असा वाटून मस्त वाटायच. यावर विश्वास किती बसला तेव्हा किती नाही माहीत नाही. शिकवल आईने ने असल तरी गोडी लावायच काम या आज्ज्या कडूनच होता हे नक्की.
तिच्या मते तरुण पोरानी गायत्री मंत्र , रामरक्षा , एखादा अध्याय रोज म्हणावा. गायत्री मंत्र तुम्हाला ऊर्जा देईल, रामरक्षा रक्षण करेल आणि गीता नीतिमत्ता शिकवेल.
कितपत होत कितपत नाही माहीत नाही. पण ती आठवली फारच किंवा उगाच अस्वस्थ वाटल कधी कधी की आपोआप ओळी मनात आठवतात-
॥ अथ ध्यानम् ॥
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्मासनस्थं आणि पुढे चालू.....

© प्रसन्न कुलकर्णी [PK]

तळ टीप:- सध्या त्याला स्वताला पुनः वनवास आला आहे अयोध्येत ते वेगळ, सध्या त्याला कवच देणार कोणी नाहिय. आता योगी तो दूर करतील का पहायच. राजकीय पोस्ट वर्ज्य असल्याने कानाला खड़ा...!!

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!