डेक्कन कार्नर ची गर्दी आणि बस



संध्याकाळी 6.45 च्या आसपास , डेक्कन कार्नर सारख्या भयंकर गर्दीच्या stop वर, एक काठीने कानोसा घेत काळ्या चष्म्याची महिला PMT मधे चढते, गर्दी मधे ऊभी राहते, कोणीही फारशी मदत न करता चाहुली वरुन तिला कळत 2 सीट पुढची जागा रिकामी झाली आहे, ती बरोबर तिथे बसते. पुनः कोणालाही न विचारता तिला कळत की आपला स्टॉप आला आहे ती उतरायला निघते. तिला उतरून जाण्यासाठी जागा करुन द्या हे ड्राइवर नी बाकीच्याना हाका मारुन सांगाव लागत. आणि आपण वेडे म्हणतो 50 डोळस लोकांमधे एक अंध होती. खर तर 4-5 खऱ्या डोळस, बाकीच्या पूर्ण अंधामधे एक शारीरिक अंध होती
©प्रसन्न कुलकर्णी [Pk]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!