महानगर पालिका प्रचार यात्रा



आला रे आला XYZ पक्षाचा वाघ आला.....!!
एकच वादा आमचे ABC दादा....!!
आवाज कुणाचा PQR ताईंचा....!!
गपा रे लेकानो.....किती आवाज करता....!!!
महानगर पालिकेची निवडणूक ही.
नावाप्रमाणे न.ग.र. म्हणजे नळ गटार आणि रस्ता याच साध सोप राजकारण. यासाठी कोणाचा उथळ वादा, खोटा आवाज आणि निधड्या छातीचा वाघ हवाय कशाला रे बेम्बट्या....साध माणूस असेल आणि ५ वर्षात २५ वेळा तोंड दाखवणारा तरी चालेल गो आम्हाला....!!
दान तर खुप प्रकारचे असतात-
दिलेल धनदान कोणाच्या खिशात जात कोणाला माहित. पिंड दान जात असेल पितरां पर्यन्त पण असतो का सर्वांचा विश्वास त्यावर. पूण्य वगैरे असेल पडत पदरात पण होतय की नाई चीज त्याच येत का पाहता आपल्याला....!!!!
तेव्हा पासून ३ च दान देण्यावर थोड़ा तरी विश्वास आहे...
अन्नदान- अपल्यासमोर समाधनानी पोट भरत कोणाच तरी.
रक्तदान- एकाच वेळी वाचवतो आपण निदान ४ प्राण
शेवट साला मतदान- याला लोका हक्क काय म्हणत मला नाई कळत. जो करतो त्यासाठी हक्क, जो टाळतो त्यासाठी कर्तव्य आहे हे शिपुर्ड्या...!!
आता ओरडू नका रे....वाघवरची कमळा बाई पहावी की हाती घड्याळ घ्याव बघू आम्ही. नाहीच पटल तर इंजिन पकडू किंवा कोणीच नाई च दाबू बटन. घरी नाही बसणार हे नक्की. हो पण बसला कोणी तर सांगा मला, त्याची आजि आठवून देऊ आपण.....!!

©कुलकर्णयांचा शेजारी अंतू बर्व्यञ्चा पणतू...!! [PK]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!