मी कोणी लेखक नाही, कवी नाही. जे काही थोडं फार वाचतो,पाहतो,ऐकतो,अनुभवतो आणि त्यात जे जाणवत आणि ज्याविषयी ४ लोकांसमोर काहीतरी व्यक्त करायचा प्रयत्न करतो असा छोटासा स्वच्छंदी.
भेट द्या...वाचा...शक्य असेल तर अभिप्राय द्या..!!
Uri हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइक
पचवूनी झाले वार हजारो…! परी वार 'उरी'(#Uri) चा सहन न झाला…!!
ध्यास आम्हा जरी मांगल्याचा…! वसा न आमुचा षंढपणाचा…!!
तळपला सिंह तो सिमेवरचा…! प्रश्न आला जेव्हा स्वाभिमानाचा…!!
कोणती गोष्ट तुम्हाला कोणत्या विचार चक्रात घेऊन जाईल काही सांगता येत नाही. १४ तारखेला दुपारी व्हाट्स अँप ग्रुप ला आईने टाकलेला फोटो आला आणि खाली मेसेज होता, "आम्ही दिवेघाट पार केला. थोडा थकवा जाणवतोय पण बाकी सगळ ठीक". त्या क्षणापर्यंत कितीतरी मिश्र विचार डोक्यात घोळत होते. त्यात तुम्ही पहिला आणि महत्वाचा टप्पा पूर्ण केला याचा आनंद होता, पुढचा प्रवास कसा होईल याची काळजी होती. पण का माहित नाही तो अत्यंत भव्य, देखणा पांडुरंग पाहिला आणि निश्चिन्त झालो. लगेच मला भूतकाळातील दोन गोष्टींची आठवण झाली. सन २००१-०२ मी तिसरीत होतो. गुरुवार होता हे नक्की कारण युनिफॉर्म ला सुट्टी होती. अण्णा ( म्हणजे माझे आजोबा) मला सोडायला शाळेत येत होते. तेव्हा रिक्षा गाडी हे लाड नव्हते, चालतं आजोबांचं बोट पकडून शाळेत जायचं हा रोजचा शिरस्ता होता. वाटेत बाबांचे कोणीतरी मित्र भेटले आणि चला सोडतो दोघांना म्हणाले. मी दोघांच्या मधे बसलो होतो. अजून थोडा रस्ता सरलां न सरला तेव्हा आजूबाजूचे लोक ओरडायला लागले. मला कळत नव्हत काय चाललय पण त्या काकांना कळलं असावं. त्य...
मोठी माणसं सांगत असतात आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर त्याविषयी बोलू नये....आणि लिहू तर अजिबातच नये. पण मोह अनावर झाला आणि तो का झाला हे खाली कळेल च...अर्थात लहान तोंडी फारच मोठा घास म्हणावा लागेल याला.. आपण मोठे होतो आणि होताना आजबाजूच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला old fashioned वाटायला लागतात, आणि आपण नवीन गोष्टी मधे धुंद होतो. त्या बऱ्याच गोष्टी मधे संगीत हे पहिल्या तीनात येत असाव. त्यात आपल्याला भावगीत भक्तीगीत वगैरे अस नुसत ऐकलं तरी हे काय बोरींग किंवा म्हाताऱ्यांसारख देवाची गाणी लावलीयत अस होत जे वयानुसार साहजिक आहे. माझ्या ही शाळा कॉलेज पासून आणि मोबाईल हातात आल्यापासून त्यात मराठी हिंदी देशी विदेशी गाण्याच्या कित्येक playlist फोन मधे बनवलेल्या होत्या. त्यात आता सोने पे सुहागा म्हणता येईल अशी आपल्याकडे एक अफाट गोष्ट आहे ती म्हणजे वेग वेगळे बँड्स जुन्या गाण्यांना नवीन वर्जन मधे म्हणतात काही रिमेक तर काही फक्त नवीन गायक तर काही फक्त नवीन म्युसिक लाऊन वगैरे. यांच्या कल्पना भन्नाट असल्या तरी ही लोकं काही गाण्याचं अगदीच वाभाड काढतात तर काही...
काही महिने आधी धनश्री लेले यांचं गीतेच्या अकराव्या अध्यायाच निरुपण ऐकण्यात आलं. आधी असलेली थोडी फार माहिती त्यांनी अत्यंत रंजक पद्दतीने मांडली त्यामुळे जास्त लक्षात राहिली आणि शिवाय तो विचार खूप वेगळ्या अर्थाने डोक्यात घोळत होता. त्याच कारण तो असा कि- पहिल्या ९ अध्यायामध्ये भगवंतानी सांख्य योग, ज्ञान योग, कर्म योग, कर्म सन्यास योग असे अनेक योग सांगितले तरी अर्जुनाचं पूर्ण समाधान झालं नव्हत, अनेक प्रश्न पडत होते. म्हणून १० व्या अध्यायात तो म्हणतो कि हो बाबा मला मान्य आहे भगवंता सगळ्याचा दाता, परम ब्रह्म, परम धाम तूचआहेस, आम्ही शेवटी केवळ तुझ्यात एकरूप होण्यासाठी आसक्ती रहित कर्म करत जगले पाहिजे पण तरी मला सांग "केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ?" म्हणजे "कुठे कुठे मी तुला शोधू शकतो, तुझं निरंतर चिंतन करू शकतो ?". लगेच भगवंत म्हणतात कि " हन्त ते कथयिष्यामि " कि बाबा रे ऐक आता मी तुला सांगतो माझी सगळी रुपे. मग एकेक करून भगवंत अर्जुनाला सांगतात कि बघ...
Comments