#Highway_moments 1

 1 -26. Mar 2016

वार- शुक्रवार
स्थळ- खड़की सिग्नल
रोजच्या प्रमाणे सकाळी ९-९.३० वाजता जात होतो. खड़की च्या तिथे सिग्नल लागला गाड़ी थांबवली. माझ्या बाजूला थोड़ मागे एक रिक्षा होती. त्या रिक्षावाल्या काकानी माझ्या मागच्या Bike वाल्याला विचारल ते कानावर पडल
"दगडुुशेठ मंदिरला कस जायचा ?"
मग त्या Bike वाल्या मित्राने हेडफोन्स काढून मोठ्या कष्टाने पत्ता सांगितला. ते काका पुनः म्हणाले-
"किती वेळ लागेल ?"
तो Bike वाला पुनः म्हणाला ही ट्राफिक ची वेळ आहे. आणखी २० मिनीट लागतील. खर तर मनात वाटत होता रिक्षावाल्याला दगडुुशेठ माहीत नसेल तर हा धंदा करावा कशाला?.
पुनः त्यानी त्या Bike वाल्या ला हाक मारली पण आता दादानी बहुतेक हेडफोन्स लाऊन Music चालु केला होता, त्यांनी मला विचारल इथ ज्यूस किंवा नारळ पाणी कुठे मिळेल. आम्ही मुंबई वरुन आलोय आणि या पोराला हवय. मी वाकुन पाहिल खरच MH ०३ होता. मागे कुटुंब होता. मध्यभागी १२-१५ वर्षाचा मुलगा. जो ग्लानि आल्या सारखा वाटत होता. हाताला सलाइन काढल्या वर असत त्या पट्या. बाजूला आई आणि त्याचा कदाचित भाऊ असावा.
माहीत नव्हतं काय झाला होता त्याला, पण उपचार घेत असताना त्यानि देव दर्शनाला याव. काही गंभीर असेल किंवा नसेल ही. आधी मला हे अव्यावहारिक वाटल. त्यांनी पेशेंट ला त्रास का द्यावा उगाच किंवा रिक्षात आल्या पेक्षा अजुन काहि उपाय केला असत तर पैसा आणि कष्ट वाचले असते वगैरे.
पण नंतर कळून चुकल जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
आता हा बिचारा सिद्धिविनायक, लालबाग चा राजा हाकेच्या अंतरावर असून इकडे आला खरा पण आमच्या देवाने धक्का बुककीची गर्दी, हजारों चे देणगिदार, सुरक्षा रक्षक, बुलेट प्रूफ वॉल यातून याला जायला थोडी जागा द्यावी म्हणजे झाल. यातून काय मिळेल का त्याला माहीत नाही. पण अजुन ही आपल्या सारख्या बाळ बोध लोकांचा विश्वास आहे की
-नमस्कार फुकाचा पण आशिर्वाद लाखाचा-

©प्रसन्न कुलकर्णी [PK]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!