लक्ष्मी रोड आणि बाप्पाच्या गप्पा



"काय रे राजा...?? थकला का रे तू खूप..??"
१० दिवसांची वर्दळ पाहून आरामाला लागलेला लक्ष्मी रोड या गूढ आवाजाने दचकला. कोणाचा आवाज आहे याचा अंदाज घेऊ लागला.
"अरे पाहतोय काय तुलाच बोलत आहे मी, तुझी चौकशी करायला आलो आहे मी."
"अरे हो पण आपण आहात कोण..??"
"मी तोच ज्या साठी सगळा अट्टहास चालू होता १० दिवस...!!!"
"बाप्पा चक्क तुम्ही...? आत्ता आराम करायचा सोडून इकडे कुठे...??"
"कालची गर्दी पाहून वाटल,आपला तसा कधीचा सहवास,पण आपण कधी बोललोच नाही....बोलाव जरा तुझ्याशी..!! इतके वर्ष तू मला, माझ्या भक्ताना, आमचा झगमगाट, सगळा आवाज, यातल्या हौषा नवशा गवशा ना प्रेमाने हक्काने किवा कधी नाइलाजाने सांभाळत आला आहेस. तुझी विचारपूस तर करायलाच हवी. दमतोस का रे यात तू...?"
"अहो बाप्पा सवय झालिय मला याची. आणि तुमच्या निमित्ताने हजारो लोकांचे पाय पुण्याला लागतात, त्याचा थोडा भार घेण्यात काय आहे. आणि आला आहात च खरा तर तुम्हाला धन्यवाद द्यायला हवेत."
"धन्यवाद रे कशाचे..?"
"अहो तुमच्या मुळे तर मला वेगळ वैभव प्राप्त झाल. लोक तुमच्यामुळे मला देखील ओळखायला लागले. दरवर्षी साक्षात श्री म्हणजेच १८ विद्या ६४ कला का काय म्हणतात ना त्यांचा सहवास मला लाभला आहे. कदाचित म्हणून च इथे वसलेल्या प्रत्येक व्यापाराची देखील भरभराट झाली. आणि माझया नवा प्रमाणे लक्ष्मी चा हात प्रत्येका ला लागला. मला स्वता ला वेगळी ओळख मिळाली. पण देवा....इतकी सुंदर मिरवणूक आणि पाऊस याच गणित काही कळत नाही मला. यामुळे खूप जणाचा भ्रमनिरास होतो असा नाही का वाटत आपल्याला,....हे तुम्ही थांबवु नाही का शकत??"
"होत असेल खरा भ्रमनिरास पण याचा एक फायदा पण होतो माहिती का तुला...?
जे हिंदू आहेत ज्याना माझ आकर्षण ते माझ्यासाठी, बाकी धर्मीय आणि जे मला मानत नाही ते देखील इथे जमतात तो इथला डामडौल पाहायला. प्रत्येक जण येतो आपला प्रतिष्ता घेऊन, कोणी उंची कपडे घालून, महागडे अत्तर वापरुन, महागडे फोन मधून शोभा करत, तर कोणी खूप दारिद्रयातुन, कसे बसे पोट भरून. प्रत्येकाच्या डोक्यात विचार निराळे, कोणी आनंदी, कोणी दुखी, कोणी चिंतेत कोणी उत्साही, ९ रस एकत्र फिरत सगळे.
या सगळ्याना एका दर्जा वर आणि पातळीवर आणायच काम हे दोघ करतात एक म्हणजे ढोल आणि दुसरा पाऊस.
एक ढोल आहे ज्याच्या एकेक ठोका भल्या भल्या च्या शिरा ताड ताड उडवत, उत्साह आणि त्वेशा नि नाचवत असतो, आणि आणि दुसरा पाऊस सगळे खोटे रंग, चिता, थकवा आपल्यात वाहवून टाकत असतो
खरा तर हे सगळे एकत्र आनंद घेत असतात यात निमित्त माझ पण या खोट्या रंगाच आणि भेदभावच खरा तर विसर्जन होत असता. आणि हे ओघळळुन सार तुझ्यात मिसळून जात यामुळेच कदाचित तू प्रत्येंक क्षणा नंतर अजुन चमकत असवास.
"खरा आहे देवा, असा विचार कदाचित माझ्या मनात आला नसेल. तसा असेल तर हा नेहमी आला तरी चालेल....!!
तू आला खरा बाप्पा पण मी आता निघतो, रोजचा ग्राहक थांबला होता १० दिवस आज येतील सगळे. हा कर्म योग माझा चालत च राहणार आणि आपण ही भेटत राहणार."
Prasanna Kulkarni

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!