गीता जयंती आणि नाताळ



जसा Dec चालू झाला तसे ख्रिसमस चे msgs येत आहेत आणि मी पाहिलेली लहान मूल जी आत्ता convent किंवा ICSE मधे शिकत आहेत ती आता पासून celebration ची तयारी करत jingle bell jingle bell गुण गुणत आहेत ,फार तर 3-4 ठिकाणी गीता जयंती विषयी काहीतरी वाचल. नाही माझ काही म्हणण नाही तो सर्व धर्म समभाव का काय तो ठीक आहे पण वाइट तेव्हा वाटत जेव्हा नास्तिक किंवा 90's chya नंतरच तरुण रक्त (मी ही 90's नंतर चा आहे हा) आपल्याच गोष्टीविषयी वाद घालतो त्याचे पुरावे मागतो आणि शेवटी तुम्ही फार देव देव करता , या जग बघा कुठे आहे तुम्ही रामायण महाभारतात अङ्कुन पड़ता u are so outdated वेगेर बोलून 25 तारीख आली की मेरी ख्रिसमस म्हणत त्या झगमगित झाड़ा भोवती नाचायच का तर तो दाढी वाला येतो .
आणखी काही वर्षानी गीता जयंती असेल मुलगा विचारेल
Mummy What is mean by Jayanti...?
आई पूर्ण ऐकून न घेता सांगेल it means bday...!!
चिरंजीव पुनः Granny said today is Geeta Jayanti it means Geeta Didi who comes for cooking daily, is her bday today...?
ही कल्पना सुद्धा करवत नाही. त्यापेक्षा आमची 21 शतक चालू व्हायच्या आधीची पिढी बरी रे बाबा....
अथ पंचदशोध्यायः श्री भगवान् उवाच- असा आजीचा आवाज ऐकू आल्या शिवाय लहानपणी खरी सकाळ झाल्या सारख वाटायचच नाही....त्यात भर म्हणून आजोबा मधेच कोणत्या ही श्लोकचा मराठी अनुवाद सुरु करायचे, या दोघमुळे गीतेविषयी कुतूहल लहान पणा पासून चालू झाला.
देव म्हणून सोडा कारण मि स्वतः काही फार आस्तिक नाही आणि पण आज लोक 15 days to go for chrismas आवरा....!!
तुमचा तो संत्या काळा की गोरा माहीत नहीं आणि gift देणार का तर अजिब्बात नाही, पण आमचा कृष्ण एकदम कृष्ण वर्णीय माहितीय बरका आम्हाला आणि दरवर्षी नाही एकदाच दिलाय त्यानी gift हजारो वर्षा पूर्वी ते आजसुधा पुरुन उरत आहे आणि त्याची सुद्धा आम्ही जयंती साजरी करतो आहे कीनी भारी.
ज्या महाभारतानी कुंती पुत्र कर्णवरचा अन्याय पहिला, कर्णानी ब्रह्मस्त्रा साठी परशुरामसमोर लपवलेली जात पाहिली, द्यूत खेळत बायको पणाला लावलेली पाहिली, त्याच बायको च भर सभेत चिर हरण पाहिले, शेवट तर आपल्याच बंधू आणि गुरुंसमोर शस्त्र चालवव असा सत्तेचा खेळ पाहिला. या सगळ्याचा अर्क आहे गीता.
18 अध्याय आणि 700-750 श्लोका मधे अवघ ब्रह्माण्ड मांडून ठेवला आहे ज्यात शिष्टाचार आहे, राजनीती आहे, कर्म आहे, सत्य आहे आणि तिथेच खरी कालियुगाची सुरुवात ही आहे जिथे आपण आत्ता आहोत
व पु काळे यांच्या वपूर्झा मधे एक वाक्य आहे
" आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाला गीतेमधे उत्तर दिल आहे. सगळे प्रश्न सोडवनारा है ग्रंथ आपण आयुष्यभर वाचत नाही आणि जेव्हा आपण आपल्याच घरात जेव्हा एक प्रश्न बनून राहतो तेव्हा आपण हे वाचायला घेतो. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केला ते आपण म्हातार पणी वाचतो"
असो At the end गीता जयंती झाली बाकी जे वाट बघत आहेत त्या दाढ़ी वाल्याची त्याना तो लख लाभ
प्रसन्न कुलकर्णी

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!