दांडेली माझ्या शब्दात




उठी उठी गोपाला ही भूपाळी आणि रुणानुबंधाच्या गाठी सारख्या मधाळ सुरानि कुमार गंधर्वन्च्या आवाजात 12 तारखेची सकाळ झाली होती. बस मधल्या एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्क्याहुन कमी म्हणजे फार तर अर्धा डझन लोकांना fresh करण्यात गंधर्वना यश आल होत. बाकी ६६ टक्के जनता ही विश्वामित्रसारखी साखर झोपेत ध्यानस्थ होती यांना जाग करायची जबाबदारी ड्राइवर केबिन मधल्या dj नी हेलेन आणि मलाइका वर टाकली आणि त्यांनी ही महबूबा आणि चल छैय्या छैय्या या भावगीतानी व्यवस्थित पूर्ण केली. आता संपूर्ण पब्लिक टकाटक fresh झाला होत. अंदाज आला की दांडेली आता आवाक्यात आल आहे. त्याच चल छैय्या छैय्या मधल्या - "जिनके सर हो इश्क़ की छाँव पाँव के नीचे जन्नत होगी" चा प्रत्यय येणार होता लवकरच. मी फार काही प्रवास केलाय असा नाही पण आतापर्यंत वेळणेश्वर, कोकण, श्री शैल्यच्या जंगला मधला महादेवचा मंदीर, गोवा , आणि अगदी पुण्या जवळचा तामहणी घाट यानी थोड़ा फार तरी जन्नत चा अनुभव दिलाच आहे. त्यामुळे दांडेली वर तो विश्वास होताच. दोन्ही बाजूनी दाट झाड़ी आणि मधे मक्ख़न के माफिक रस्ता बॉस. अशा रस्त्यातून सुसाट बस घालून जनता Nature Nest मधे पोचली. नावाला साजेस असलेल हॉटेलनी मला सुमन कल्याणकरांच्या असावे घरटे आपुले छान च अक्खे lyrics आठवून दिला.
आजचा मुख्य कार्यक्रम River Rafting चा होता. सुदैवानी आज पाणी सोडण्यात आल आहे आणि Rafting शक्य आहे हे समजल लगेच संयोजकानी ही बुकिंग केल. जेवण आटपुन आम्ही तिकडे निघालो. खर तर rafting च नाव ऐकूनच माझ्या पोटात कमीत कमी ३०० ग्राम चा गोळा आला होता. पण अंदाज घेतल्यावर कळल की माझ्यासारखे आणखी ४-५ जण पोहता न येणारे होते. आम्ही स्वताचीच वाचा बसलेली असताना तसच एकमेकांना समजवत गेलो. भित्या पाठी ब्रह्म राक्षस म्हणतात तस आधी काय कमी फाटली होती त्यात ते अगम्य कानड़ी भाषेत बोलत वेगवेगळ्या Declaration वर सह्या घेत होते. त्यावेळी खर त्या सह्या करताना माझ चेहरा त्या विवाह मधला आलोकनाथ दवाखान्यात सही करताना चेहरा करतो त्यापेक्षा जास्त टरकला होता. सगळे सोपस्कार करुन आम्ही activity च्या जागी पोचलो. तिथे ते life Jackets, Helmets आणि paddle देऊन तयार केल. ८-८-३ मधे विभागुन आम्ही बोटित चढलो. बोटित त्यानी आम्हाला बेसिक ट्रैनिंग द्यायला चालू केल. Paddle कस चालवायच पासून emergency ला पड़लोच खाली तर काय करायचा, कसा परत यायचा वगैरे. आणि लगेच त्यानी आम्हाला भीति कमी करायला उडी मारायल सांगितली सगळे एक सुरात ओरडले " अबे येड़ा का खुला तू, मारतो का काय आता" पण त्यानी आग्रह च केला आणि आणि आम्ही पाण्यात डुम्बलो. वाह ते अफलातून ५ मिनिट, खाली निवांत पाणी त्यावर आपण झोपलेले आणि वर स्वच्छ आकाश. बस बाकी काही नाही. भीति तर गेलिच पण आलेली मजा भारी. पुढचा एक तास ते पाणी, त्यातल thrill. दोन बोटिंची water war, एकीकडे जो बोले सो निहाल आणि दुसरीकडे हे महिष्मति चा आवाज. नविन पक्षांच्या भेटी. सगळ भारिच. त्या रात्रि शांत थंडी, पिवळसर चंद्र यात camp fire चा बेत जमुन आला होता. गेम्स आणि गप्पा मारुन शेवट सगळ्या बेसुर्या पण हौशी किशोर कुमार आणि आशा भोसले च्या एकेका कड़वे म्हणून झाला.
१३ ला सकाळी ५ वाजता अर्धवट झोपेतली जनता जंगल सफारी साठी जमली. त्या किट्ट अंधारात गौरी ( Travels) आपल्या dim light मधे चांदणे शिंपीत जाशी चलता मी चंचले च्या style मधे आम्हाला घेऊन जात होति. अजुन आम्ही सफारी घड़वनारी टीम कड़े जात असतानाच २ कोल्हे आम्हाला पास झाले. आणि बहुतेक साधा न बघता परत ही गेले पाठ दाखवून. ही काय पद्धत आहे का पाहूणचाराची असा जाब विचारायला आम्ही खाली उतरणार होतो पण ते कन्नड़ कोल्ह्याना मराठी बोलन्यत काहीच पॉइन्ट नव्हता सो आम्ही पण आपला स्वाभिमान दाखवत परत फिरायचा निर्णय घेतला आणि २ तास झक्कास झोप काढली. ( कन्नड़ रांगोली च्या पाट्या , काड कुड भाषेतले लोक यामुळे चुकामुक झाली ही आतली गोष्ट पण Publically असा नाही बोलू )
थोडा उजडल्या नंतर आणखी काही छोटे जीव होते ज्यांच कालच पाणी खेळून तहान भागली नव्हती. त्यांना बाकीच्या activities मधे बुचकळून आणायची जबाबदारी एका संयोजकनि घेतली, आणि पाण्यात पाय ठेवनार नसेल तर त्यांचे वेडे वाकड़े expression चे फोटो काढायची धमकी मला देण्यात आली. तोपर्यंत बाकीच्यानी गप्पा आणि टेबल टेनिस खेळून वेळ काढला. त्या टेबल टेनिस चे तर आम्हाला शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत. २ दिवसात त्यावर दोघा तिघानी table tennis, बाकीच्यानी शक्य तितके अत्याचार करत टेनिस, बैडमिंटन, छोटा क्रिकेट वेळ प्रसंगी हवेत बॉल टाकून पाहिजे त्यावर हल्ला पण करुन झाला होता.
तर अशा या १.५ दिवसाची ट्रिपचा शेवट आणि संक्रांतीची सुरवात दुपारच्या जेवणातल्या एका सुगरणीच्या हातच्या गुळ पोळी ने झाली. ५ min साठी ती पोळी खात मी दांडेली मधून थेट लातूर च्या घरी जाऊन आलो.
फोटो वेडी मंडली ती लवकरच upload करतीलच, प्रतिनिधिक २ फोटो खाली आहेत.
( Thanks To all people who gave awesome company in this 2 Days)

©प्रसन्न कुलकर्णी [PK]😎

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!