हलका फुलका रविवार

हलक फूलक लिहायचा प्रयत्न......!!!

तसा कुठल्याही प्रकारचा दिनक्रम निश्चित नसताना ही ७ वाजता मी रविवारी डोळे उघडले ही तर खर सूर्य देवाच नशीब च म्हणायला हव, पण पाणी भरण्यासाठी ६ वाजता झालेली 10 मिनीटाची झोपमोड मी आणखी 2 तास झोपून थोड़ी फार पूर्ण करायचा प्रयन्तं केला. शेवटी जनाची नाही मनाची म्हणून तरी आम्ही 10 वाजता साक्षात या वसुंधरेवर चरण उभे करायचे कष्ट घेतले....पाहतो तर अस्मादिकाची बहिण calculator वर खुटुर खुटुर करत Sem च्या शेवटच्या पेपर ची तयारी करत होती. तेव्हा या चहा च्या आहारी जिवाला चहासोबत दोघांच्या न्याहारी ची ही जबाबदारी आपल्यावर आहे अस नैतिक बंधन समजल. दोन्ही एकत्र बनवून तो विषय मोकळा ही करून टाकला.
श्री व सौ तीर्थरूपाना घरी फ़ोन करुन हालहवाल दिले. आता खरा प्रश्न होता या रविवारी करायचा काय. सर्वात महत्वाचा म्हणजे आज माझी मानलेली प्रेयसी कु चंचला , ती हो honda ची लेक. तिला कागदो पत्री सगळे activa म्हणतात पण आम्ही आपला मराठी बाणा म्हणून तिला चंचला च म्हणतो. तर ही आमची चंचला गेले 8 दिवस रुसुन होती पार्लर ला जाण्यासाठी, आपला रूटिन मेंटेनेंस. तसा गेल्या महिन्यात तिच्या घरच्या भावकितल्या parlor ( honda showroom) कड़े जाऊं आलो होतो पण पुनः हिचे नाटक म्हणून गल्लितल्या पार्लर Shri Auto Centre ला सोडून आलो. तर अशा या सुन्या सुन्या रविवारी चंचला नाही तर मी अर्धमेला झालो. बाकी काहि वेळ जाण्यासाठी साधन मिळत का पाहू लागलो. अति उत्साहमधे शनिवारिच मैत्रिणींच्या भेटि घेतल्या मुळे आज त्या भेटण तस शक्य नव्हतं. 3-4 मित्रांना त्यांचा काय plan आहे पहाव म्हणल तर ते आपल्या आपल्या चंचलेला घेऊन आपल्या आपल्या विवंचनेच मन रमवायला गेले होते, असो.
शेवटी काहीही नसल की मी आणि बहिण एकमेकवर हिवाळी अधिवेशना पेक्षा जास्त कुरघोड़ी करत, वैचारिक सं'वाद' करत दिवस काढतो, पण तिचा engg sem चा M3 चा पेपर असून ती Probability , Correlations Coefficient Solve करत होति. ज्या विषयाच्या आत्यंतिक प्रेमा मुळे आम्ही eng न व्हायच्या निर्णय घेतला त्यात तिला डिस्टर्ब करणे म्हणजे महापाप. यसोबत माझ्या सुटीच्या धोरणासोबत आज काही correlation जमत नव्हतं, माझा दिवस बोर जाणार याची probability वाढत होती. शेवटी मी मनाची तयारी करुन हा रविवार ह.भ.प. मार्क झुकरबर्ग आणि तत्सम योगयांनी वाहून घेतलेल्या प्रवाहात झोकावा लागणार समजून घेत.
पण म्हणतात ना भगवान के घर धेर है अंधेर नहीं. असच साफ सफाई करताना हाताला लागल box, कोणीतरी वॉलेट गिफ्ट केलेला bday ला त्याचा बॉक्स, यापासून मोबाइल ठेवायला काही करता येईल का असा विचार आला, तसा बहिणीला विचारल तेव्हा त्या civil engg अभ्यासक भगिनीने कागदाची होड़ी करताना 3 दा चुकतो तू आणि विचार बघा असा तुच्छ look दिला. मग स्वाभिमान दुखावला ना भौ....चक्क तो रद्दी बॉक्स, तब्बल 15 रूपड़्यांच material, 2 तासांच labour, आणखी घरच सटर फटर overheads टाकून या लिम्बु टिम्बु कलाकाराची महान कलाकृति तयार झाल. शेवटी तिने 2 तासा मधे मी मोठे ड्राइंग काढ़ते पण बर दिसत आहे असा म्हणाल तेव्हा जरा रविवार कामी आला असा वाटला......!!!

©प्रसन्न कुलकर्णी [PK]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!