Friendship डे आणि शाळा

Friendship Day 2016

"ओ काका, हे Friendship Band कसे दिले?"
"हे ५ला..हे १०चे,आणि हे १५चे..."
"हे साधे ७-८ दया...आणि हे भारीवाले ३-४ दया...."
"बस्स होतिल ना रे रव्या एव्ढे?"
या अश्या संवादांनी शाळेतला फ्रेंडशिप डे सुरू व्हायचा...जस ५-६वी पासून कळत होत, तस ऑगस्ट चा पहिला रविवार हा
इंग्रजाळलेला झाला होता तो या फ्रेंडशिप डे ने...
प्रत्येकाची बेस्ट फ्रेंडची व्याख्या वेगळी....कोणासाठी रोज आपली न चुकता जागा पकडणरा, रोज सोबत येणारा जाणारा,टिफिन शेअर करणारा, सोबत ट्युशन बुडवणारा, कुणाशी भांडायला सपोर्ट करणारा.....आणि बराच काही....!!!!
जशी Friend ची तसच या Band चा ही प्रत्येकाचा हिशेब वेगळा…ज्याच्या हातात जास्त त्याच Friend Circle दणदणीत…जवळच्या मित्रांना Uniqe Design चे Bands …तोंड ओळखीचा मित्र असेल तर त्याने बांधल तरच मी बांधणार असा व्यवहार, शाळेत जिच्याशी चोरून नजरा नजर व्हायची तिला Approach करायला खुश्कीचा मार्ग म्हणजे Friendship Bands,
त्यातून जिच्यासाठी घेतल तिला द्यायची हिम्मतच न होणारे आणि चुकून तिकडुन मिळाल तर ऐतिहासिक वारसा समजून त्याला जपणारे बहादुर ही होते,
आपले पहिले मित्र म्हणून आजी आजोबांना Band बांधुन आपला Emotinal Quotient दाखवणारे किवा सायकल ला Band बांधणारे Chote John Abraham ही माझ्या लक्षात आहेत,
जसे जसे मोठे होत गेलो यातला बालीशपणा कळत गेला, यातल आकर्षण ही कमी होत गेल……या पैकी बरेचसे गायबही झाले नवीन वाटेवर नवीन भेटत ही आहेत……!!!
आणि शेवटी कळून चुकल मित्र नावाची हरामी जमात, वाटेल तितका आपला वाभाड काढायचा हक्क घेऊन बसलेली, कसल्याही गंभीर प्रश्नावर पोट धरून हसणारी
हिला एक दिवस तो काय पुरायचा......
तरी जगाची रीत म्हणून Happy Friendship day…!!
Prasanna

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!