Change is Permanent 2017

Change is Permanent-Timeline Reviews
   
       काही वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्या कड़े एक Key Chain होत, हुक असलेले. आणि एक पेन होत खटका दाबायच. दोन्ही गोष्टी फार यूनिक आणि महाग होत्या का तर अजिबात नाही. किम्मत दोन्हीची प्रत्येकी २०-२५ फक्त. पण कित्येक वर्ष त्या माझ्या कड़े होत्या. ते हुक च Key Chain पँट च्या लूप ला लावायच आणि पेन खिशाला. आणि आजुबाजुच्या लोकांना इतकी सवय झाली होती ते पाहुन. मग ते हरवायच ही नाही. मी कुठे इकडे तिकडे जरी ठेवल तरी ते माझ आहे म्हणून लोक मला आणून द्यायचे. तेव्हा माझी बहिण मला म्हणाली होती.
         ‎
" तू इतका बोर आहेस माहिती का? पेन आणि Key Chain जपायची गोष्ट आहे का? नवीन नवीन ट्राय कराव. तुला जुन्या गोष्टी वापरायला काय आवडत?"

"अस काही नाही. बदलेन कि कंटाळा आला की. पण आता उलट होत. १-२ महीने पुढे गेल आणि की स्वतःला च वाटत अरे अजुन आहे हे. बघू किती जात."

मला वाटलच तिला हे बोर वाटेल पण नंतर ती जे बोलली ते मला विचार करायला लाऊन गेल. ती म्हणे-

"Actullay मला आवडलय हे. मला पण माझी एखादी अशी वस्तु personalise करायचीय. त्या वस्तु साध्या का असेना पण त्या आपल्या आहेत अशी एक ओळख भारी वाटते. जस अण्णा च घड्याळ असेल, आजीचा बटवा असेल, बाबांच मफलर असेल. किती क्षुल्लक आहेत पण आठवत तस यांच्या कड़े च आहेत जशा आहेत तशा."

    खर तर इतका विचार करुन मी काहीच केल नव्हतं. पण खरच खुप वर्ष झाली की काही गोष्टीची सवय होऊन जाते. Emotions वगैरे नसतात पण जितक जून होत जात तितकी Comfort वगैरे आलेला असतो. 'जुने जाउ दया मरणा लागुुनी' असेल पण काही गोष्टी जुन्याच आवडतात.'
हे अस कित्येक वस्तुंसोबत झालाय.लहान पणी ची खुर्ची असेल किंवा पाटी पेंसिल ची पाटी. आता आत्ता पर्यन्त होत्या या. तसाच आपला आफिस, बसायच्या जागा, लोक. चांगल असो वाइट् असो सवय होत जाते. प्रत्येक बदलणार कैलेंडर च पान यांच्या सोबत बॉन्डिंग वाढवत जातो. नंतर कधीतरी त्या कधीतरी खराब होतात, आपल अरेरे अस होत आणि आपण त्याला रिप्लेस करुन पुढे जातो कारण Change is the only permanent and useful coz habits are so cruel...!! बदल होत च असतो आणि हवाच.
   आज हे आठवायच कारण म्हणजे कालपासून सगळ्यांचे २०१७ चे time line review पाहतोय. मी पण पाहिला माझा. ८५ नवीन मित्र आले. लोकांनी फोटोज, पोस्ट् आणि कमेन्ट्सना सगळे मिळून ५००० च्या जवळ दाद दिली. यामुळ लिहायला प्रोत्साहन मिळाल. त्या नवीन लोकांपैकी खुप लोकांच् अफाट लेखन पाहायला मिळाल. पण तो review शेयर कराव अस नाही वाटल. कारण फेसबुक नी फक्त virtual जगातल चांगल चांगल दाखवल. इतर ही खुप चांगल्या गोष्टी ज्या offline अनुभवल्यात. किंवा काही कड़वट गोष्टी. लहान पणा पासुन ज्याना पाहत पाहत खुप गोष्टी शिकलो असा एक माणूस जग सोडून गेला. वय झाल होत जाणार च पण तरी थोड काहीतरी सुटल अस वाटत राहत. काही अफाट लोक आली ज्यांच्या मुळे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. थोड्या फार ईगो मुळे काही दुरावली हि गेली.
   ‎आता हे लिंक करायच कारण म्हणजे पुन्हा कैलेंडर बदलतय. पुन्हा तेच सण वाढदिवस सगळे days येतील. प्रत्येक वर्षाप्रमाणे आफिस कॉलेज इतर असे अनेक लोक त्यांच्या सोबत च्या सवयी चेंज होतील. पण काही लोक आणि त्यांच्या मुळे नवीन मिळालेल्या गोष्टी किंवा स्किल या कित्येक वर्ष त्या Key Chain आणि पेन सारख्या जवळ राहोत असा च प्रयत्न असेल. Personalisation हवच.
दूसरा श्रीमन्त व्यक्ति Warren Buffet च एक वाक्य आणी सवय पण आहे, "My Favourite holding period is forever."  मग shares असो किंवा काही ठराविक गोष्टी किंवा माणस सुद्धा.
हे खरच confusing आहे. आपण म्हणतो Change is only permanent आणी Holding forever सुद्धा. यातल काय चेंज करायचा आणी काय ठेवायच हे जमल की लाइफ झिंगा ला ला....!!!

©प्रसन्न कुलकर्णी [PK]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!