राजकारणी- पण राजकारणा पलिकड़चा

       आपल्याकड़े माणूस कोणत्याही पातळी चा असो. मग ते पदवीधर, नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, कलाकार, तांत्रिक, संशोधक अगदी मग दाढ़ी करणारा, पंक्चर वाला, भाजीवाला त्याही पुढे जाऊन काही येत असो किंवा नसो पण राजकारण सगळ्यांचा आवडता विषय. जो माणूस घरी जाऊन बायको च्या हातात रिमोट पाहुन बातम्या बघायचा प्लान cancel करतो तो विरोध पक्ष आक्रमक हवा म्हणून अक्कल झाड़तो आणि ज्याच M3 निघायची मारामार ते बजेट मुळे देशावर कर्ज वाढल याच गणित पाजत असतो.
        अशा या राजकारण प्रेमी देशामधे कित्येक राजकारणी आले, येतील आणि जातील पण आपल्या नेहमीच्या राजकारणासोबत वेगळ्या गुणा मूळ काही लोक छाप पाडुन जातात मग त्या पक्षाची भूमिका पटेल न पटेल पण तो माणूस मन जिंकून जातो. माझ्या यादिमधे रोखठोक बाळासाहेब ठाकरे, वक्ता राज ठाकरे, अफाट जनसम्पर्क विलासराव देशमुख, दूरगामी प्रमोद महाजन, प्रणव मुखर्जी , मुंडे साहेब हे सगळे पक्षाचे आहेत पण यांनी सगळ्यांच प्रेम कमवल. असाच एक माणूस ज्याने राजकारण सुद्धा कविते इतकेच अलंकारिक केल आणि नेतृत्वाचा पाया रचला तो म्हणजे 'अटल बिहारी वाजपेयी'.
        ‎यांच्या विषयी मी काही लिहाव इतकी मला माहिती ही नाही आणि माझी लायकी ही नाही. शाळेत काहीही कळत नसताना आपले पंतप्रधान कोण यावर दिलेले उत्तर सोडून माझा काही संबंध ही नाही. मग हळू हळू जेव्हा standup Comedians यांच्ये pauses घेऊन नक्कल करायला लागले तेव्हा यूट्यूब पाहिला तेव्हा विलक्षण प्रभाव पाडुन गेला हा व्यक्ति. मग विकिपीडिया, यूट्यूब, गूगल च्या कित्येक लिंक्स पाहिल्या गेल्या. आणि एक आदर निर्माण झाला. कारण माझ अस स्पष्ट मत होत की भाजपा सारखा पक्ष सता मिळवू शकेल एकवेळ पण कांग्रेस इतक पचवू शकणार नाही. अशा या नेतृत्व ची गरज असलेल्या पक्षाला दिशा आणि ताकद दिली अटल जी नी.
संसदेमधे गोंधळ, बहिष्कार, आरड़ा ओरडा असताना आपला मुद्दा कसा मांडवा यामुळे उत्कृष्ठ संसदपटु हा मान यांना मिळाला. नेता या सोबत प्रभावी कवि अशी ओळख
ज्याची आजहि आहे. त्यांची एक कवितेमधे ओळ होती-

जो कल थे, वे आज नहीं हैं।
जो आज हैं, वे कल नहीं होंगे।
होने, न होने का क्रम, इसी तरह चलता रहेगा,
हम हैं, हम रहेंगे, यह भ्रम भी सदा पलता रहेगा।

या ओळी प्रमाणे सत्ता आल्या आणि गेल्या ही. पण हे हरले नाही. पहिल सरकार १३ दिवसात तर दूसर १३ महिन्यात पडल. नंतर जनतेच्या आशीर्वादनी तीसरा टर्म मात्र ५ वर्ष पूर्ण केला. आणि काळ पूर्ण करणारे पहिले बिगर कांग्रेसि सरकार म्हणून नाव चिरकाळ टिकल.

जिथ पक्षाचे फक्त २ खासदार होते तेव्हा पासून खांद्यावर पक्ष हातात घेतला. पद सम्भाळली त्यात बाबरी , गोधरा, हाईजैक केलेला विमान, संसद हल्ला असें नाजुक विषय आले. कारगिल नंतर त्यांनी पाकिस्तान ला उद्देशुन कविता केली होती. त्याच्या ही ४ ओळी अवडलेल्या-

'पर तुम क्या जानो आजादी क्या होती है
तुम्हें मुफ्‍त में मिली न कीमत गई चुकाई
अंगरेजों के बल पर दो टुकड़े पाए हैं
मां को खंडित करते तुमको लाज न आई।'

सोबतच एकीकडे लाहौर बस सेवा सुरु करुन दोस्तीचा एक हात त्यानि पुढे केला होता दुसरी कड़े पोखरण ची दूसरी चाचणी करुन इंदिरा गांधीचा बुद्ध पुन्हा हसवला होता.

सत्तेची भूक नसते कारण स्वार्थ कोनासाठी करणार? मागे पुढे कोणी नाही. असतात काही लोक वेडाने झपाटलेली. समजाने प्रेम कराव अशी आणि विरोधकानी दाद द्यावी अशी. वाढ दिवसानिमित्त २ शब्द. शेवटच्या त्यांच्या ओळी ज्या कायम ओठावर येतात-

बाधाएं आती हैं आएं
घिरें प्रलय की घोर घटाएं,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएं,
निज हाथों में हंसते-हंसते,
आग लगाकर जलना होगा.
कदम मिलाकर चलना होगा.

तेच म्हणाले होते एकदा You can be ex prime minister one day, but you can't be ex poet

©प्रसन्न कुलकर्णी [ PK]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!