दशक्रिया (अंध) श्रद्धेची आणि (अंध) विश्वासाची

  आपली एक साधारण गोष्ट आहे भारतीय लोकांची. आपल्याकडे मूल जन्म घेत. त्याला काही दिवस लोकांना दाखवल जात नाही. नजर लागेल म्हणून किंवा आणखी काही असेल तर. ५ व्या दिवशी सटुआई येऊन आपल्या कपाळावर आपला नशीब लिहून जाते. मग त्याची कुंडली बनते जन्मानुसार त्यांची रास गोत्र नक्षत्र चरण सगळ ठरत. त्याची पत्रिका बनवून घेतली जाते. मूल मोठ होत जात. हिन्दू असेल तर मुंज , मुस्लिम असेल तर सुंता होते. पुन्हा तो शिकला मोठा झाला घर बांधतो त्यात आपण च पाहतो kitchen कुठे असाव, कुठे मास्टर बेड असावा वेगेर. मग लग्न होत. कोणाचा मंगळ शनि राहु आहे कुठल्या स्थानी काय आहे हे शोधल जात मग दिवस शोधला जातो. लग्न देवा ब्राह्मणा साक्षी नेच होत असा नाही पळून जाऊन होते, घरगुती हार घालून होत, रजिस्टर ही होते, धर्म बदलला तर कबुल है आणि I Do म्हणत ही लग्न होत. नाहीच तर लिव इन राहता येत. सम्पूर्ण जगाला प्रजनन अर्थात रिप्रोडक्शन सिस्टम माहीत आहे पण आपल्याला मुलगा हवा असतो किंवा सासुला पाळणा हवा असतो मग नवस बोलले जातात अंगारे धुपारे होतात आणि त्यामुळेच मूल देखील होतात म्हणे. हे झाल life cycle च. या सोबत माहीत ही गणपती होता कि fictional character आहे पण मनोभावे पूजा होते, . कोणी १५ दिवस चालत गेल म्हणून विठ्ठल स्वताच दर्शन सुद्धा देत नाही. की तुम्ही केस दान केले म्हणून तुम्हाला बालाजी मंदिरात काही मिळत नाही, चप्पल सोडली तर देवी तुमच्या घरी येत नाही. यात प्रत्येकाची श्रद्धा आहेच अस नाही. ज्याची आहे तो करतो ज्याची नाही तो नाही. ज्याला नाही त्याला कोणी जबरदस्ती केलेली नसते. निदान अस ऐकिवात ही नाही कुठे.
    ‎ आता थोड निट पाहिला तर कळेल पत्रिका काढणे लग्न मुंज विधि करा म्हणून कोणीही सांगायला जात नाही पण ९०% लोक मनोभावे सगळ करत असतात फक्त ब्राह्मणच नाही, याचा अर्थ श्रद्धा तर सगळे ठेऊनच आहेत. पण ब्राह्मण लुटतो हा जो प्रचार चालू आहे तो अगम्य आहे. थोताण्ड असेल तर करू नये आणि विश्वास असेल तर स्वतः कराव किंवा आपल्या जातितल्या जाणकार लोकाकडून करुन घ्याव कोणी ब्राह्मण त्याला अडवणार नाही. जरी ५ मिनिट मानल की ब्राह्मण लुटतो तर गांधी च वाक्य आहे- 'अन्याय करणाऱ्या पेक्षा सहन करणारा मूर्ख' तसच सरकारी अधिकारी माजतात ते लाच मिळते म्हणून नाही तर लोक लाच देतात म्हणून. साध सरळ गणित आहे जे स्वतः या गोष्टी मानत नाहीत म्हणून कमीत कमी गोष्टी पाळणारे १०० ब्राह्मण दाखवतो तुम्ही मला ब्राह्मण लुटतो म्हणून दूसरा पर्याय तयार करणारे १० इतर दाखवा.
    ‎ आता प्रश्न दशक्रियेचा. आपल्या कड़े plan cheat करणारे आहेत जे मेलेला आत्मा का काय खाली बोलवतात म्हणे, भानमती होते म्हणे, इतकच काय तर आत्मे भटकत बिटकत असतात म्हणे. किती लोकांनी पाहिला आहे ? १% बाकी ९९% लोकांना माहीत ही नसेल असला काही. यापेक्षा प्रामाणिक पणे श्राद्ध पक्ष करुन आपल्या आई बापाची आठवण काढली तर वाइट काय असाव. ठीके नाही विधि म्हणून नाही तर हे सूंदर आयुष्य त्यांच्यामुळे मिळाल म्हणून Thanks Giving Day म्हणा हव तर. तरीही नाहीच काही इच्छा तर नका करू दशक्रिया. पण कोणी एका जातीने इतका Influence करावा इतकी संख्या ही नाही ब्राह्मण लोकांची. निसर्गाची कमाल आहे त्यानि या शरीरात आत्मा नावाच सिम कार्ड घातल. त्यानि ते जगु लागल. ते काम कस करत हे संशोधकाना पण जमल नाहिय. ७०० कोटि लोकांची चेहरेपट्टी ठसे वेगळे कसे आपोआप थोड्या फार फरकाने स्त्री पुरूष संख्या सारखी असते कारण गरजा सगळ्या पुर्ण व्हाव्यात पण हे Manage कस होत यात Science आहे तस निसर्ग आहे , अफाट शक्ति आहे. कुठे ना कुठे ही शक्ति आणि Science भेटत च. आस्तिक आणि नास्तिक एका बिंदु पाशी Cross होतात च. फरक इतकाच की रस्ते आणि चश्मे वेगळे असतात. उदाहरणार्थ-
    ‎गीतेच्या २ अध्यायामधे २२-२३ वे श्लोक आहेत-
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः,
‎न चैनं क्लेदयन्त्यपो न शोषयति मारुतः||
याचा अर्थ शरीर जस जुने कपड़े टाकून देत तसा आत्मा जून शरीर सोडून नवीन धारण करते. आणि तो न जळणारा, न मारता येणारा असा अवध्य आहे तो फक्त बदलला जातो मारला किंवा निर्मिला जात नाही

आणि आत्मा म्हणजे Soul ही शक्ति कोणालाही कळली नाही. पण शेवटी शक्ति चे गुणधर्म तर सारखेच ना मग आठवते शाळेतला Energy चा नियम-

'Energy can neither be created nor be destroyed but it can be transformed from one form to another. This is exactly what happens everywhere in the universe.'

याचा अर्थ काय तर तोच नैनं छिंदन्ती चा.  यात आपल्याला जी गोष्ट ज्या चश्मयातून दिसते तशी पाहवी आणि जे पटत तशी पाळावी. पण यासाठी कोणा जातीला बदनाम करू नये ही इच्छा

©प्रसन्न कुलकर्णी[PK]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!