Playlist थोडी Shuffle हवीच..!!


“काय दादया, खूप दिवस पेन हातात घेतलं नाही वाटत. पेनातली शाई संपली की उत्साह ओसरला?” एका काकांचा हा प्रश्न ऐकून जरा बर वाटलं. कारण आपण असं  ४-६ महिन्याला काहीतरी पोस्ट टाकणार तर कोणी असं विचारेल असं वाटलं हि नव्हतं.

       " नाही ओ काका, थोडं परीक्षा पोटापाण्याच्या नादात हे जरा मागे पडत. आणि असं हि आजकाल फेसबुक उघडायची इच्छा होत नाहीय. विधानसभा, प्रचार हेच चालूय सगळं मग आपण काही टाकलं तरी लोकांचा सध्या मूड वेगळा आहे म्हणून मागेच पडलं."

      " ठीके. तुमच्या परीक्षा वगरे काही म्हणणं नाही. पण लोकांचा मूड अंदाज घेत बसलास तर तुझा हि लिहायचा मूड निघून जाईल आणि सवय सुद्धा.  तर समर्थ म्हणतात तस 'दिसामाजी काहीतरी लिहावे आणि प्रसंगी अखंडित वाचीत जावे.' कळलं का लेका"

हे संभाषण साधारण काही आठवडे पूर्वीच पण परिस्थती अजून तीच. आता तर राजकीय पोस्ट्स ना अक्षरशः ऊत आलाय.  पण ठरवलं होत जोपर्यंत हलकं फुलकं सापडत नाही तोवर कीबोर्ड ला बोट लावायचं नाही. ती संधी लवकरच मिळाली ही. एका छोट्याशा गप्पांच्या प्रसंगाने डोक्यात एक विचाराची पुडी  सोडली.

        तर झालं असं कि माझ्या भावाकडे सगळे मोठे लोक एकत्र जमलेले असताना. ते SAREGAMA  CARWAN  MUSIC  Player  मध्ये जुनी गाणी लागलेली होती. रफी, किशोरकुमार, लता दीदी, आशा, मेहमूद, जगजीत, मन्ना डे, गुलजार, आर डी, एस डी अशी असंख्य filters  लावून मैफिल रंगली होती. गाणी आपोआप पुढे सरकत होती. एखाद नावडत लागलं तर हे नको हे नको चा सूर लागायचा तर एखाद अगदी जिव्हाळ्याचं लागलं तर बहुमताने 'वाह राहू दे' यायचं..!! अर्थात जुन्या गाण्याची मैफिल होती मग आमच्या पेक्षा मोठ्या लोकांच्या मताला किंमत होती. आणि हो मताला किंमत, बहुमत सध्या चालूय तस नाही बर का अगदी मनापासून होत म्हणून बाहेरून पाठिंबा घेऊन ५०-५० फॉर्मुला चा इथं तसा काही स्कोप नव्हताच. आम्ही पण मग खुश रहो म्हणत रिमोट त्यांच्या कडे दिला आणि चकाट्या पिटत  बसलो.

        तेव्हा बोलत बोलत भाऊ म्हणाला,माहिती का पश्या यांना CARWAN आवडायचं कारण काय ? यात त्यांना रेडिओ, गीतमाला किंवा दूरदर्शन च्या रंगोली चा feel  येतो. भले यात सुद्धा रेडिओ, USB, Bluetooth आहे पण याना असं random गाणं लागणारी गीतमाला आणि रंगोली च जास्त प्रिय. logic  असं कि यांना त्या Surprise Factor ची सवय आहे म्हणजे पुढचं गाणं कोणतं हे त्यांना आधीच ठाऊक नसता. अचानक खूप दिवसांनी एखाद गाणं समोर आलं कि लहान मुलांसारखं त्याचा आनंद घायचा हि त्यांची style. तर आपण playlist च्या जमान्यातले. आपल्याकडे हजार गाणी असतील पण आपण कोणतं गाण ऐकायचं हे आधीच ठरवलेलं असता. बऱ्याचदा तर आपला मूडच आपली playlist ठरवतो. Playlist असून असून किती १० किंवा अगदी २५ गाण्याची. त्यात हि एखाद गाणं वाजेपर्यंत आपला मूड बदलला तर आपण १० सेकंद सुद्धा ऐकू शकत नाही. कारण आपला मूड वेगळा असतो. भाई बंदा बात तो एकदम बराबर बोला..दिल को टच कर गयी.
          तस बोलणं २ मिनिट असलं आणि फार काही फार खोल नसलं तरी रंगोली, रेडिओ आणि playlist च Comparison डोक्यात घोळवायला पुरेस होत. पूर्वी साधनं नव्हती आणि आत्ता आहेत म्हणून फरक असेल कदाचित पण आता आहे ते आहे. पण खरंच हे फक्त गाण्यापुरतं लागू आहे? का ती अक्खी Lifestyle  तशी होती, मला फक्त गाणं दिसतय. विशेष म्हणजे त्या Lifestyle मुळेच बाकी नाही पण स्ट्रेस च्या बाबतीत तरी ते आपल्याहून काकणभर सुखीच आहेत. वरच्या उदाहरणाशी सांगड घालून च बोलायचं झालं तर गाणी वेळेत वाजली पाहिजे पण क्रम तोच हवा असं काही नाही किंवा बदल झालं झाला तरी ठीक आहे. सकाळी भूपाळी वाजायला हवी पण एखाद दिवस घनःशाय्म सुंदर ऐवजी उठा उठा हो सकळिक वाजलं तरी चालेल किंवा भूपाळी ऐवजी ओंकार स्वरूप लागलं तरी एन्जॉय करूच. म्हणजे आयुष्यात पण सगळं हवं पैसा, नोकरी, लग्न, स्वतःच घर. पण ते आपल्या हव्या त्या क्रमानेच मिळायाला हवं असं नाही. एखादी गोष्ट पुढे मागे किंवा नाही मिळाली तरी आहे तरी जैसा है हम खुश है. टेन्शन नही लेने का..! याउलट आपण? यार काय फालतू गाणं लागलं हे Next. ते हि खर तर आवडत असत. आपणच घेतलेलं असत पण आत्ता मूड नसतो आपली चिडचिड होते. कारण आपण सगळं प्लॅन केलेलं असत आधी डिग्री, मग जॉब हवं तेच प्रोफाईल, Salary मग इतके रूम च घर तसेच interior शिवाय आपल्या स्टेटस आणि बजेट दोन्ही सांभाळत. पण एखाद गणित बिघडलं तर? आपली चिडचिड होते. का तर गाणं वेगळं किंवा वेगळ्या क्रमाने लागलं. हि सुरुवात आहे खरी गम्मत पुढे आहे. सकाळी कधी मराठी चॅनेल लावून बघा आजही बघायला मिळेल आज चि .चिंटू याचा वाढदिवस आहे. गाण्याची फर्माईश आहे लकडी कि काठी. शुभेच्छुक आहेत काका आत्या मामा मावशी आजी आजोबा अगदी दूधवाला मोलकरीण पर्यंत जात का काय वाटत पण हि लोक हा प्रकार प्रत्येक गाण्याला ऐकायची हो. आणि त्यांना बोर वाटलं तरी तो भाग skip चा पर्याय नव्हता. कदाचित त्यामुळे च ते म्हणतात ना 'ज़िन्दगी का तजुर्बा है, मजा तरसने में ही है..!!'  और ये तरसने का ये अंदाज वो सीख गये. आणि आपण फक्त २०-३० सेकंद ad  असते ज्याचा वेळ आपल्याला माहित असतो. पण आपण वाट बघू शकतो ? अजिबात नाही. मग जॉब/प्रोमोशन किंवा त्याचा/तिचा होकार हम तरस नहि सकते. शक्य असेल तर ऍड स्किप करा किंवा तू नहि तो और सही. आपल्या बाबा काका मामानी कधी 'मै हू झूम झूम झुमरू' किंवा 'याहू कोई मुझे जंगली कहे च्या मूड मध्ये लावलं असेल रेडिओ पण लागलं असेल 'मै  जिंदगी का साथ निभाता' किंवा 'राही मनवा दुःख कि चिंता' म्हणून ते बंद नक्की नाही करणार. फार तर स्टेशन बदलून पाहतील आणि नसेल तर ते शांत पणे ते हि ऐकतील. म्हणजे एखाद अनपेक्षित काही घटना घडली तरी बाकी पर्याय पाहतील आणि नाही सापडले तर आहे ते शांत पण पचवतील. आपण आतिफ आणि अरिजित लावायला गेलो आणि जगजीत ची गझल लागली तर? एक तर बंद करू किंवा कपाळाला आठ्या पडू. म्हणजे प्रोमोशन ऐवजी जर परफॉर्मन्स मुळे सॅलरी कट झाली तर गाणं बदलता किंवा बंद करता येईल? Life का रेडिओ भाई. जो है जैसा है सूनना पडेगा. Last  but not  least एखाद्या कार्यक्रमात आजही एखादा काका एखाद्या काकूसाठी तयारी न करता तोडक मोडक जोहरा जबी म्हणेल कारण त्याला  व्यक्त व्हायचंय, परफॉर्मन्स नाही द्यायचा. आणि पण एखादा भाऊ वाहिनी साठी म्हणेल  तर तयारी करून karaoke ची साथ घेऊन. कारण त्याला वेळेच आणि परफॉर्मन्स च बंधन आहे.
           हो आपण well planned, out of the box जाणारी पिढी आहेत. पण त्यासोबत आपण आपणच बनवलेल्या benchmark गाठताना stress  घेऊन रडणारी हि आहोत. ज्याला जमलं नाही त्याच रडगाणं कर्कश वाजत राहणार आणि ज्याला जमलं त्याच मात्र-
           
"जिंदगी एक सफर है सुहाना...यहा कल क्या हो किसने जाना "

©प्रसन्न कुलकर्णी [PK ]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!