डोह - BFF नावाचा


मला कविता वाचायला आवडतात. हा म्हणजे इतका हाडाचा कविता प्रेमी मी नाही की कवितांच्या कार्यक्रमाला नियमित जाइन किंवा कविताच पुस्तक आणून वाचेन. पण चर्चेत असणारे कवी, त्यांच्या गाजलेल्या कविता, youtube वरती सापडणाऱ्या मी ऐकत असतो. त्यात स्पृहा जोशी, गुरू ठाकूर, संदीप खरे, जितेंद्र जोशी, सौमित्र, संकर्षण कऱ्हाडे अशी स्क्रिन वर येणारी जास्त ऐकण्यात येतात. त्यात आणखी एक भर पडली ती म्हणजे वैभव जोशीं. प्रचंड ऐकतोय यांच्या कविता. आणि त्याची सुरुवात झाली डोह या कवितेपासून. कवींची काय गम्मत असते नाही, एक गोष्ट १०० ते १००० शब्दात सांगता येत नाही पण अगदी ५-७ ओळींमध्ये ते त्याहून जास्त आणि स्पष्ट बोलून जातात. ही कविता Platonic RelationShip वरती आहे. आता हा शब्दच आधी ऐकण्यात आला नव्हता. search केलं तेव्हा वाटलं की अनेक जण अनेक अर्थ काढू शकतात याचे. पण ते शोधायच्या आधी जो अर्थ पटकन डोक्यात येतो आणि मी कायम त्या अर्थाने कविता ऐकतो, ते म्हणजे आपल्या भाषेत BFF. आपल्यासोबत १०० फोटो टाकतात , hangout ला असतात तसे नाही. फक्त एक किंवा दोन जे मुलांसाठी मैत्रीणीपेक्षा जास्त पण Gf पेक्षा कमी असतात. किंवा मुली साठी मित्रा पेक्षा जास्त पण BF पेक्षा कमी वगरे. कोणाला मान्य असो किंवा नसो काही बाबतीत opposite gender च चांगलं समजून घेऊ शकतात. मित्र मित्राला शिव्या देतील, मैत्रिणी gossiping करतील पण मित्र मैत्रीण एकमेकांना खूपदा जो खांदा देतात तो वेगळाच. ही BFF नावाची concept आपल्या पिढीने आपल्याला दिलेली एक सुरेख भेट आहे हे मी ठासून सांगतो. नाही कळलं ना?
कळण्यासाठी सिनेमातले उदाहरण देतो. पुर्वी म्हणजे अगदी ८०-९० किंवा आधीच्या काळात मुलं-मुली एकमेकांना ओळखत असली त्यांची खुले आम मैत्री च प्रमाण फार कमी. अर्थात मी मध्यमवर्गीय जिथे फारस मोकळं वातावरण नसतं त्याबद्दल बोलतोय. म्हणजे एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते हा टीपीकल डायलॉग असतो तस काहीस. मग देवानंद किंवा शम्मी कपूर सारखा एखादा देखणा आणि Charming हिरो ८-१० मुली पिकनिक ला जाताना किंवा तत्सम ठिकाणी अचानक भेटतो, त्याला एखादी आवडते मग अपघात किंवा भांडण मग एखाद रफी किंवा किशोर च गाणं-

'तुमसे अच्छा कौन है, दिल ओ जिगर लो जान लो,
हम तुम्हारे है सनम, तुम हमे पहचान लो'

आणि यांना पोरगी पटते काही मिनिटात. ते तिथे स्वाभाविक होत. कधी opposite gender शी डील करून माहीत नसत समोर येईल ते आवडतच. नंतर कस ही असलं तरी पदरी पडलं पवित्र झालं अस ते स्वीकारलं जात.
नंतर ९०s किंवा २००० च्या काळात थोडा जमाना बदलला. मोठ्या शहरात का असेना पण खुले आम पणे शाळा कॉलेजात मित्र मैत्रिण ग्रुप बनू लागला. एकत्र फिरणे, Movies पाहणे सुरू झालं. त्याला पुढे दिशा देईल असे scene सिनेमात यायला लागले. मैने प्यार किया मध्ये म्हणलं गेलं 'दोस्ती की है निभानी तो पडेगी ही' किंवा कुछ कुछ होता है मधलं वाक्य भलतच फेमस झालं 'प्यार दोस्ती है' म्हणजे या generation ला कळून चुकलं होत अस १-२ गाणे म्हणून पटलेल्या सोबत आयुष्य निघेल च guarantee नाही. दोस्ती आवश्यक आहे. मग तो ट्रेंड सुरू झाला. दोस्ती करा नंतर स्टोरी पुढे किंवा Full Stopp.
Full Stopp झाला की मग थोडे रडके गाणे

'सच कह रहा है दिवाना, दिल दिल ना किसीं से लगाना'

मग २०१० नंतर ते ही बदललं. प्रत्येक शाळा, कॉलेज, जॉब मध्ये एक affair, मग ब्रेक अप. अगदी त्याच सुद्धा celebration.

'मेरे सैय्याजिसे आज मैने ब्रेक अप कर लिया'

किंवा मग Love Triangles. एक दुसरीच्या मागे, ती तिसऱ्याच्याच मागे वगरे. म्हणजे हे कळून चुकलं की एक कोणी परफक्ट नसतो आणि एक कोणी पूर्ण वाईट नाही. तुलना करायला लागले सगळे जण. आता तर एकाच वेळी ३-४ crush, Like असतात च प्रत्येकाला. यावरून कोणाचं character खराब होत नाही हे ही समजलं. पण जेव्हा चॉईस ची वेळ येते तेव्हा त्यातलं एक च करू शकतो. मग बाकीचे? अशा वेळेला २ मार्गाने हे BFF नावाचं by product जन्माला आलं असावं. एक म्हणजे त्या ३-४ पैकी एकाविषयी आपण serious होतो मग बाकीचे काय? तर काही गोष्टी जुळल्या नाहीत म्हणून नाहीतर ते भारी च आहेत आणि त्यांचं आपलं ट्युनिंग जुळतच. थोडक्यात मिस झालेली बस म्हणा हवं तर. आणि दुसरा मार्ग म्हणजे तिच्या सोबत सेटिंग लावून दे ना आपण म्हणतो आणि त्यासाठी मैत्रीण प्रयत्न करते यात ती आपल्याला मूळ जिच्या सोबत सूत जुळवायच तिच्या पेक्षा जास्त आपल्याला ओळखत असते. पण एक गोष्ट नक्की आपण जेव्हा कोणाला approach करतो आपण खूप image चा विचार करतो काय बोलू काय नको, कस दिसू वगरे पण या BFF नावाच्या प्राण्या समोर आपण निर्लज्ज असतो म्हणजे अगदी विस्कटलेले केस दाढी, बरमुडा, मध्ये पाहिलं किंवा इतकी कडकी आहे की चहाचे पैसे पण तू दे किंवा अगदी Adult Joke share करताना सुद्धा तसूभर ही लाज वाटत नाही. कारण ते आपली नियत ओळखून असतात. आपण पाण्यात वर किती चांगले आणि खोलात किती नालायक हे पूर्ण माहीत असत त्यांना. थोडक्यात इथे फक्त एक गोष्ट मॅटर करते, comfort. तुम्ही हुशार असा टुकार असा पैसे वाले असा नाहीतर नसा फरक पडत नाही. किती Comfortable आहात हे imp. ज्या सोबत तुमचं चेष्टेत नाव जोडलं जात नाही तो BFF असूच शकत नाही अस मला वाटत. कित्येकदा इच्छा असून पुढे विचार न केलेलं मी अनेक पाहिलेलं आहेत. त्याच मुख्य कारण हे की त्यांना हे चांगली मैत्रीण किंवा मित्र गमवायचा नसतो. पण हे ही माहीत असत की यांच्या पेक्षा आपल्याला झेलणार कोणी मिळेल का नाही सांगता येत नाही. कळत नकळत आपण खूप गोष्टी त्यांना बोलूंन जातो आणि कित्तेक प्रश्नावर ही लोक सोपं सोपं उत्तर शोधून ही देतात. त्या डोह मध्ये तसच आहे, दोन ओळी म्हणतात

"प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा अस नाही,
एखादा असू द्यावा अथांग,
कोणत्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंब ही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे।
ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याचा पाण्यावर तरंग
अपेक्षा च नाहीत कसल्या तर कसला अपेक्षा भंग"

आता वाचणार्याला वाटेल हा विषय असा मधेच कसा काय घेतला लिहायला? पण निमित्त मिळत जात. ते अस की माझ्या ही आयुष्यात असे अस्सल नमुने आहेत २-३. जे मला माझ्याहून जास्त ओळखतात. मला खूपदा प्रश्न पडतो की हे लोक मला इतकं चांगलं हँडल कस करत असतील. म्हणजे मला झाडावर चढू देत नाहीत आणि खाली ही पडू देत नाहीत. पाय कायम जमिनीवर हवेत ही काळजी घेणारे. त्याच मला सापडलेलं उत्तर याना आपल्या गुण किवा अवगुणांचं फार अप्रूप नसत. एकतर यांचा स्वभाव अगदी उलट असतो म्हणून किंवा अगदी सेम असतो पण ते आपल्या हुन तीव्र असतात म्हणून. त्यापैकीच एकामुळे हा सगळा लेख प्रपंच झाला. म्हणजे मला माझे गुण माहिती मी पुस्तक वाचतो, त्याचे गूढ अर्थ शोधतो, मला लोक वाचता येतात, मी त्रयस्थ पणे विचार करु शकतो, अवगुण ही माहिती मी प्रचंड चिडखोर आणि मुहफट आहे, मी Over Thinker आहे. पण सेम स्वभावाच आणखी कोणी आहे आणि इतला extrem level च की माझं वेगळं पण उरलाच नाही अशा एका मैत्रिणी सोबत पैज लागलेली ज्यात मी हरलो. तिने अशी अट घातली की मी काहीतरी लिहावं ज्यात मी किंवा माझ्या सारख्या लोकांविषयी तु लिहावं. उद्देश काही वेगळा होता, पूढे गेलो तस वेगळं झालं याच. नवीन ओळख झाल्यावर आपण ट्युनिंग कस जमत यावर मैत्री ठरते पण असतात काही विचित्र लोक त्यांना आपण कसं कचा कचा भांडतो आणि तरीही प्रत्येक वेळी sort करून ती thread पक्की करतो हे भारिय. तसच इथे ही झालंय एखादा लेखक किंवा पुस्तक कोणतं भारी आणि का यावर अशक्य भांडलो आम्ही आजही तो वाद तसाच आहे पण हे बोलता बोलता आणखी किती गोष्टी मध्ये एकमत झालाय याची गणती नाहीय.

मी जेव्हा काय काय लिहिलं पाहिले जे ५-७ readers असतात त्यापैकी ही एक आहे आणि चांगलं वाईट लिहिलेले अनेक draft तिने सहन केलेलं आहेत. शिवाय अभ्यास करत करत तू लिहिणं सोडू नको असा म्हणणार एकमेव प्राणी आहे. उसके लिये इतना तो बनता है. त्याबदल्यात मी ही काही गोष्टी सोडू नको अस म्हणलय पण ती ऐकेलं तर शपथ असतात काही काही माज😂

असो मित्र येतील जातील, प्रेम येईल जाईल पण BFF constant कारण तेच मित्र आहेत आणि काहिचे प्रेम पण तेच आहे.😋 ज्यांना आवडेल त्यांनी ती कविता युट्युब ला जरूर ऐकावी.

©प्रसन्न कुलकर्णी [PK]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!