अस्वस्थता-बदलापुर्वीची


खूप दिवस फेसबुक आणि ब्लॉग पासून लांब होतो. लिहावं नाही लिहावं असं झालेलं पण वेळ ही मिळाला आणि virtual Distance स्वस्थ बसू देईना. आज ४५ दिवस होतील अक्खा देश Lockdown स्थितीत आहे, जसे जसे दिवस पुढे जातायत तसा सगळ्यांना कंटाळा यायचा पण कंटाळा यायला सुरु झालाय आता. फक्त कंटाळा नाही तर व्यक्त किंवा अव्यक्त अस्वस्थता आहे. हा म्हणजे सुरुवातीला असेल त्यांना वर्क फ्रॉम होम, सोशल मीडिया, रामायण महाभारत, वेब सिरीस, पुस्तक, पहिल्यांदाच स्वतःसाठी आणि कुटुंबाला देता आलेला वेळ सकारात्मक बाबी आहेतच. त्यासोबत आणखी एक गोष्ट सगळ्यांकडे कॉमन सुरु आहे, ती म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ बातम्या पाहणे त्यात रोज वाढणारे रुग्ण आणि मृत्यचे आकडे, देशविदेशातल्या सरकार आणि प्रशासन यांची जान आणि जहां सांभाळायची कसरत. हे चित्र जितकं आजची स्थिती पाहून सुन्न करणार आहे तितकंच उद्याची कल्पना करून अस्वस्थ करणार आहे. किती हि टाळली तरी न टळणारी अस्वस्थता.

थोडक्यात संदीप खरेंची मराठी कवाली सारखी गत अक्ख्या जगाची झालीय-

अगतिक झालो निष्प्रभ झालो, तरीही केला तुझाच धावा,
रोखठोक मज आज बोलू दे माणुसकीने ऐका देवा,
जाब तुला रे कुणी पुसावा, जाब तुला रे कुणी पुसावा..!!"
आणि हि हतबलता अगदी शाळेतल्या पोरापासून महाकाय देशापर्यंत आहे. अगदी महत्वाच्या गोष्टी जरी पाहिल्या तरी कोणी कुठे पर राज्यात देशात अडकलं आहे, कोणाची जॉइनिंग ऑर्डर फक्त आलेली आहे, कोणाची ठरलेली लग्न कॅन्सल झाली आहेत त्यात पैसा अडकला आहे, धंदे बसले म्हणून काही रस्त्यावर यायच्या वाटेवर आहेत तर काही जेष्ठ नागरिक जे व्याज किंवा इतर गुंतवणुकीवर जगतात त्यातून येणार उत्पन्न कमी झाली, हातावर पोट असण्यार्याचे हाल तर शब्दापलीकडे आहेत, जे नेते काही उद्दिष्ट घेऊन सत्तेवर आलेत त्यावर वरवंटा फिरलाय, बनवलेली बजेट हलली आहेत, सगळे देश बाकी सगळे मनसुबे बाजूला ठेवून बसली आहे. फक्त हे सगळं संपे पर्यंत धडधाकट राहणे हे एकच उद्दीष्ट उरलं आहे.
पण कमाल आहे ना, म्हणजे जस भीमाला आपल्या ताकदीचा गर्व झाला तेव्हा बजरंग बलीच्या शेपटीने त्याच गर्वहरण केलं अशी दंत कथा आहे. आपल्याला गर्व नाही तर माज च होता. आमची मुंबई थांबत नाही, भारतीय रेल्वे युद्धकाळात थांबली नाही, आमची आरोग्य क्षेत्रात प्रगती च्या टिमक्या, जातीचा, धर्माचा, संपत्तीचा माज, श्रद्धा असणे गैर नाही पण दान पेट्या मध्ये करोडोचा गल्ला, उद्योजकांना वाटायचं थोड्या पैशाच्या जोरावर लोक राबतात आणि मी मोठा होतो आज माणसाविना ते ठप्प आहेत, शेअर बाजारात गुंतवणूक वाल्याना वाटायच कि माझ्या स्किलवर लाखो करोडो कमावले. आज धंदे बंद तर अनेक राजाचे रंक होण्याच्या मार्गावर आहेत, नेत्यांना आणि त्याच्या so called कार्यकर्त्यांना आपले शेठ, साहेब किंवा गल्लीतले दादा म्हणजे वट सबको लग्र था अपुनीच भगवान है पण आपण सगळे एकमेकात बांधलेले आहोत. सगळे पिलर पडायला लागले तर इमारत खचणारच. उबंटू सिनेमात एक वाक्य आहे "आपण आहोत म्हणून मी आहे" सगळ्यांना हे विसरायला झालं होत. खरं तर आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग आणि अनेक संशोधक यांनी कित्येकदा सावध केलय कि माणसाचा अधिक हव्यास आणि अति प्रगती हीच आपल्या मानवजातीच्या उठणार आहे. पण ते म्हणतात ना, 'कौन समझा है सिर्फ लफजो से, एक हादसा जरूरी होता है सबके लिये' तरी यातून कोणी शिकणारे याची शक्यता जरा कमीच वाटत आहे कारण या आधी हि अनेक टप्पू देऊन झालेत निसर्गाने.
मागे ग दि मा च्या २ गाण्याच्या संदर्भ दोन ब्लॉग मध्ये आलेला योगायोगाने परत तिसरा उच्चार आज करावा वाटतोय. गीत रामायण मधला आज का निष्फल होती बाण या गाण्यात अनेक मुंडकी उडवून हि रावण उभाच होता तेव्हा केविलवाणा राम म्हणतो तशी आज सगळ्याच देशांची स्थिती आहे

"आज कां निष्फळ होती बाण?
पुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण?"
पुढची एक ओळ त्या देशां लागू पडते ज्यांना आपल्या आरोग्य सेवेचा माज होता,
"इंद्रसारथे, वीर मातली, सांग गूढता मला यांतली
माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान"
आणि त्यापुढे
"ज्यांच्या धाकें हटला सागर,भयादराचे केवळ आगर
त्या भात्यांतच विजयि शरांची आज पडे कां वाण?"
या ओळी तर अमेरिका, युरोपियन देश, रशिया सारख्या देशांना तंतोतंत लागू आहेत. आर्थिक, लष्करी, राजकीय ताकदीने आणि आपल वर्चस्व टिकवायला हव्या त्या पातळीवर जाणारे अशी ओळख असलेले देश आपलेच लोक दिवसाला १५०० च्या गतीने अगदी असहाय होऊन गुडघ्यावर आलेत. हे झालं त्यांचं आपलं अजून काय होणारे ते विचार ने केलेलाच बरा. झाकली मूठ सव्वालाखाची म्हणून सगळं शांत आहे अशीच शंका यायला लागलीय. तसा भारत आरोग्य क्षेत्रात बराच पूढे आहे. अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या कॅन्सर, HIV, पोलिओ, मलेरिया यांची जेनेरिक औषध बनवून अत्यंत स्वस्त दरात जगाला देण्यात भारताच्या डझनावर कंपन्यांनी मानाचं स्थान घेऊन ठेवलय. पण चांगली हॉस्पिटल्स, व्हेंटिलेटर, डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ हे जरी चांगले असले तरी लोकसंख्येचा प्रचंड डोलारा, डोलारा पेक्षा भयंकर फाफट पसारा आणि आपल राहणीमान यासमोर सुविधा पुरणार किती. त्यात आपला प्रत्येक नेता आणि कार्यकर्ते ब्लेम गेम मध्ये व्यस्त.. असो
पण हे सगळं तर जग जाहीर आहे. मी ज्या अस्वस्थतेबद्दल बोलतोय ती उद्याची. कारण कोरोना च्या आधीच जग आणि नंतरच जग यात जमीन अस्मानाचा फरक असायची शक्यता आहे. म्हणजे थंड पडलेलं जग परत सुरु करायचं म्हणजे काम प्रचंड असणारच शिवाय त्याचे लगेच अधिकचा पगार, ओव्हरटाईम, बोनस, DA, Increment ची फळ मिळणार नाहीतच म्हणजे सगळा कारभार काही दिवस तरी कर्मण्येवाधिकारस्ते तत्वावर अर्थात कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नकोस असाच असायची शक्यता. नोकरी राहील कि जाईल आणि गेली तर परत काय? जो पर्यंत याची लस येत नाही तो जरा दुरून राम राम, सुरक्षित अंतर ठेवा करत काम. या अशा कामाची भारतात सवय आणि शक्यता दोन्ही अवघड. Change is only permanent म्हणणं सोपं असलं तरी बदलला सामोरे जण कठीणच. त्यात मजूर किंवा नोकर वर्ग त्याला विशेष विरोध करतो हे नक्की. शिवाय ऑनलाईन क्लास, मीटिंगस, घरून काम करायला लागणारी नेट ची कमी जास्त स्पीड आणि परत कामचुकार पणाची शक्यता.
हे झालं बदलाचं या सोबत जागतिक नेते आणि देश याना बदलासोबत गरज असते बदल्याची. शब्दशः अर्थ सूड असा नाही पण कुठे तरी परत फेड हवीच की. भले चीनच कांड मुद्दाम नसेल ही पण पडत्या भावात घेतलेली अनेक कंपन्यांचे शेअर्स आणि एका महिन्यात चीनमध्ये झालेली रेकॉर्ड ब्रेक acquisitions शंका घ्यायला जागा देत आहे. तो सब कैसे गप्प बसेंगे रे बाबा. विशेषतः सध्या बरेच नेते बोल्ड निर्णय घ्यायला प्रसिद्ध त्यात भारत, अमेरिका, रशिया, इस्राएल साहजिकच आंतरराष्ट्रीय राजकारण बदलणार, ओघाने धंदे, कच्च माल, टेकनोलोजि, मानव संसाधन सगळी गणित बदलणार. प्रस्थापित बिझनेसमनला अनेक आव्हान येणार काहीचे बाजार उठतील काही नवीन लोकांना संधी मिळतील. नाही म्हणलं तरी बऱ्याच बाबतीत चीन वर अनेक देश पूर्ण अवलंबून आहेत. पण अक्खा देशाचं आरोग्य आणि आर्थिक गणित तोडणार्या देशाला काहीतरी उत्तर दिल जाईलच. अर्थात बदला तो होके रहेगा. अर्थात कसा ते पाहायचं. आणि त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बदल सगळ्यांवर होणार. आता सगळ्यांच्या मनात हे सगळे नाही पण एक किंवा अनेक नक्की येत असणार आणि आपण सगळे स्वीकारणार जा प्रश्न च आहे.
खरंच इतके बदल होतील का अशी शंका असली तरी ते होणार नाहीत याच एक हि कारण दिसत नाहीय. कारण कोणी तरी म्हणून गेलंय पूर्ण सगळं सम्पलय अस वाटत तीच वेळ असते नवीन काही सुरु करायची...!!
©प्रसन्न कुलकर्णी [PK ]

Photo Courtesy- Nagpurtoday.com

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!