सौंदर्य- नजरे पलिकड़चा


     खुप दिवसांपासून एक प्रसंग लिहायचा होता. मी बऱ्याचदा कर्वेे रोड-FC रोड- शिवाजी नगर मार्गे जातो. त्यात ही काही वेळा PMT ने पण जातो. एकदा असच बस नी जात असताना एक मुलगी बस मधे चढली. ११ वी-१२ वी असावी फार फार तर. खुप मोठ्यानी बोलत होती. कुठे उतरायच, कोणता स्टॉप येणार वगेरे. मागे वळून पाहिला तर ती अंध होती. हातात काठी नसती तर अंध आहे हे समजायला वेळ लागेल इतका सहज वावर होता. भरगच्च गर्दी मधे आपला रस्ता काढत कुठे तरी ज्ञानेश्वर पादुका चौकामधे उतरली असावी. नंतर त्याच आठवड्यात मी गाडीवर जात असताना सिग्नल ला होतो तेव्हा ती मैत्रिणींसोबत रिक्षात बसत होती. पण आता अवतार जरा वेगळा होता. Traditional Day वेगेर कॉलेज मधे असावा. व्यवस्थित functional पंजाबी ड्रेस, त्यानुसार थोड़ा फार make up, लक्षात येतील असे दागिने . पु ल च्या भाषेत सुंदर खाशी सुबक ठेंगणि वेगेर. कदाचित हे सगळ बस मधे carry होणार नाही म्हणून मैत्रिणींसोबत जात असावी. ती निघून गेली आणि सिग्नल सुटला मी ही पुढे आलो होतो.
     ‎पण तोवर असच डोक्यात चक्र सुरु झाला. सौदर्य कोणाला नाही आवडत. आणि आपल सौंदर्य लोकांना दाखवायच्या आधी प्रत्येक जण स्वताची नजर रोखुन खात्री करुन घेतो एका हक्काच्या ठिकाणी तो म्हणजे आरसा. जिथे प्रत्येक जण स्वता पुरता असतो ती ही फ्रेम. त्यात जास्त choosy असणाऱ्या स्त्री जातीनी तर याचा over utilisation केला. कोणता रंग उठून दिसतो कोणता dull वाटतो. ढोबळ रंग सोडून अगदी चिंतामणि, शेवाळी, शेन्द्री, सरबति, करवंदी, पिरोजी ( यातला मला एक ही कळत नाही) याव न ट्याव रंग नजरेत भरून घेतले. माझ्या घरचा अनुभव कोणत्या ही सिरिअल सिनेमा मधे पाहिलेली साड़ी, डेस चा पैटर्न, हिचे इयरिंग, तिच ब्रेसलेट, कोणाच्या घरचे पडदे अगदी त्यांचे आकार उकार सुद्धा बघून सौदर्य मोजल जात हे आठवल. मुलांची पण बात वेगळी नाही. केस, दाढ़ी सॉरी beaard, स्लिम फिट, पेंसिल फिट, लोफर्स, फॉर्मल्स अशा शेकडो गोष्टी.ज्यांच् समाधान स्वता नजरेत घेतल्या शिवाय होणे नाही. मी कशी दिसते,  मी माझ्याच नजरेत भरते का, हे स्वतःला समजल्याशिवाय पुढे पाउल पडत नाही.
     ‎इथे काहीच नाहिय अस. ही मुलगी तयार झाली पण दुसऱ्या कोणाच्या तरी नजरेतुन. सगळे रंग आहेत अंगावर पण ते खुलत आहेत की नाही हे कोणी दुसर्यानी ठरवलय. काळा सोडून जिला कोणताही रंग माहीत नाही, पण बाकी लोकांनी ज्या ४ कंप्लीमेंट्स देतील त्यात तिला समजल. त्यांच्या विश्वासावर न पाहिलेल सौदर्य carry केल. तरीही तिचा वावर तितकाच सहज होता मग ती साधारण असून ही उगाच जास्त सूंदर वाटली. कारण पदोपदी ज्या आरशावर आपण अवलंबून होतो त्याची किम्मत शून्य केली तिने.
  
    ‎" आयना तो खामखा मशहूर हुआ है,
     ‎   की वो सच और असली रंग दिखाता है,
        ‎लेकिन वही धोखेबाज है, दाये को बाए करता है,
       ‎धूल उसपर हो तोभी चेहरा अपना खराब दिखाता है"

झाला चांगला भाग पण थोड़ी नजर हवीच सौदर्याला. कारण जग जितक सूंदर आहे तितके विद्रूप आहे. नजर सांगून जाते टक लाऊन पाहणारे डोळे खरच भाळले गेलेले आहेत की वखवखलेले आहेत. नजर दाखवून देते की समोरचा बोलतोय मानानी की कुत्सित पणे. अगदी Yes I Feel safe with you  किंवा आपल्या औक़ातित राहायच हे दखवायला ही कामी पडतेच. हे सगळ कस मैनेज करत असेल ती असा एक विचार मनात येऊन गेला.
पण एक कळून चुकल सौदर्य सगळी कड़े आहे. आपण कोणाच्या नजरेतुन बघतो त्यातून ते दिसत.

मग ती शायरी आठवली-
  "अच्छे ने अच्छा है जाना मुझे,
   बुरे ने बुरा है माना मुझे,
   जिसकी नजर की जैसी फितरत थी,
   ‎उसने वैसे पहचाना मुझे"

©प्रसन्न कुलकर्णी [PK]

Comments

Yam-Hai-Hum said…
Khup chan lihilay 👌😊

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!