आज काय तो Ladies बायकांचा दिवस आहे म्हणे. हे कै आपल्याला पटलेल नै. एक तर या Ladies बायकांची Life आपल्याला झेपत नाही. एकदम Complicated. आजच नाही हे काही. आता बघा देवकीने कृष्णाला जन्म दिला पण मातृ सुख नाही मिळाल, यशोदेने जन्म नाही दिला पण मातृत्व अनुभवल, रुक्मिणी पत्नी होती पण प्रेम नाही मिळाल, राधा पत्नी नव्हती च तरी कृष्णाची लाड़की होती, द्रौपदी ला एकटीला ५ पती सोबत संसार करावा लागला, तर बानू आणि म्हाळसा या दोघी एका मल्हारसोबत राहिल्या, एक कैकेयी जिने मुलासाठी रामाला वनवास दिला, दूसरी जिजाऊ जिने मुलाच्या हातून स्वराज्य घडवल, एक म्हातारी मंथराच्या मत्सरामुळे राम ज्या जंगलात गेला, तिथेच दूसरी म्हातारी शबरी च्या प्रेमामुळे त्याने उष्टि बोरे खाल्ली, इकडे उर्मिला होती जी १४ वर्षे लक्ष्मणा ला पाहु नाही शकली, तिकडे गांधारी जिने पती साठी स्वतः डोळे झाकुन घेतले, एक बलात्कार पीड़ित अरुणा शानबाग २० वर्षे आवाज बन्द करुन जिवंत प्रेत बनून राहिली, दूसरी मलाला ज़ी अत्याचारा विरुद्ध स्वतः मुलींचा आजचा आवाज बनली, एक मन्दाकिनी आमटे जिने स्वर्गसुख सोडून समाजसाठी पती सोबत जीवन व...