Posts

६८ वर्षांची जादूची पेटी...!!

Image
       शाळेत असताना निबंध असायचे ना, सूर्य उगवलाच नाही तर?, प्राणी बोलू लागले तर?, तुम्ही पंतप्रधान झालात तर ? किंवा तुम्हाला भूतकाळात किंवा भविष्यात जायची संधी मिळाली तर ? तेव्हा सुद्धा हे कल्पना रंजन करून मजा यायची अगदी अशात सुद्धा सिनेमामध्ये सुद्धा भूतकाळात किंवा भविष्यात जाता येतील असे सिनेमे पाहिले की आपल्याला अशी संधी मिळाली तर काय असे विचार येत असतात मग तेव्हा ही अनेक प्रसंग आठवतात की हे आपल्याला पाहायला मिळाल तर किती मजा येईल. त्यात छत्रपतींचे किस्से आहेत, पेशव्यांचे आहेत, स्वातंत्र्याचे आहेत, माझ्या शहराचे आहेत, माझ्या कुटुंबातील जुन्या वारसांचे अनेक किस्से आहेत. पण ते काही क्षणापूरते, घटने पूरते किंवा वैयक्तिक स्वार्थाचे आहेत. पण मला जर आज कोणी विचारलं तर खरंच अस काही शक्य झालं विज्ञानाने किंवा जादूने तर मी म्हणेन. मला खुप महापुरुष आणि त्याच्या यशोगाथा आवडतात पण त्या मी रोजच ऐकतो देखील. आणि असही ते सगळं पाहण्यात माझं सम्पूर्ण आयुष्य थिट पडेल. त्याऐवजी मी म्हणेन-         मला अक्ख एक वर्ष द्या १ एप्रिल १९५५ ते २० एप्रिल १९५६. ...

बस रेटिंग्स मे याद रखना...!!

Image
       काल रात्री उशिरा झोमॅटो वर काही ऑर्डर केलेलं, तो डिलिव्हरी बॉय 15 च मिनिटात घेऊन आला. जाताना रेटिंग्स द्या हा सर अस म्हणून गेला. तसा हा कंटाळवाणा प्रकार मला फारसा आवडत नाही किंवा त्याबाबतीत मी थोडासा आळशी आहे की कोण त्या अँप किंवा साईट वरती जाऊन रेट वगरे करेल. पण तेव्हा तो अगदी मिस्टर पूर्णब्रह्म बनून माझ्या कडे आला होता आणि अगदी एक ही कॉल न करता बरोबर पत्त्यावर आला होता म्हणून समाधानी होतो ते वेगळं च..!! सढळ हातांनी सगळीकडे ५ पैकी ५ सगळ्या निकषांवर मी वाटून टाकले आणि बाहेर पडतो तितक्यात अजून एक नोटिफिकेशन आलं. How was your dinner ? Please rate restaurant म्हणून. त्याला म्हणलं तुझं आणि वेगळं असतंय का? म्हणलं घे..तू भी क्या रखेगा..!! पण इकडे विचार चक्र सुरू झालं होतं.        अशात रेटिंग्स या गोष्टीशी किती वेळा संबंध आलाय हे आठवत होतो. गूगल मॅप वाले जागे साठी, प्ले स्टोरवाले अँप साठी, हॉटेल वाले,लॉज वाले, ओला कॅब वाले, झूम कॉल वाले, duo वाले वगरे वगरे वगरे..!! इतकंच काय ऑफिस मध्ये ही बोनस साठी..!! निश्चित च रेटिंग्स ही एक चांगली पद्धत आहे आपल...

'मूक' बैठक आणि माझी 'बधीर' झालेली भाषा..!!

Image
            सकाळपासून मराठी गौरव दिनाच्या पोस्ट, कविता, दिसत होत्या. खूप दिवसात काही लिहिलं नाही अशी खंत ही होतीच पण सुचत ही नव्हतं काही आणि ठरवलं असत तर तरी तेच घीस पीठ लिखाण झालं असत, एक तर मराठी भाषेचा गोडवा किंवा आपण मराठी असून मराठी का बोलत नाही यावर उपरोध जो दरवर्षी फक्त आज वाचण्यात येतो. जाऊ दे म्हणत आपला दिनक्रम केला आणि संध्याकाळी नेहमीच्या खानावळीत जेवायला गेलो, तिथे जेमतेम ८-९ लोक बसतील इतकी जागा असते. आम्ही जाऊन बसलो तिथे आधीच ४-५ मुलं होती. जेवण यायला वेळ होता म्हणून सगळेच जरा टाईमपास करत बसले होते. त्या काकांनी येऊन काय हवं नको विचारलं आम्हाला आणि त्या 4-5 मुलांना खुणेने विचारलं. ते सगळे मूक बधीर होते किंवा ऐकू येत असावं काही जणांना.            हळू हळू त्या पोरांच्या खुणेने च गप्पा सुरू होत्या. कोणी मॅच पाहून दुसर्यांना रन सांगत होता, त्यांनी खुणेनेच त्या काकांना काय हवं ते सांगितलं. त्यांचे हातवारे पूर्ण पणे कळत ही नव्हते इतके फास्ट होते, तरी मला काय कळतंय हे मी प्रयत्न करत होतो. जसा जसा वेळ चालला होता मला त्यांच...

सावली माडगूळकरांची...!!

      मोठी माणसं सांगत असतात आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर त्याविषयी बोलू नये....आणि लिहू तर अजिबातच नये. पण मोह अनावर झाला आणि तो का झाला हे खाली कळेल च...अर्थात लहान तोंडी फारच मोठा घास म्हणावा लागेल याला..      आपण मोठे होतो आणि होताना आजबाजूच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला old fashioned वाटायला लागतात, आणि आपण नवीन गोष्टी मधे धुंद होतो. त्या बऱ्याच गोष्टी मधे संगीत हे पहिल्या तीनात येत असाव. त्यात आपल्याला भावगीत भक्तीगीत वगैरे अस नुसत ऐकलं तरी हे काय बोरींग किंवा म्हाताऱ्यांसारख देवाची गाणी लावलीयत अस होत जे वयानुसार साहजिक आहे. माझ्या ही शाळा कॉलेज पासून आणि मोबाईल हातात आल्यापासून त्यात मराठी हिंदी देशी विदेशी गाण्याच्या कित्येक playlist फोन मधे बनवलेल्या होत्या. त्यात आता सोने पे सुहागा म्हणता येईल अशी आपल्याकडे एक अफाट गोष्ट आहे ती म्हणजे वेग वेगळे बँड्स जुन्या गाण्यांना नवीन वर्जन मधे म्हणतात काही रिमेक तर काही फक्त नवीन गायक तर काही फक्त नवीन म्युसिक लाऊन वगैरे. यांच्या कल्पना भन्नाट असल्या तरी ही लोकं काही गाण्याचं अगदीच वाभाड काढतात तर काही...

डोपामाईनचे चाळे अन पैशांचे खेळ

        डोपामाईन नावाचं द्रव्य मानवी शरीरात असत म्हणे जे आपल्या सुख, आनंद, कौतुक किंवा एखादी यशप्राप्ती याच्याशी निगडित असत. अर्थात हा शब्द माझ्या अशात ऐकण्यात आला  आहे आणि त्याबद्दल मला फार माहिती आहे अस नाही पण मला जे शब्दात मांडायचय त्या साठी याची मदत घेतोय. तर परत मुद्द्यावर आता जे डोपामाईन आपल्या थेट कौतुकाशी जोडलेलं आहे तेच आपल्याला attention seeker बनायला लावत. मग ते चांगलं दिसणं असेल, लिखाण, संगीत, कविता, भाषण, फोटोग्राफी, चित्रकला, खेळ आणि जे जे वेगळेपण जपता येईल असं आहे ते सर्व काही माणूस आपल्या आनंदासाठी करत असेल च पण त्याच कोणी कौतुक केलं कि ते डोपामाईन छेडलं जात आणि हुरळून जाणे किंवा तेच छंद वारंवार जपायला प्रेरणा वगरे मिळणे असे प्रकार होतात. आता सोशल मिडियाने म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ते टिक टॉक  वेग्रे यांनी तर माकडाच्या हाती कोलीतच दिलंय. मुळात हे सगळे प्लॅटफॉर्म च Human Behaviour ला मोहात पाडून त्यांना नादाला कसं लावता येईल या technology वरच तयार झालेले आहेत. नुसतं डोपामाईन नाही तर आणखी जे काही ज्ञात-अज्ञात मायाजाल आहेत ते सगळ...

डोह - BFF नावाचा

मला कविता वाचायला आवडतात. हा म्हणजे इतका हाडाचा कविता प्रेमी मी नाही की कवितांच्या कार्यक्रमाला नियमित जाइन किंवा कविताच पुस्तक आणून वाचेन. पण चर्चेत असणारे कवी, त्यांच्या गाजलेल्या कविता, youtube वरती सापडणाऱ्या मी ऐकत असतो. त्यात स्पृहा जोशी, गुरू ठाकूर, संदीप खरे, जितेंद्र जोशी, सौमित्र, संकर्षण कऱ्हाडे अशी स्क्रिन वर येणारी जास्त ऐकण्यात येतात. त्यात आणखी एक भर पडली ती म्हणजे वैभव जोशीं. प्रचंड ऐकतोय यांच्या कविता. आणि त्याची सुरुवात झाली डोह या कवितेपासून. कवींची काय गम्मत असते नाही, एक गोष्ट १०० ते १००० शब्दात सांगता येत नाही पण अगदी ५-७ ओळींमध्ये ते त्याहून जास्त आणि स्पष्ट बोलून जातात. ही कविता Platonic RelationShip वरती आहे. आता हा शब्दच आधी ऐकण्यात आला नव्हता. search केलं तेव्हा वाटलं की अनेक जण अनेक अर्थ काढू शकतात याचे. पण ते शोधायच्या आधी जो अर्थ पटकन डोक्यात येतो आणि मी कायम त्या अर्थाने कविता ऐकतो, ते म्हणजे आपल्या भाषेत BFF. आपल्यासोबत १०० फोटो टाकतात , hangout ला असतात तसे नाही. फक्त एक किंवा दोन जे मुलांसाठी मैत्रीणीपेक्षा जास्त पण Gf पेक्षा कमी असतात. किंवा...

अस्वस्थता-बदलापुर्वीची

खूप दिवस फेसबुक आणि ब्लॉग पासून लांब होतो. लिहावं नाही लिहावं असं झालेलं पण वेळ ही मिळाला आणि virtual Distance स्वस्थ बसू देईना. आज ४५ दिवस होतील अक्खा देश Lockdown स्थितीत आहे, जसे जसे दिवस पुढे जातायत तसा सगळ्यांना कंटाळा यायचा पण कंटाळा यायला सुरु झालाय आता. फक्त कंटाळा नाही तर व्यक्त किंवा अव्यक्त अस्वस्थता आहे. हा म्हणजे सुरुवातीला असेल त्यांना वर्क फ्रॉम होम, सोशल मीडिया, रामायण महाभारत, वेब सिरीस, पुस्तक, पहिल्यांदाच स्वतःसाठी आणि कुटुंबाला देता आलेला वेळ सकारात्मक बाबी आहेतच. त्यासोबत आणखी एक गोष्ट सगळ्यांकडे कॉमन सुरु आहे, ती म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ बातम्या पाहणे त्यात रोज वाढणारे रुग्ण आणि मृत्यचे आकडे, देशविदेशातल्या सरकार आणि प्रशासन यांची जान आणि जहां सांभाळायची कसरत. हे चित्र जितकं आजची स्थिती पाहून सुन्न करणार आहे तितकंच उद्याची कल्पना करून अस्वस्थ करणार आहे. किती हि टाळली तरी न टळणारी अस्वस्थता. थोडक्यात संदीप खरेंची मराठी कवाली सारखी गत अक्ख्या जगाची झालीय- अगतिक झालो निष्प्रभ झालो, तरीही केला तुझाच धावा, रोखठोक मज आज बोलू दे माणुसकीने ऐका देवा, जाब तु...

इथे ओशाळला दुःशासन..!!

 दिवसापासून ३-४ वेळेला पोस्ट लिहायला सुरु केली पण एखाद्या नाजूक गोष्टीवर २ ओळी जरी लिहीत असलो तरी खरंच आपली तितकी समज आहे का असं वाटून पुढे काही सुचेनासं झालं. थोडक्यात पु लंच्या भाषेत आपण कोण आहोंत ? आपला शैक्षणिक दर्जा काय ? असा विचार स्वतःच्याच मनात येत राहिला. पण शेवटी समज, दर्जा असो नसो; इतके दिवस डोक्यात घोळतंय ते उतरवावं असं वाटलं. ते म्हणजे त्या Dr वरचा 'दुसरा' बलात्कार. दुसरा ? कळलं नाही ना ? कारण बलात्काराच्या बातम्या तशा रोजच वाचून 'सवय' झाली असली ( इथे सवय शब्द दुर्दैवी, किळसवाणा वाटत असला तरी आहे ते आहे ) तरी त्यात सुद्धा एक मैलाचा दगड ठरेल कि काय अशी ही घटना. अरुणा शानबाग आणि निर्भया मध्ये आणखी एक भर पडली ज्याचा कधीही उल्लेख आला तर अंगावर काटा येईल. आधी बलात्कार, मग जिवंत जाळणे, मग एन्काऊंटर अशा या घटनेत ३-४ भयंकर घटना घडल्या. पण त्याच वेळेला बाहेरच्या म्हणजे आपल्या जगात त्याहून भयंकर गोष्ट घडली ती म्हणजे ८ मिलियन म्हणजे जवळपास ८० लाख वेळेला Dr च नाव Porn Site वर शोधलं गेलं आणि ते Trending होत. हाच तो दुसरा बलात्कार..कदाचित सामूहिक. ...

Playlist थोडी Shuffle हवीच..!!

“काय दादया, खूप दिवस पेन हातात घेतलं नाही वाटत. पेनातली शाई संपली की उत्साह ओसरला?” एका काकांचा हा प्रश्न ऐकून जरा बर वाटलं. कारण आपण असं  ४-६ महिन्याला काहीतरी पोस्ट टाकणार तर कोणी असं विचारेल असं वाटलं हि नव्हतं.        " नाही ओ काका, थोडं परीक्षा पोटापाण्याच्या नादात हे जरा मागे पडत. आणि असं हि आजकाल फेसबुक उघडायची इच्छा होत नाहीय. विधानसभा, प्रचार हेच चालूय सगळं मग आपण काही टाकलं तरी लोकांचा सध्या मूड वेगळा आहे म्हणून मागेच पडलं."       " ठीके. तुमच्या परीक्षा वगरे काही म्हणणं नाही. पण लोकांचा मूड अंदाज घेत बसलास तर तुझा हि लिहायचा मूड निघून जाईल आणि सवय सुद्धा.  तर समर्थ म्हणतात तस 'दिसामाजी काहीतरी लिहावे आणि प्रसंगी अखंडित वाचीत जावे.' कळलं का लेका" हे संभाषण साधारण काही आठवडे पूर्वीच पण परिस्थती अजून तीच. आता तर राजकीय पोस्ट्स ना अक्षरशः ऊत आलाय.  पण ठरवलं होत जोपर्यंत हलकं फुलकं सापडत नाही तोवर कीबोर्ड ला बोट लावायचं नाही. ती संधी लवकरच मिळाली ही. एका छोट्याशा गप्पांच्या प्रसंगाने डोक्यात एक विचाराची पुडी  सोडल...

काही क्षण भाळण्याचे इतर मात्र सांभाळण्याचे

     गेले कित्येक महिने चाललेल्या लोकशाहीच्या उत्कंठावर्धक सोहळ्याचा आज खऱ्या अर्थाने समारोप झाला. आता सरकार स्थापना वगैरे औपचारिकता होत राहील. आपल्या इतिहासात एका प...