डोपामाईनचे चाळे अन पैशांचे खेळ
डोपामाईन नावाचं द्रव्य मानवी शरीरात असत म्हणे जे आपल्या सुख, आनंद, कौतुक किंवा एखादी यशप्राप्ती याच्याशी निगडित असत. अर्थात हा शब्द माझ्या अशात ऐकण्यात आला आहे आणि त्याबद्दल मला फार माहिती आहे अस नाही पण मला जे शब्दात मांडायचय त्या साठी याची मदत घेतोय. तर परत मुद्द्यावर आता जे डोपामाईन आपल्या थेट कौतुकाशी जोडलेलं आहे तेच आपल्याला attention seeker बनायला लावत. मग ते चांगलं दिसणं असेल, लिखाण, संगीत, कविता, भाषण, फोटोग्राफी, चित्रकला, खेळ आणि जे जे वेगळेपण जपता येईल असं आहे ते सर्व काही माणूस आपल्या आनंदासाठी करत असेल च पण त्याच कोणी कौतुक केलं कि ते डोपामाईन छेडलं जात आणि हुरळून जाणे किंवा तेच छंद वारंवार जपायला प्रेरणा वगरे मिळणे असे प्रकार होतात. आता सोशल मिडियाने म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ते टिक टॉक वेग्रे यांनी तर माकडाच्या हाती कोलीतच दिलंय. मुळात हे सगळे प्लॅटफॉर्म च Human Behaviour ला मोहात पाडून त्यांना नादाला कसं लावता येईल या technology वरच तयार झालेले आहेत. नुसतं डोपामाईन नाही तर आणखी जे काही ज्ञात-अज्ञात मायाजाल आहेत ते सगळ...