Posts

सौंदर्य- नजरे पलिकड़चा

     खुप दिवसांपासून एक प्रसंग लिहायचा होता. मी बऱ्याचदा कर्वेे रोड-FC रोड- शिवाजी नगर मार्गे जातो. त्यात ही काही वेळा PMT ने पण जातो. एकदा असच बस नी जात असताना एक मुलगी बस मधे चढली....

राजकारणी- पण राजकारणा पलिकड़चा

       आपल्याकड़े माणूस कोणत्याही पातळी चा असो. मग ते पदवीधर, नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, कलाकार, तांत्रिक, संशोधक अगदी मग दाढ़ी करणारा, पंक्चर वाला, भाजीवाला त्याही पुढ...

Change is Permanent 2017

Change is Permanent-Timeline Reviews            काही वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्या कड़े एक Key Chain होत, हुक असलेले. आणि एक पेन होत खटका दाबायच. दोन्ही गोष्टी फार यूनिक आणि महाग होत्या का तर अजिबात नाही. किम्मत दोन्...

दशक्रिया (अंध) श्रद्धेची आणि (अंध) विश्वासाची

  आपली एक साधारण गोष्ट आहे भारतीय लोकांची. आपल्याकडे मूल जन्म घेत. त्याला काही दिवस लोकांना दाखवल जात नाही. नजर लागेल म्हणून किंवा आणखी काही असेल तर. ५ व्या दिवशी सटुआई येऊन ...

Engineers Day- एक धर्म

Image
Engineers Day- आपला देशाला वेगवेगळ्या जातीं, उपजाती, त्यांच्या परंपरा, संप्रदाय यांचा सहवास कायम लाभलेला आहे. काही पुराण काळा पासून चालत आलेले आहेत तर काही कालानुरूप तयार झाले आहेत. अशीच एक जात म्हणा किंवा समाज किंवा Direct धर्म बिर्म Engineers नावानी भारतात खुप जागा व्यापुन बसला आहे. अगदी लोकसंख्येच प्रमाण वगैरे काढ़लच तर पहिल्या पाचात बसतो की काय अस वाटत. आज त्यांचा दिवस आहे म्हणे विश्वेश्वरैया नामक Engineer च्या जन्मदिवसा निमित्त तो साजरा होतो. अर्थातच बाकी समाजा प्रमाणेच २-४ लोक सोडली तर आपल्या धर्मगुरू च नेमक कार्य सांगू शकेल असे मला कोणी भेटले नाही. असो, मुद्दा काय आहे की आज यांचा दिवस आहे. तसा अत्यंत बंडखोर, शौकीन आणि तितकाच तंत्रज्ञानप्रिय मित्र प्रेमी समाज आहे. बाकी समाजाप्रमाणे यांच्याही चालिरीति, आणि रिवाज आहेत. यांची सकाळ ही कॉलेज च्या एक तास आधी होते मग वेळ काहीही असो आणि रात्र १-२ च्या पुढे कधी ही. कायम समुहासोबत राहायची आवड़ असणाऱ्या यानी एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ जास्त लोकप्रिय केल मग कधी sem मधे किंवा अटेंडेंस वर का असेना. समानतेवर पण यांचा भयंकर विश...

Kool सत्यवान आणि हटके सावित्री....!!

सकाळी सकाळी न्यूज़ पेपर आणि Mobile वर updates पाहत असताना चहा नाश्ता समोर आला....आणि एकदम तो बिचकला- तो:- आईच्या गावात....!!!! अग काय आहे हे? पंजाबी ची मारामार तुझी न हे काय? आज काही प्रोग्राम आहे का?...

लातूर सत्ता पलट

While Going to Latur after Latur Municipal Elections 24 April 2017 हाताच्या छत्राखालच लातूर सोडल होतं, कमळातल आता लातूर पाहायचय, खरच बदलली लोकांची मत की, नाव फक्त सत्ताधारिंची हेच बघायचय..! इतक्या वर्षांच्या कांग्रेस ला खरच, लातूर नगरी असेल का कंटाळली, की भाजपा ला आणून उगवत्या सूर्याला नमस्काराची रीत तेवढी पाळली...! नळ, गटर, रस्ते, सिटी बस चा विचार सोडा, तहान भागवताना टैंकर्स नीच दमवल आम्हाला, हे तर हवच पण साहेबांच्या औद्योगिकरणाची गति कमी झालीय हे कळलय का कोणाला? मागितली तशी एक संधि दिली गेलीय, त्याचं सोन तेवढ करुन टाका, फार काही मागायच नाही पण, भारताच्या नकाशावर लातुरचा मान फक्त राखा...! प्रवासी ©प्रसन्न कुलकर्णी [ PK]

आजीचा राम...!! राम नवमी

 Ram Navmi 4 April 2017 कधीतरी तरी सकाळी झोपेतुन उठत असतो, डोळे अर्धवट उघडलेले असतात. आणि लटपट लटपट करत आजी चालत यायची. "अग काय आहे हे आज्जी? नकोय मला." "गप रे. अंगारा आहे रामाचा. रात्री ४ वेळा दचकुन उठलास. TV पाहता नको तितका, एवढा एवढा अंधार दिसला की लगे घाबरून पण जाता." "अग पण आता स्वप्नं ना कस कळेल, अंगारा लावलेला. आणि समजा समजलच तरी काय करणार हा अंगारा." "नसेल काही करत तरी लाव म्हणल की लावायच, उगाच प्रश्न विचारु नये. आमचा समाधान म्हणून तरी." किती वेळा सांगितल रोज उठून रामरक्षा म्हणावी. रामरक्षे मधे एक एक श्लोकात एकेका अवयव भोवती कवच निर्माण होता." हे असा Scene आमच्या कड़े कित्येक वेळा झालेला आहे. अत्यंत देव भाबड़ा असलेली आजी लोकांची जमात देव आणि फूल पाहिले की भयंकर खुश होतात. गेल्या विस वर्षात आठवत तस असा एकही दिवस नसेल गेला जिथे राम आणि श्रीक़ृष्णा ला फूल वाहिल गेला नसेल. ती रोज सकाळी अंघोळ झाली की १२ वा , १५ वा अध्याय आणि रामरक्षे च्या रूपानी 10 मिनीट द्वापार युगात आणि १० मिनीट त्रेता युगात फिरून यायची. याला गुडघे दुखी...

#Highway_moments 1

 1 -26. Mar 2016 वार- शुक्रवार स्थळ- खड़की सिग्नल रोजच्या प्रमाणे सकाळी ९-९.३० वाजता जात होतो. खड़की च्या तिथे सिग्नल लागला गाड़ी थांबवली. माझ्या बाजूला थोड़ मागे एक रिक्षा होती. त्या रिक्षावाल्या काकानी माझ्या मागच्या Bike वाल्याला विचारल ते कानावर पडल "दगडुुशेठ मंदिरला कस जायचा ?" मग त्या Bike वाल्या मित्राने हेडफोन्स काढून मोठ्या कष्टाने पत्ता सांगितला. ते काका पुनः म्हणाले- "किती वेळ लागेल ?" तो Bike वाला पुनः म्हणाला ही ट्राफिक ची वेळ आहे. आणखी २० मिनीट लागतील. खर तर मनात वाटत होता रिक्षावाल्याला दगडुुशेठ माहीत नसेल तर हा धंदा करावा कशाला?. पुनः त्यानी त्या Bike वाल्या ला हाक मारली पण आता दादानी बहुतेक हेडफोन्स लाऊन Music चालु केला होता, त्यांनी मला विचारल इथ ज्यूस किंवा नारळ पाणी कुठे मिळेल. आम्ही मुंबई वरुन आलोय आणि या पोराला हवय. मी वाकुन पाहिल खरच MH ०३ होता. मागे कुटुंब होता. मध्यभागी १२-१५ वर्षाचा मुलगा. जो ग्लानि आल्या सारखा वाटत होता. हाताला सलाइन काढल्या वर असत त्या पट्या. बाजूला आई आणि त्याचा कदाचित भाऊ असावा. माहीत नव्हतं ...