Kool सत्यवान आणि हटके सावित्री....!!

सकाळी सकाळी न्यूज़ पेपर आणि Mobile वर updates पाहत असताना चहा नाश्ता समोर आला....आणि एकदम तो बिचकला-

तो:- आईच्या गावात....!!!! अग काय आहे हे? पंजाबी ची मारामार तुझी न हे काय? आज काही प्रोग्राम आहे का?  मला कोणी काही सांगत का नाही? एक चिमटा काढ़ पटकन....

(त्याला आवड़णारी आईची काठा पदराची इरकल साड़ी, नव्या लक्ख बांगडया, आजिची नथ जी आई कायम घालायची, सुवासिक गजरा, नवीन Brand चा परफ्यूम आणि हलकसा केलेला Touch up अस आरसपानी रूप बघून याला कळत नव्हतं....तितक्याच प्रेमानी एक चिमटा त्याला काढला गेला)

तो:- अरररर अग हळू बावळट...!!

ती:- तूच म्हणालास आता हळू का? आणि आज काहीही प्रोग्राम नाहिय. वट सावित्री पौर्णिमा आहे. So मी आई सोबत पुजेला जात आहे...!!

तो:- ऐ हा... तू जा..पूजा कर...नो प्रॉब्लम. पण plz तू असा नको म्हणू की ते ७ जन्म बिन्म तू मला मागणार आहेस. इतका नाही झेलणार काय मी? एकच पीस नको मला तितके जन्म. 😛

ती:- plz ७ जन्म तू मिळाला तरी नकोयस मला. मला पण variety पाहिजे यार. आधीच खुप लोकांना Sacrifice करुन हो बोलले तुला. सारख तेच नाही करणार मी.
Cool बंदा हरीश, Businessman दीप, physic oriented राघव आणि स्कूल पासून चा मित्र नीरज यांना धूड़कवून तुला पकड़ल आहे. अगले जन्म इनमेसे कोई फिर आजाये...हीहीही

तो:- Exactly....मी पण Natural Cute असलेली नेहा, सिंगर मधुरा , वेस्टर्न लुक्स नी धुर करणारी ईशा सोडून तुला पकड़ली. हर बार उनका दिल नही दुखाना है मुझे भी. सो ७  जन्म सोडून हव ते कर.

ती:- त्यांना मरु दे...या जन्मात तरी मी बायको आहे न. जरा बाबांकडून शिक आइंसाठी ते गुलाब जामुन आणायला गेलेत. आणि  माझी पाहिली पौर्णिमा आहे. तू वर्क फ्रॉम होम साठी घरिच आहेस तरी बसला आहेस म्हशापुरा... शी.

( इतक्यात आईची एंट्री)

तो:- आई, सावित्रीनी तर सत्यवान चा जीव वाचवला होता ना ग? ही वाईट चिमटे काढून हल्ला करतेय बघ. काय उपयोग व्रताचा?

आई उवाच:- आठवड्यात रोज़ पेग मारणारा तू आज महिन्यात २ दा पितो, किती वेळा तुला भरधाव गाड़ी वरुन पडून आम्ही उचलून आणायचो, लास्ट पडून आता ६ महीने झाले,  प्लान न करता पैशाची किती गोची करायचा तू आता न चुकता FD, mediclaim चे हफ्ते भरतोस, attitude बाजूला ठेवून माणस किती ओळखत आहेस. हे सगळ मला नाही जमला या पोट्टील्ला जमला. फक्त जीव वाचवणारी नाही तर असलेल जीवन सूखकर करणारी पण सावित्री असते सो रडू नका. तू लढ़ ग मी आहे.

(१० मिनीट विचार करुन झाला की तिला याचा व्हाट्स एप्प  येतो)

"ए ऐक ना, ते खर असतं का खोट माहीत नाही. पण तू ते ७ जन्म वाल मागितल तरी चालेल मला. त्या मधुरा नेहा ईशा पेक्षा तू चालेल मला नंतर पण. बरी आहेस तू तशी."
( हिला आला जिंकल्याचा feel)

त्या विचारात ती आई ना
ती:- आई, मी अबोली रंगाची साड़ी Dryclean साठी काढून ठेवलेली पण त्या ऐवजी ही इरकल कशी आली Dryclean होऊन. तुम्ही बदलली का चुकुन?

मधेच बाबा उवाच:- साडी च नाही सगळ बदला बदली होतय. कारण मिठाई वाला आपल्या चिरंजीवांचे दोस्त आहेत. आणि त्याला कालच व्हाट्स एप्प गेलय बाबा गुलाब जाम घ्यायला येतील एक किलो. पण अर्धा किलो गुलाब जाम आणि अर्धा किलो अम्र खंड हेच द्यायचा काहीही होवो. आणि advance पण दिला गेलाय. आता कळल याच वर्क फ्रॉम होम का ते?

( आणि आता ती आपण हरल्याच्या खुशित त्याच्या जाऊन बोलणार इटक्यात)

तो:- काही नको बोलू. I know तुला सुद्धा चालणार आहे मी ७ जन्म ते. अम्रखण्ड काढ़ लवकर plzz आता....!!

२१ व्या शतकातली साता उत्तराची कहाणी पाचाउत्तरी  सूफळ संपूर्ण...!!!

© प्रसन्न कुलकर्णी [ PK]

Comments

Anonymous said…
Awwwww.... Khup goad

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!