Posts

Showing posts from August, 2025

भारताची लोकशाही आणि कृष्णाचं विश्र्वरूप दर्शन

Image
         काही महिने आधी धनश्री लेले यांचं गीतेच्या अकराव्या अध्यायाच निरुपण ऐकण्यात आलं. आधी असलेली थोडी फार माहिती त्यांनी अत्यंत रंजक पद्दतीने मांडली त्यामुळे जास्त लक्षात राहिली आणि शिवाय तो विचार खूप वेगळ्या अर्थाने डोक्यात घोळत होता. त्याच कारण तो असा कि-           पहिल्या ९  अध्यायामध्ये भगवंतानी सांख्य योग, ज्ञान योग, कर्म योग, कर्म सन्यास योग असे अनेक योग सांगितले तरी अर्जुनाचं पूर्ण समाधान झालं नव्हत, अनेक प्रश्न पडत होते. म्हणून १० व्या अध्यायात तो म्हणतो कि हो बाबा मला मान्य आहे भगवंता सगळ्याचा दाता, परम ब्रह्म, परम धाम तूचआहेस, आम्ही शेवटी केवळ तुझ्यात एकरूप होण्यासाठी आसक्ती रहित कर्म करत जगले पाहिजे पण तरी मला सांग "केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ?" म्हणजे "कुठे कुठे मी तुला शोधू शकतो, तुझं निरंतर चिंतन करू शकतो ?". लगेच भगवंत म्हणतात कि " हन्त ते कथयिष्यामि " कि बाबा रे ऐक आता मी तुला सांगतो माझी सगळी रुपे. मग एकेक करून भगवंत अर्जुनाला सांगतात कि बघ...